समकालीन गझल : गझल वाचन आणि चर्चा

Submitted by समीर चव्हाण on 6 November, 2015 - 09:43

समकालीन गझल : गझल वाचन आणि चर्चा

स्थळः स्नेहसदन सभागृह, नारायण पेठ पौलीस चौकी जवळ, शनिवार पेठ पुणे ३०

वेळः २१ नोव्हेंबर, संध्याकाळी ५.०० ते ८.००

गझल चर्चा: गझल आशय, स्वरूप आणि इतर गोष्टी
सहभाग : चित्तरंजन भट, विजय दिनकर पाटील, समीर चव्हाण, अनंत ढवळे

गझल वाचन
सहभाग : समीर चव्हाण, चित्तरंजन भट, विजय दिनकर पाटील, कैलास गायकवाड, संजय कुलकर्णी, प्रसाद लिमये, इंद्रजीत उगले, आणि अनंत ढवळे

समकालीन गझल : गझल वाचन आणि चर्चा ह्या कार्यक्रमाची काही ठळक वैशिष्टे स्पष्ट करणे गरजेचे वाटते. हा कार्यक्रम पूर्णतः अकाडेमिक उद्देश्याने होत आहे. उदघाटनाचे भाषण, दीपप्रज्वलन, कौतुकाची सुमने सारख्या अनावश्यक गोष्टींऐवजी विचारांना क्रेंदस्थानी ठेवणा-या गझलविषयी चर्चा कार्यक्रमाचा पहिला आणि महत्त्वाचा भाग असणार आहे. ज्यात मराठी गझलेची सद्यपरिस्थिती, समकालीन गझल ची आवश्यकता, उर्दू गझलेच्या परंपरेचे अवलोकन, मराठी गझलेतील प्रवासाच्या शक्य दिशा ह्यांवर भाष्य आणि चर्चा अपेक्षित आहे. दुसरा भाग गझलवाचन असणार आहे. सगळ्यांना विनंती की कार्यक्रमाला जरूर उपस्थित रहावे.

धन्यवाद.

समकालीन गझल

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुरुवारी मी समीर चव्हाण यांना वि.पु. करून विनंती केली होती की चर्चासत्रात मला भाग घेण्याची संधी द्यावी. मला तीन -चार मुद्दे मांडायाचे होते: १. द्वीभाषीय गजल, २. गजल चा गझल असा उच्चार का करू नये. ३. मात्रावृत्तात गजल रचायला का हरकत नसावी आणि ४. शब्दाच्या शुद्ध स्वरूपात बदल किती प्रमाणात असावा किंवा असू नये.

सर्व सदस्यांना हे सांगायची गरज नव्हती म्हणून वि.पु. केली होती. पण त्यांनी उत्तर दिले नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे. त्यांना या कार्यक्रमात माझा सहभाग नको आहे. अर्थात तो त्यांचा निर्णय आहे; आणि मला तो मान्य करावाच लागेल.

फक्त त्यामुळे मी वर लिहिलेले मुद्दे नष्ट होत नाहीत. त्यावर समग्र चर्चा झालीच पाहिजे. कधीतरी..., कुठेतरी ......!!

कदाचित ते नसतील माबोवर या काळात.

चित्तरंजन भट आणि अनंत ढवळे पण आहेत का ?
इंद्रजीत उगलेच्या एक दोन कविता वाचल्या. समीर चव्हाण स्वतः उत्तम गझलकार आहेत.

ज्ञानेश पाटील, सुरेशकुमार वैराळे इ. लोक येणार आहेत का ?