पडद्यावरचे चिरतरुण कलाकार !

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 November, 2015 - 18:31

चिरतरुण असणे आणि तसेच पडद्यावर दिसणे हे चित्रपट कलावंतांसाठी आणि त्यातही हिरो हिरोईनची भुमिका करणार्‍यांसाठी एक वरदान असते. कारण तुमचे वय उलटले की तुम्हाला साजेश्या भुमिकाही बदलतात आणि एक नवी इनिंग सुरू करावी लागते. जी प्रत्येकाला जमतेच असे नाही.

बस्स अश्याच कलाकारांची चर्चा ईथे करूया.

मला खात्री आहे की चर्चा नक्कीच ईंटरेस्टींग होईल, कारण असे कलाकार कित्येकांच्या खास आवडीचे असतात. तसेच प्रत्येकाला आपल्या आवडीचे कलाकार नेहमीच चिरतरुण राहावेत असेही वाटत असते. जसे सचिन तेंडुलकरने वयाची साठी पर्यंत खेळ राहावे असेच त्याच्या चाहत्यांना वाटायचे, तसेच हे. फक्त फरक ईतकाच की क्रिकेटमध्ये फिटनेस साथ सोडतो, त्यामुळे चाळीशीला येता सचिनला निवृत्ती घ्यावी लागली. पण तेच हा फिटनेसचा मुद्दा चित्रपट कलाकारांना तितकासा लागू होत नाही. अगदी पन्नाशीलाही लागू होत नाही.

तर याच पन्नाशीपासून आणि ज्यावरून हा धागा सुचला त्या किंग खान शाहरुखवरून मी सुरुवात करतो.

शाहरूख खान, जन्म - २ नोव्हेंबर १९६५
आठवड्याभरापूर्वीच याने वयाची पन्नाशी गाठली. येत्या काही महिन्यात त्याचे तीन चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. त्यातील एक चित्रपट ‘दिलवाले’ त्याच्या चितपरीचित रोमांटिक शैलीतला आहे, आणि मला खात्री आहे की पन्नाशीतही त्याचा काजोलसोबतचा रोमान्स रसिकांना तेवढीच मजा देऊन जाईल जेवढे वीस वर्षांपूर्वी दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ने दिली होती.

मात्र मला त्याहून जास्त उत्सुकता लागली आहे ती त्याच्या ‘फॅन’ या चित्रपटाची.
फॅनची एक झलक इथे बघू शकता - https://www.youtube.com/watch?v=vKziLmjSVB4
यात त्याची दुहेरी भुमिका असून त्यापैकी एका भुमिकेत तो कोवळा तरुण दाखवला आहे. त्याने आणि त्याच्या मेकअप टीमने हे कसं जमवलंय ही खरेच एक कमाल असणार आहे, आणि त्याचकारणाने हा चित्रपटही हाऊसफुल्लची पाटी झळकवणार यात मला शंका नाही.

याऊपर रोहीत शेट्टी त्याला घेऊन अंगूरचा रिमेक करणार आहे, फरहान अख्तर त्याच्याबरोबर डॉन-३ करणार आहे, त्याच्याकडे आजही एवढे काम दिसतेय की त्याच्या पुढच्या काही वर्षांंच्या तारखा आतापासूनच बूक असतील.

असो, तर धाग्याचा विषय पडद्यावरचे चिरतरुण कलाकार असून शाहरूख खान नाही याचे भान मला ठेवायलाच हवे, अन्यथा त्याच्याबद्दलच मी लिहित बसेन Happy

तर मग शाहरूख खान कडून आपण आता ईतर दोन खानांकडे वळूया.

आमीर खान - जन्म - १४ मार्च १९६५
काय योगायोग बघा, हा सुद्धा पर्रफेक्ट पन्नास!
हा मुळातच बॉलीवूडचा चॉकलेट हिरो म्हणून ओळखला जातो आणि बच्चा भुमिका करण्यात याची मास्टरी आहे. आठवा थ्री ईडियट्समधील याचा निरागस आणि खोडसाळ कॉलेजकुमार जो माधवनपेक्षाही वयाने छोटा वाटत होता किंवा गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या पीके मधील नंगापुंगा एलियन लूक जो ईतर कोणा ५० वर्षाच्या कलाकाराला शोभणे निव्वळ अशक्यच!

