पडद्यावरचे चिरतरुण कलाकार !

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 November, 2015 - 18:31

चिरतरुण असणे आणि तसेच पडद्यावर दिसणे हे चित्रपट कलावंतांसाठी आणि त्यातही हिरो हिरोईनची भुमिका करणार्‍यांसाठी एक वरदान असते. कारण तुमचे वय उलटले की तुम्हाला साजेश्या भुमिकाही बदलतात आणि एक नवी इनिंग सुरू करावी लागते. जी प्रत्येकाला जमतेच असे नाही.

बस्स अश्याच कलाकारांची चर्चा ईथे करूया.

मला खात्री आहे की चर्चा नक्कीच ईंटरेस्टींग होईल, कारण असे कलाकार कित्येकांच्या खास आवडीचे असतात. तसेच प्रत्येकाला आपल्या आवडीचे कलाकार नेहमीच चिरतरुण राहावेत असेही वाटत असते. जसे सचिन तेंडुलकरने वयाची साठी पर्यंत खेळ राहावे असेच त्याच्या चाहत्यांना वाटायचे, तसेच हे. फक्त फरक ईतकाच की क्रिकेटमध्ये फिटनेस साथ सोडतो, त्यामुळे चाळीशीला येता सचिनला निवृत्ती घ्यावी लागली. पण तेच हा फिटनेसचा मुद्दा चित्रपट कलाकारांना तितकासा लागू होत नाही. अगदी पन्नाशीलाही लागू होत नाही.

तर याच पन्नाशीपासून आणि ज्यावरून हा धागा सुचला त्या किंग खान शाहरुखवरून मी सुरुवात करतो.

शाहरूख खान, जन्म - २ नोव्हेंबर १९६५
आठवड्याभरापूर्वीच याने वयाची पन्नाशी गाठली. येत्या काही महिन्यात त्याचे तीन चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. त्यातील एक चित्रपट ‘दिलवाले’ त्याच्या चितपरीचित रोमांटिक शैलीतला आहे, आणि मला खात्री आहे की पन्नाशीतही त्याचा काजोलसोबतचा रोमान्स रसिकांना तेवढीच मजा देऊन जाईल जेवढे वीस वर्षांपूर्वी दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ने दिली होती.

मात्र मला त्याहून जास्त उत्सुकता लागली आहे ती त्याच्या ‘फॅन’ या चित्रपटाची.
फॅनची एक झलक इथे बघू शकता - https://www.youtube.com/watch?v=vKziLmjSVB4
यात त्याची दुहेरी भुमिका असून त्यापैकी एका भुमिकेत तो कोवळा तरुण दाखवला आहे. त्याने आणि त्याच्या मेकअप टीमने हे कसं जमवलंय ही खरेच एक कमाल असणार आहे, आणि त्याचकारणाने हा चित्रपटही हाऊसफुल्लची पाटी झळकवणार यात मला शंका नाही.

याऊपर रोहीत शेट्टी त्याला घेऊन अंगूरचा रिमेक करणार आहे, फरहान अख्तर त्याच्याबरोबर डॉन-३ करणार आहे, त्याच्याकडे आजही एवढे काम दिसतेय की त्याच्या पुढच्या काही वर्षांंच्या तारखा आतापासूनच बूक असतील.

असो, तर धाग्याचा विषय पडद्यावरचे चिरतरुण कलाकार असून शाहरूख खान नाही याचे भान मला ठेवायलाच हवे, अन्यथा त्याच्याबद्दलच मी लिहित बसेन Happy

तर मग शाहरूख खान कडून आपण आता ईतर दोन खानांकडे वळूया.

आमीर खान - जन्म - १४ मार्च १९६५
काय योगायोग बघा, हा सुद्धा पर्रफेक्ट पन्नास!
हा मुळातच बॉलीवूडचा चॉकलेट हिरो म्हणून ओळखला जातो आणि बच्चा भुमिका करण्यात याची मास्टरी आहे. आठवा थ्री ईडियट्समधील याचा निरागस आणि खोडसाळ कॉलेजकुमार जो माधवनपेक्षाही वयाने छोटा वाटत होता किंवा गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या पीके मधील नंगापुंगा एलियन लूक जो ईतर कोणा ५० वर्षाच्या कलाकाराला शोभणे निव्वळ अशक्यच!

