खुलासा...

Submitted by सत्यजित... on 28 October, 2015 - 17:43

आयुष्य भोगताना,पडले प्रसंग खासा...
ढळलो तरी न केंव्हा,जगलो जरा-जरासा!

आले कितीक गेले,उडले थवे व्यथांचे...
दारात एक चिमणी,करतेय गल्बलासा!

चुकतात चार वाटा,चालायचेच ना रे?
हिम्मत जरा भरू दे,देवू नको दिलासा!

आयुष्य का कुणाला देते हिशोब कसला?
उपभोगणेच असतो,त्याचा खरा खुलासा!

आहे अजून बाकी,ठिणगी उरात माझ्या...
पेटेल रान आता,भरतोय मी उसासा!
—सत्यजित

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे

चुकतात चार वाटा,चालायचेच ना रे?
हिम्मत जरा भरू दे,देवू नको दिलासा!
आवडले.

छान

छान