रतनगड ट्रेक स्टोरी भाग २_टाइगर ट्रेकर्स

Submitted by किरण भालेकर on 31 October, 2015 - 06:22

प्रत्येकाचे चेहरे बघण्यासारखे झाले होते.त्यांच्यात स्फूर्ती आणण्याची गरज होती. आमच्याजवळील माइक सिस्टीम बाहेर काढली आणि शिवछत्रपतींच्या आणि आई भवानीच्या जयघोषाने अवघे जंगल दुमदुमुन गेले.फक्त 6 जणांचा आवाज पण ऐकणाऱ्याला वाटावं कि 50000 हजारांची फौज गडावर चाल करुन येत आहे.

मित्रांमध्ये स्फूर्ती आली आणि पुन्हा नव्या दम्याने आणि जोशाने रतनगड जवळ करू लागलो.बरोबर तीन तासाने आमच पहिल टार्गेट पहिली शिडी गाठली.रतनगडच्या या शिड्या उभ्या कड्याला भिडलेल्या आणि काळाने खुप गंजलेल्या अवस्थेत आहेत.नजर वर करुन पहिल तरी दरदरून घाम सुटावा.एकावेळी एकच माणूस शिडीवरुन जाऊ शकतो.या शिडीवरुन तोल गेलाच तर मृत्युला खुल आमंत्रण दिल्यासारखे आहे.शिवछत्रपतींचा जयघोष आसमंतात दुमदुमत होता.या शिड्या अंदाजे 4000 किंवा त्यापेक्षा अधिक उंचीवर आहेत.वरुन खाली बघितल आणि आम्हाला कल्पना आली कि आम्ही किती मोठ शिखर सर केले आहे.अशा आडव्या -उभ्या शिड्या पार केल्यावर दरवाजा लागतो.दरवाजा आजही उत्तम स्तिथीमध्ये आहे.दरवाज्यावरील शिल्पकामही अप्रतिम आहे.
FB_IMG_1446798116361.jpgहनुमान शिल्प
FB_IMG_1446798111389.jpg

दरवाज्यातून आत गेल्यावर उजव्या हाताला एक प्रचंड कडा लागतो. जायला एक निमुळती वाट आहे आता शासनाने तेथे तटबंदी उभारली आहे.ईथे दोन गुहा आहेत.

रत्नादेवीची गुहा
IMG_20131026_114939_0.jpg

अंधारी गुहा रत्नादेवीच्या गुहेमध्ये 6 जणांचा ग्रुप आरामात राहु शकतो.तर मोठ्या गुहेमध्ये 20 ते 25 जण आरामात राहु शकतात.रत्नादेवीची गुहा ही आतून अतिशय उबदार ,स्वच्छ प्रकाशाची आणि सुरक्षित आहे.सकाळी लवकर गेल्यामुळे आम्हाला रत्नादेवीची गुहा रहायला मिळाली.गुहेमध्ये रत्नादेवीची अतिशय प्राचीन मूर्ती आहे आणि गणपती बाप्पाची सुद्धा प्राचीन मूर्ती आहे.रत्नादेवीची आम्ही सर्वानी विधिवत पूजा केली.आता आपल्याला कळले असेल की रत्नादेवीच्या नावावरूनच गडाला रतनगड असे नाव पडले.

गडावर पोहोचल्यावर आम्ही एनर्जीसाठी लिंबु सरबताचा बेत आखला होता पण रतनवाडीला लिंबु मिळालच नाही साखर तेवढी बरोबर होती.साखरेचे गोड पाणी आम्ही प्यायलो.पण ते गोड पाणी प्रचंड थंडगार आणि मधुर लागत होत.गडावर थंडगार पाण्याची दोन तळी आहेत आणि त्यामध्ये मुबलक पाणी बारमाही असते.त्याबरोबरच भेळ बनवली होती.थोडस पोटात गेल्यामुळे बर वाटत होते.विश्रांती केल्यानंतर आम्ही गड फिरण्यासाठी बाहेर पडलो.फोटोग्राफी साठी जणुकाही रतनगडावरील आकाशाला गवसणी घालणारी उंचच उंच शिखरे आम्हाला साद घालत होती.

आकाशाशी स्पर्धा करणारे रतनगडाचे सुळके
गडाच्या वैभवात भर टाकतात.ईथे आल्यावर आपण किती खुजे आहोत याची जाणीव होते.