सलमान खान - जन्म - २७ डिसेंबर १९६५
आणि ही झाली १९६५ सालाची हॅट्रीक. बॉलीवूडच्या ईतिहासात हे वर्ष नोंदवून ठेवायला हवे. या वर्षात जन्मलेले तीन कलाकार आज पन्नास वर्षाचे आहेत आणि तीनही जण आज बॉलीवूडचे तीन सुपर्रस्टार म्हणून ओळखले जातात.
आता या सलमानबद्दल काय बोलावे, भले हा अजून अविवाहीत असला तरी आज लग्नाला उभा राहिला तर बॉलीवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर म्हणून ओळखला जाईल यातच सारे काही आले.
या वयात देखील हा दबंग (भाग-३) ही जमवू शकतो तसेच ‘प्रेम रतन धन पायो’ सारखा प्रेमपटही. पण यापेक्षा महत्वाचे म्हणजे आणखी दहा वर्षांनीही याचे फिमेल फॅन फॉलोईंग काही घटलेले नसणार याची मला खात्री आहे Happy

बॉलीवूडचा शेहनशाह समजला जाणार्‍या ऑल टाईम सुपर्रस्टार अमिताभ बच्चननेही पन्नाशी उलटल्यावर हिरो म्हणून बरेच चित्रपट केले आहेत आणि त्यातील कित्येक त्याला न शोभल्याने फसलेले आहेत. त्यामुळे पन्नाशीत पोहोचल्यावर पब्लिकने हिरो म्हणून स्विकारावे हे तितकेसे सोपे नाहीये हे समजून येते. पण अखेर तो अमिताभ असल्याने त्याची दुसरी इनिंगही तितकीच जबरदस्त होती ती गोष्ट वेगळी.

मागच्या पिढीसाठी चिरतरुण वा एवरग्रीन म्हटले की पहिलेच नाव देवानंदचे डोळ्यासमोर येत असावे. मात्र मी काही त्या काळातील नसल्याने ऐकीव माहीतीवर वा गूगाळून त्या आधारे आधिकारवाणीने लिहिल्यासारखे करणार नाही. त्यामुळे सर्वच जुन्या कलाकारांना माझा पास. ईतरांनी नक्की लिहा.

नवीन कलाकारांमध्ये कोण किती आणि कितपत टिकेल हा अंदाज तुर्तास वर्तवणे कठीण वाटतेय. कोणीही अजून तितके आश्वासक वाटत नाहीये. वर उल्लेखलेल्या पन्नाशीच्या कलाकारांच्या स्टारपदाला ते फारसा धक्का पोहोचवू शकले नाहीत यातच सारे आले. नाही म्हणायला हृतिकने पदार्पणातच त्या आशा निर्माण केल्या होत्या. किंबहुना अगदी आजही तो लंबी रेसका घोडा वाटतो. पण बहुधा त्याला कुठल्या रेसमध्येच ईंटरेस्ट नसावा असे सध्या वाटते. तरीही अजून पंधरा वर्षांनी जरी त्याने ठरवले की एखादा अ‍ॅक्शन थ्रिलर प्रेमपट करूया तर हॉलीवूडकडूनही त्याला ऑफर येतील असा कातिलाना त्याचा लूक आहे.

हिरोईनबाबत चिरतरुण असण्याचा हिशोब वेगळाच पडतो. मुळात वर्षानुवर्षे अपवाद वगळता हिरोईन हा घटक शोभेची बाहुली म्हणून चित्रपटात मिरवला जातो. त्यामुळे तिथे एखाद्या हिरोईनचे वय उलटले की लगेच दुसरी फळी तयार असते. तिनही खान वा अक्षयकुमार, अजय देवगणसारखी मंडळी स्टारपदावर जसे वर्षानुवर्षे ठिय्या मारून बसले आहेत तसे हिरोईनबाबत फारसे होत नाही. चाळीशीनंतर पब्लिक मुख्य हिरोईन म्हणून स्विकारेल हे अभावानेच होते. म्हणूनच माधुरी दिक्षित (जन्म - १९६७) ही पन्नाशीच्या खान कलाकारांपेक्षा वयाने लहान असली आणि आजही ती कमालीची सुंदर दिसत असली, तरीही तिला आपली पहिली इनिंग फार आधीच संपवावी लागली होती.