सलमान खान - जन्म - २७ डिसेंबर १९६५
आणि ही झाली १९६५ सालाची हॅट्रीक. बॉलीवूडच्या ईतिहासात हे वर्ष नोंदवून ठेवायला हवे. या वर्षात जन्मलेले तीन कलाकार आज पन्नास वर्षाचे आहेत आणि तीनही जण आज बॉलीवूडचे तीन सुपर्रस्टार म्हणून ओळखले जातात.
आता या सलमानबद्दल काय बोलावे, भले हा अजून अविवाहीत असला तरी आज लग्नाला उभा राहिला तर बॉलीवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर म्हणून ओळखला जाईल यातच सारे काही आले.
या वयात देखील हा दबंग (भाग-३) ही जमवू शकतो तसेच ‘प्रेम रतन धन पायो’ सारखा प्रेमपटही. पण यापेक्षा महत्वाचे म्हणजे आणखी दहा वर्षांनीही याचे फिमेल फॅन फॉलोईंग काही घटलेले नसणार याची मला खात्री आहे Happy

बॉलीवूडचा शेहनशाह समजला जाणार्‍या ऑल टाईम सुपर्रस्टार अमिताभ बच्चननेही पन्नाशी उलटल्यावर हिरो म्हणून बरेच चित्रपट केले आहेत आणि त्यातील कित्येक त्याला न शोभल्याने फसलेले आहेत. त्यामुळे पन्नाशीत पोहोचल्यावर पब्लिकने हिरो म्हणून स्विकारावे हे तितकेसे सोपे नाहीये हे समजून येते. पण अखेर तो अमिताभ असल्याने त्याची दुसरी इनिंगही तितकीच जबरदस्त होती ती गोष्ट वेगळी.

मागच्या पिढीसाठी चिरतरुण वा एवरग्रीन म्हटले की पहिलेच नाव देवानंदचे डोळ्यासमोर येत असावे. मात्र मी काही त्या काळातील नसल्याने ऐकीव माहीतीवर वा गूगाळून त्या आधारे आधिकारवाणीने लिहिल्यासारखे करणार नाही. त्यामुळे सर्वच जुन्या कलाकारांना माझा पास. ईतरांनी नक्की लिहा.

नवीन कलाकारांमध्ये कोण किती आणि कितपत टिकेल हा अंदाज तुर्तास वर्तवणे कठीण वाटतेय. कोणीही अजून तितके आश्वासक वाटत नाहीये. वर उल्लेखलेल्या पन्नाशीच्या कलाकारांच्या स्टारपदाला ते फारसा धक्का पोहोचवू शकले नाहीत यातच सारे आले. नाही म्हणायला हृतिकने पदार्पणातच त्या आशा निर्माण केल्या होत्या. किंबहुना अगदी आजही तो लंबी रेसका घोडा वाटतो. पण बहुधा त्याला कुठल्या रेसमध्येच ईंटरेस्ट नसावा असे सध्या वाटते. तरीही अजून पंधरा वर्षांनी जरी त्याने ठरवले की एखादा अ‍ॅक्शन थ्रिलर प्रेमपट करूया तर हॉलीवूडकडूनही त्याला ऑफर येतील असा कातिलाना त्याचा लूक आहे.

हिरोईनबाबत चिरतरुण असण्याचा हिशोब वेगळाच पडतो. मुळात वर्षानुवर्षे अपवाद वगळता हिरोईन हा घटक शोभेची बाहुली म्हणून चित्रपटात मिरवला जातो. त्यामुळे तिथे एखाद्या हिरोईनचे वय उलटले की लगेच दुसरी फळी तयार असते. तिनही खान वा अक्षयकुमार, अजय देवगणसारखी मंडळी स्टारपदावर जसे वर्षानुवर्षे ठिय्या मारून बसले आहेत तसे हिरोईनबाबत फारसे होत नाही. चाळीशीनंतर पब्लिक मुख्य हिरोईन म्हणून स्विकारेल हे अभावानेच होते. म्हणूनच माधुरी दिक्षित (जन्म - १९६७) ही पन्नाशीच्या खान कलाकारांपेक्षा वयाने लहान असली आणि आजही ती कमालीची सुंदर दिसत असली, तरीही तिला आपली पहिली इनिंग फार आधीच संपवावी लागली होती.

