अल्लड पोर ....

Submitted by कविता क्षीरसागर on 28 October, 2015 - 12:47

माझ्या मुलीवर केलेली ही कविता ...

प्रत्येकाला आपल्याच मुलीसाठी आहे असे वाटायला लावणारी....

बघता बघता
होईल मोठी
एवढीशी ही अल्लड पोर

जपता जपता
काळी दिठी
जिवाला माझ्या लागेल घोर

अन् एक दिवस
सनईचे सूर
दारात माझ्या येतील

हात तिचा
घेऊन दूर
माझ्यापासुन नेतील

दिवस भराभर
खरंच सरतील
उडुन जातील अत्तरासारखे

शैशव तिचे
दुडदुडत राहील
अंगणात, घरात, मनात सारखे ...

कविता क्षीरसागर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमचे पोर ...

बाब्या , तू घर घ्यायचे म्हणून घर दाखवायला नेतोस पण सगळी घरे लहान असतात. मोठं घर घे की.

' मोठ्या घराला पैसे जास्त लागतात. '

' किती जास्त लागतात ? माझ्या डब्यातले पैसे घे. '

सुंदर!!

आमची आर्या झाली तेंव्हा दुसर्‍या दिवशी तिला घेऊन बसलो होतो. तुमच्या या कवितेतली शेवटची चार कडवी अगदी मनात उतरली होती.. आणि तिथून डोळ्यात ..
अजूनही मी पोरीला जवळ घेतो तेंव्हा हेच विचार येतात मनांत बर्‍याचदा.. मग आणखी जवळ घेतो तिला.. Sad
बायको चेष्टा करते माझी नेहमी. Happy

धन्यवाद बी , पद्मावती …

खरं आहे किरू … आपल्याला आपल्या मुली नेहमी लहानच राहाव्याशा वाटत असतात .
मुलगी हे परक्याचं धन … ही झाली रूढी , परंपरा… समाजात चालत आलेल्या परंपरांना कधी
कधी धुडकावून लावावंसं वाटतं अशा वेळी …

आपली लेक आपल्या पासून दूर जाणं ( मग भले ती लग्न होऊन जावो वा शिकण्यासाठी जावो )
ही कल्पना पचनी पडायला फारच अवघड जातं ….