मराठी हिरोंमध्ये एका काळापर्यंत लूक हा फॅक्टर फारसा महत्वाचा नसायचा. बरेचदा पंचवीशीचे हिरोच उलट पस्तिशीचे वाटायचे. हल्ली मात्र चित्र बदलतेय. ट्रेंड बदलतोय. तरीही अंकुश चौधरी आणि स्वप्निल जोशी (दोघेही जन्मवर्ष - १९७७) हे चाळीशीच्या दारात पोहोचलेले हिरो या बदलत्या ट्रेंडमध्ये फिट होताना दिसत आहेत ही गोष्ट नक्कीच कौतुकास्पद आहे. आता हे दोघे पन्नाशीपर्यंत मजल मारतात का हे बघणे रोचक राहील. अर्थात सचिन पिळगावकर (जन्म - १९५७) यांनी आयडीयाची कल्पना सारखा चित्रपट पन्नाशी ओलांडल्यावर हिरोच्या भुमिकेत म्हणून केला असा एखादा अपवाद आहेच, पण तो अपवादच.

मराठीबाबतही मला जुन्या काळाबद्दल माहीत नसल्याने नो कॉमेंटस, ईतरांकडून जाणून घ्यायला आवडेल.

मी माझ्या आवडीच्या चिरतरुण कलाकारांची यादी मांडली आहे, आता तुमची पाळी Happy

.

final.jpg

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाहरुख इतकेच बोलला " ज्यांना सम्मान परत करायचा वाटत आहे ते त्यांच्या दृष्टीकोनातून बरोबर आहे. ते काय विचार करतात ते त्यांच्यापाशी. हा कोणी मला विचारले तर मला अद्याप असा कोणताच सम्मान मिळाला नाही त्यामुळे परत करण्याचा प्रश्नच येत नाही. राहिले सहिष्णू बाबतीत तर आजच्या किशोरवयीन मुलांमधे पेशन्स नाही सारासार विचार न करता कोणत्याही गोष्टीवर लगेच रिअ‍ॅक्ट करतात. ते बरोबर आहे की नाही हे बघण्याचा वृत्ती ही त्यांच्यात संपत चालली आहे."

यात काय चुकीचे बोलला. आज ट्विट फेसबुकवर जे चालू आहे त्यानुसार बरोबरच बोलला आहे.

मला हेमा मालिनी कोणास ठाऊक का पण कधीच आवडली नाही.
ऋषी कपूर आवडतो मला पण मेन अ‍ॅक्टर म्हणून इतक्या नाही दिसला तो.

या लिस्टीत प्रकाशराज येईल का?

Brad Pitt December 18, 1963 (age 51),
Robert Downey, Jr. (iron man) April 4, 1965 (age 50)
Tom Cruise July 3, 1962 (age 53),
Tom Hanks July 9, 1956 (age 59)
Leonardo DiCaprio November 11, 1974 (age 40)
Bruce willis March 19, 1955 (age 60)
Johnny Depp June 9, 1963 (age 52),
Matt Damon October 8, 1970 (age 45)
George Clooney May 6, 1961 (age 54),

आता या यादीत शारुखचा खप्पड चेहरा आणि झबा चा दोंद कुठे कोंबायचा ते तुच बघ !

म्हणे की पन्नाशीत सुद्धा शाखा बेस्ट(??) सिनेमे करतो का दिसतो. पण हाच प्रयोग म्हणे अमिताभ बच्चनच्या बाबतीत पुर्ण फसला. फारच मोठं विधान आहे. पन्नाशीचा असल्याने परिपक्व न दिसणं हे परिमाण असेल तर शाखा बालिशच की. आणि पन्नाशीत चांगलं दिसणं महत्वाचं आहे की अभिनय? Uhoh
अमिताभची हिरो म्हणून पन्नाशी नंतरची इनिंग फसली कारण पब्लिकला त्याला अ‍ॅक्सेप्ट करणं थोडं अवघड गेलं. तरूण असताना तो दिसायचाही उत्तम आणि अभिनयही उत्तमच करत होता. नंतर लोकांनी (२न्ड इनिंगमध्ये) अभिनय उचलून धरला अधिक त्यामुळे त्याचे दिसणे (वयोमानानुसारचे) नगण्य ठरले. नाहीतर आजही मला अमिताभ अधिक देखणा आणि रूबाबदारच वाटतो.
सेकंड इनिंगमध्ये बाकी हे सो कॉल्ड चॉकलेटी हिरो बघू किती टिकतात.