मराठी हिरोंमध्ये एका काळापर्यंत लूक हा फॅक्टर फारसा महत्वाचा नसायचा. बरेचदा पंचवीशीचे हिरोच उलट पस्तिशीचे वाटायचे. हल्ली मात्र चित्र बदलतेय. ट्रेंड बदलतोय. तरीही अंकुश चौधरी आणि स्वप्निल जोशी (दोघेही जन्मवर्ष - १९७७) हे चाळीशीच्या दारात पोहोचलेले हिरो या बदलत्या ट्रेंडमध्ये फिट होताना दिसत आहेत ही गोष्ट नक्कीच कौतुकास्पद आहे. आता हे दोघे पन्नाशीपर्यंत मजल मारतात का हे बघणे रोचक राहील. अर्थात सचिन पिळगावकर (जन्म - १९५७) यांनी आयडीयाची कल्पना सारखा चित्रपट पन्नाशी ओलांडल्यावर हिरोच्या भुमिकेत म्हणून केला असा एखादा अपवाद आहेच, पण तो अपवादच.

मराठीबाबतही मला जुन्या काळाबद्दल माहीत नसल्याने नो कॉमेंटस, ईतरांकडून जाणून घ्यायला आवडेल.

मी माझ्या आवडीच्या चिरतरुण कलाकारांची यादी मांडली आहे, आता तुमची पाळी Happy

.

final.jpg

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छोट्या पडद्यावरची चिरतरूण बाई एकमेव. तुलसीची बा. हिनं टोटल पाच पिढ्यांची जन्म, लग्नं, घटस्फोट, मेमरीलॉस. भान्गडी, विबासं, मृत्यू. मृत्य्य्वापसी, >>>
आणि मराठीत आई आज्जी , म्हणजे चार दिवस सासूचे मधली .

सत्यम शिवम सुंदर मधे तर तिचा चेहरा केवढा विद्रुप दाखवला तरी ती जी दिसायची ती दिसलीच!!! वेगळेच लुक्स आहेत तिचे.

हा तिचा अलिकडचा फोटो ६० झाली असतानाचा. अजूनही ती छानच दिसते. डोळा फुटला वगैरे मला माहिती नव्हते :)at 60.jpg

अजून गोड दिसणार्‍यांमध्ये फरीदा जलाल, आहे, पण ती चिरतरूण म्हणायची म्हणजे कठिणच. पणजीचा रोलसुद्धा करून झालाय तिचा.>>> +१
रच्याकने 'बेचारा दिल क्या करे' गाण्यात, खुद्द ड्रिमगर्ल समोर असताना दखल घ्यावी इतकी छान दिसलीये ती.

झीनत बॉलीवूड स्टँडर्डने सुंदर कधीच नव्हती. प्पण तिचं चपखल वर्णन आरडीनं केलंय तसं "और भी नमकीन" जबरदस्त स्क्रीन प्रेझेन्स आणि आत्मविश्वास होता.

हेमामालिनी गोड दिसते. ती गोडच दिसते. ती केवळ गोडच दिसते. ती निव्वळ केवळ गोड दिसते याहून जास्त तिचं वर्णन शक्यच नाही. Proud

तुम अपना रंजो गम मधली ती कोण होती ती खासच होती. पण ती खूप सिनेमात नाही दिसली.

मला अलिकडची दिया मिर्जा फार आवडते. खास करुन तिचे अ‍ॅक्सेन्ट.

@ नंदिनी...

बा च्या बाबतीत एकदम बरोब्बर लिहिले आहे तुम्ही !! काय ईश्ट्राँग ह्रुदयाची बाई Lol
बहुदा आतिफ अस्लम नी "बाss खुदा तुम्ही होsss !!!" हे तिच्या साठीच म्हण्टले असावे Lol

झीनत बॉलीवूड स्टँडर्डने सुंदर कधीच नव्हती >>> हा त्या काळाचा बॉलीवूड स्टॅण्डर्ड असेल. हिरोईन ग्लॅमरस अन मादक नाही तर सोज्वळ आणि सात्विक चेहर्‍याची दिसावी या अपेक्षा असलेली पब्लिक. हे लोक प्रियांका चोप्रालाही सुंदर म्हणत नाहीत. तरी झीनत अमान सुद्धा मिस ईंडिया होती ना ..

चिरतरुण हा टॉपिक आणि मिलिंद सोमण उर्फ मिसो नाही !!! शोनहो

या वयातही फिट आहे बघा. मॅरेथॉन वगैरे जोरात चालू असत . अजूनही दिल मै बजी घन्टी होत त्याच्याकडे पाहिल्यावर

हूडा वरच्या यादीतले स्वजो आणि सल्लूला तरी कोण अ‍ॅक्टर मानतंय? सलमानला अभिनेता म्हटलं तर तो अब्रूनुकसानीचा दावाच ठोकेल.