IMG_20131026_131631.jpg

रत्नादेवीच्या गुहेच्या समोर डाव्या हाताला आकाशाला भिडलेला एक प्रचंड सुळका दिसतो तेथील गावकरी यांच्या मते त्या सुळक्यावर शिवपिंडी आहे व तिथून सतत पाण्याची धार चालु असते.प्रवरा नदीच उगमस्थान तेथे आहे याबद्दल गावकर्यांच्या मनात संभ्रम आहे. रतनगडावरील वातावरण अतिशय आल्हाददायक आहे.आयुष्यात इतकी शांतता प्रथमच अनुभवत होतो.मन अगदी निरभ्र होऊन गेले होते.तेव्हाच मनाशी ठरवले की आयुष्यात पुन्हा कधीतरी नक्कीच या ठिकाणी येईन.

किरण भालेकर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही.त्यावेळी राहुनच गेल आता परत योग येईल तेव्हा नक्की जाणार.पाण्याची टाकी ,खुटा बुरुज,राणीचा हुडा ,रत्नादेवी गुहा इतकेच बघणे झाले आहे.

किरणजी आपलं स्वागत! एक सूचना करावीशी वाटतेय. दोन्ही धागे खूपच कमी लांबीचे आहेत, तेंव्हा सर्व एकाच धाग्यात सामावता येऊ शकेल अगदी फोटोसहीत. आपल्यालाही आपलं लिखाण एकाच धाग्यावर असल्यावर शोधायला सोप्पं जाईल.

फोटोसुद्धा येऊ द्यात!

रतनगड म्हणजे ट्रेकर लोकांच्या आवडत्या ठीकाणातील एक. कितीही वेळा गेलो तरी मन भरणार नाही असा हा परिसर. ह्या भागात जंगली प्राणी देखील आहेत आणि आपण डोंगर कडयांमध्ये जाउन बोंबा (अनेक शिवप्रेमी ट्रेकर याला घोषणा असे म्हणतात) मारल्याने पक्षी प्राणी दिसणे अशक्य होते. तेंव्हा भविष्यात ते टाळा. ६ शिडया कुठल्या?

कावेरी नदीचा उगम खुट्टा सुळक्यावर?
रतनगडावर प्रवरेचा उगम आहे. कावेरीचा कर्नाटकात तलकावेरीला आहे.
रतनगडावरील आडव्याउभ्या ६ शिड्या कुठल्या?

माईक सिस्टीम घेऊन गेला होतात? सह्याद्रीत फिरण्याची खरी मजा तिथल्या शांततेत आणि त्या डोंगर-दर्‍यांमध्ये मिसळून राहण्यात-भटकण्यातच आहे...

मागे एकदा वासोट्याला 'मेट इंदवली' मध्येही असा अनुभव आला होता. रात्रीच्या निरव शांततेत तिथे आलेलं पब्लिक म्युझिक सिस्टीमवर गाणी लावून नाचत होतं. तिथले दोघे वनरक्षकही काही करू शकले नाहीत. रात्रीची शांतता ऐकायची संधी त्या पब्लिकनी घालवली. त्यांनी जंगल डिस्टर्ब केलं ते वेगळंच!

सर्वांच्या प्रतिक्रियाबद्दल धन्यवाद.नक्कीच यापुढे काळजी घेईन.हेमभाऊ चुकून कावेरी म्हटले प्रवरा नदी बरोबर आहे.मुख्य शिडया २ आहेत.पुढे २ छोट्या शिड्या आहेत.बाकी पायरया म्हणायला पाहिजे होते.

नचिकेत सर(आनंदयात्री) तुमचेच ब्लॉग वाचत आतापर्यंत सह्याद्री अनुभवला.आपण बरोबर बोललात.डीजे संस्कृती मलासुद्धा आवडत नाही.मित्रांना विरोध करू शकलो नाही.यापुढे नक्कीच काळजी घेईन.

मी पाचवेळा गेलो म्हणण्यापेक्षा दोनवेळा खरा पोहोचलो.एकदा वाट चुकली ,एकदा नोव्हेंबरातल्या पावसाने परत आलो एकदा वेळ कमी पडला तरी प्रत्येकवेळी सह्याद्री अनुभवलाच.पहिले दोन प्रयत्न साकुर्ली/चोंढेकडून.