शाहिर आणा शिवाजीनगरचं पण नाव टाका यादित. आणि सिल्व्हेस्टर चं पण.

च्च च्च च्च पण ही यादी बॉलिवुडी नाहि हो... ई ना चॉलबे Proud

ऋन्म्या, तु द ग्रेट रजनीकांतला विसरलास.

रजनीदेवा ह्या ऋन्मेषला माफ कर. Proud

घ्या Proud
अहो रजनी कसला चिरतरूण? Proud
काहीही हं नमा तुमचं (जानी मोड ऑफ)

जानी वरून आठवला तो राजकुमार...
जिनके घर शिशेके होते है वो दुसरो पें पत्थर नही मारा करते बरं का.. Proud

आजही मला अमिताभ अधिक देखणा आणि रूबाबदारच वाटतो.
>>
+१
मलाही!

रजनीकांत आधीही आवडला नाही आताही नाही
(देवा मला माफ कर Proud )

रिया रजनी अ‍ॅक्टर म्हणून कदाचित सो सो च असावा. पण लोक अनेक गोष्टींमुळे मोठी होतात, तसा तो त्याच्यातल्या दिलदार माणसामुळे अधिक लोकप्रिय झाला. मी ऐकलंय की तो जेव्हा कोणताही सिनेमा साईन करतो तेव्हा त्या सिनेमाचं एकूण १०% उत्पन्न हे गरिबांच्या कल्याणार्थ दान करतो. खखोदेजा... पण हे खरं असेल तर रजनीला खरंच हॅट्स ऑफ!

>>रजनीकांत आधीही आवडला नाही आताही नाही (देवा मला माफ कर )<< १०० टके की बात !!
तो चिरतरुण नाहीच वाटत, अभिनय पण ठीकठाक च आहे...आणि अभिनयक्षमता बाजुला ठेवायची असेल "ॠ" च्या परिमाणांसारखी आणि नुसते थोबाड च बघायचे असेल तर मग मी म्हणीन सगळ्यात चिरतरुण सिम्मी गरेवाल च....She was the bestest Plastic woman Indian Cinema ever has !! Lol
काही ही बदल नाहीये, आधी होती तशीच, तेवढेच वजन, तसेच हावभाव etc. etc. Lol

मागल्या निवडणुकांच्या वेळी तो मतदान करायला रांगेत उभा राहिला तेव्हा लोकांनी त्याला आधी पुढे जायला सांगूनही तो रांगेत. मग लोक त्यांची जागा सोडून त्याच्या मागे उभे राहिले ! निवडणुक कर्मचारी उत्साहाच्या भरात त्याच्या बोटावर शाई उमटवायचे विसरले, हे लक्षात आल्यावर बाहेर पडत असलेल्या रजनीने परत धावत आत जाऊन शाई लाऊन घेतली.

पडद्यावरचे कलाकार म्हटले आहे तर खलनायक पण ...
अमरिश पुरी (४० व्या वर्षी कुर्बानी पासुन सुरवात केली , मि. ईडीयाच्या वेळी पन्नाशी उलटलेली होती).
प्राण ( सत्तरीमध्ये मध्ये पण उत्तम खलनायच्या भुमिका केल्या होत्या)

हाडाचा खुळखुळा असला तरीही अभिनय नावाची काहीतरी चिज होती ती त्याला माहित होती.

बाकी शाहरूख मला पण आवडतो, पण फाजिल महार लाड म्हणून मी नाही त्याचं गुणगान गात बसत येता जाता.

देवानंदचा अभिनय ज्वेलथीफ, गाईड अश्या बोटांवर मोजता येईल या चित्रपटात बघण्यात आला. ते नक्कीच आवडले. नंतर मिस्टर प्रायमिनिस्टर, हम नौ जवान सारख्या चित्रपटात बघितला. रामसे बंधुंचे चित्रपट परवडतील असे वाटले.