>>सलमानला अभिनेता म्हटलं तर तो अब्रूनुकसानीचा दावाच ठोकेल<< Lol
नंदिनी मॅडम, तुम्ही ह्या धाग्यांवर सिक्सर पे सिक्सर मारायचे ठरविले आहेत काय ?

सल्लूने प्रामाणिकपणे त्याला अभिनय येत नाही असे नुकतेच जाहीररीत्या कबूल केले आहे. आता त्याला अभिनेता मानणार्‍या त्याच्या फ्यानांना डोके आपटण्याशिवाय पर्याय नाही. Happy

बादवे घर्चे सग्ळे प्रे र ध पा पाह्यला जानार आहेत. मी बाणेदार पणे नकार दिला आहे. सबब आजचा दिवस आम्ही आम्लेत आणि भाक्रीवर काढला आहे. मला दिवाळी फराळाला पात्र ठरवण्यात आलेले नाही Sad

रॉबीनहुड, तुमच्या लिखाणातील चुका बघून असे वाटते जणू तुम्ही डुआयडीचा सराव करत आहात किंवा चुकुन त्या आयडीची शैली ह्या आयडीमधे येत आहे Happy

आम्ही कट्टर सलमान फॅन आहोत. आम्ही त्याला अभिनेता मानत नाही. आमच्यासाठी तो केवळ आणि केवळ सलमान खान आहे आणि राहील. सोनमकन्येसोबतदेखील तो पडद्यावर रोमान्स करताना दिसला तरी आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. बाकीचे सुपर्रस्टार्र असतील पण सलमान सुपर्र से भी ऊपर्र आहे. Light 1

पण त्याला कोणी अ‍ॅक्टर मानत नाही ना>>>>> रॉहु , पण साक्षात मिसो समोर असताना acting वगैरे कशाला पाहायचं म्हणते मी
Biggrin मिसो फक्त देखणेपणासाठीच आहे Proud

सल्लूने प्रामाणिकपणे त्याला अभिनय येत नाही असे नुकतेच जाहीररीत्या कबूल केले आहे. आता त्याला अभिनेता मानणार्‍या त्याच्या फ्यानांना डोके आपटण्याशिवाय पर्याय नाही.
>>>>

ही एक खेळी असते. यात फ्यान काही डोके आपटत नाहीत, पण क्रिटीक्सची तोंडे कायमची बंद होतात.
त्यानंतर तो पुढे काय म्हणाला बघा, की त्याच्यात एक चांगला माणूस लोकांना दिसतो म्हणून ते त्याच्यावर प्रेम करतात. हे आपल्या चांगुलपणाचे प्रमोशन झाले. आता त्याचे ब्रांडींग असेच होत त्याला बॉलीवूडचा रजनीकांत बनवणार. लिहून घ्या, सलमान ७०-७५ वर्षांचा झाला तरी त्याला पडद्यावर तरुण दाखवत त्याचे मार्केट चालूच राहणार Happy

सलमान ७०-७५ वर्षांचा झाला>> लाहौलविलाकुवत!!!! १५० वर्षाचा झालातरी असं म्हणावं Proud

सलमानच्या अभिनयाची आणि करीअरची सगळ्यांत मस्त पिसं त्याचेच पिताश्री सही काढतात.

@ मिलिंद सोमन,
प्रश्न फक्त दिसण्याचा नाहीये, (अन्यथा माझ्या पणजोबांचेही नाव यात आले असते)
प्रश्न आहे तो या वयात तुम्हाला चित्रपटात हिरोच्या भुमिकेत प्रेक्षक स्विकारतात का?
बाकी निव्वळ दिसण्याचा विचार करता तो माझ्याही आवडीचा. काय वय आहे त्याचे सध्या?

अक्षय कुमार नाही का दिसत अजूनही हँडसम.. कसला फिट आहे तो आणि क्लीन शेव्हन लूकमध्ये किंवा मिशी लावूनही मस्तच दिसतो तो...

हो, दिसतोच मुळी तो रावडी. त्यासम तोच. मला अक्षयच आवडतो. विनोदी भूमिका पण तेवढ्याच सहजपणे करतो. मुख्य म्हणजे अजूनही तरुण दिसायला फार कष्ट घ्यायला लागत नाहीत त्याला. चिन्ताता चिता मध्ये करीनाबरोबर मिशी व गॉगल अश्या गेट अप मध्ये सॉलिड दिसलाय.

Pages