बोटावर मोजण्याइतपत? Uhoh

काला पानी
सी आय डी
हम दोनो
जॉनी मेरा नाम
तेरे घर के सामने
प्रेम पुजारी
टॅक्सी ड्रायव्हर
पेईंग गेस्ट
तेरे घर के सामने
काला बाजार
असली नकली
तीन देवियाँ
हम एक है
बम्बई का बाबू
नौ दो ग्यारह
जिद्दी
जब प्यार किसी से होता है
सोलवा साल
मुनिमजी
बात एक रात की
फंटूश
माया
हाऊस नं ४४

बाकी त्याचे अव्वल नंबर, डार्लिंग डार्लिंग, स्वामीदादा वगैरे सिनेमे पण बर्‍यापैकी हिट होते.
शाखाचे हिट सिनेमे काढा आणि घाला बोटं. आणि अजून बरेच सिनेमे मी यात पकडले नाही आहेत.

अरे जितेंद्रला कसे विसरलात. १९६४ मधे त्याचा गीत गाया पत्थरोंने गाजला आणि त्यानंतर अव्याहत अगदी १९८४ पर्यंत तो तोहफा सारखे हिट चित्रपट देत होता. १९९० मधे त्याचा हातिमताई आला, त्यात तो नायकाच्या भूमिकेत होता. त्यात तो होता ४८ वर्षांचा!!
पण एक खरं आहे की जितेंद्र वयाच्या मानाने तसा एकदम यंग आणि फिट होता, तोहफा मधे तो ४२ वर्षांचा होता आणि श्रीदेवी आणि जयाप्रदा दोघी २४-२५ वर्षांच्या होत्या पण तरी तो हिरो म्हणून त्यांना शोभून दिसला Happy

Plchh

येस्स !!
मि. क्लीन अर्थात जितेंद्र खरोखर च चिरतरुण कॅटेगरीत येतो.
कसला फिट्ट आहे राव तो !!!!!!
वयोमानाप्रमाणे चेहरा बदलला आहे तरी ही तब्येत उत्तम राखुन आहे, आणि स्वतः चा आब ही Happy [ त्याचे समकालीन दारु ने पार गेलेत, किंवा डोक्यावरील माथेरान विरळ होउन चक्क आजोबा दिसायला लागलेत, पण हा नाही !! :)] कुठले ही व्यसन नसणे हे एक महत्वाचे कारण आहे त्याच्या फिटनेस चे. दारु, सिगारेट काही ही घेत नाही, नाही तर त्याची पोट्टी बघा कशी ढालगज भवानी झालीये ते...
अनील कपूर ला पण ह्या लिस्टीत घ्यायला हरकत नाही...तो पण फाजिलपणा करतो, पण उगाच वाहावत नाही जात. दि.ध.दो मधे त्याने निभावलेली भुमिका खरोखर चांगली होती, इतके ही त्याचे वय नाहीये की अगदी प्रियंका आणि रणवीर चा तो बाप वाटेल, पण त्याने ती भुमिका सशक्त पणे उभारली.
त्याच्या पण फिटनेस का जवाब नही !!

प्रसन्न हरणखेडकर जितेन्द्र दारू पीत नव्हता ???
http://www.masala.com/my-insecurity-was-so-high-i-did-everything-that-ca...

How did you maintain such a disciplined life?
I was the most undisciplined man. I used to smoke around 80 cigarettes a day and used to drink heavily too. But in the last 13-14 years, I haven’t touched alcohol and gave up smoking as well. The change has to be made in the brain and then the heart.

मिथुन
मिथुन
इथून तिथून मिथुन

गुंडा हा जगप्रसिद्ध चित्रपट करते वेळी मिथुन ४८ वर्षांचा होता !

तसेच सुन्नी देओल आणि धर्मेंद्र ला विसरलात का?

दादामुनी अशोक कुमार. चिरतरुण अगदी नाही पण सदाबहार नक्कीच. कित्येक वर्षं सेम दिसत होते. यांचं वय पन्नाशीनंतर वाढलच नाही बहुतेक.

Pages