केवढे उत्पात घडले असते!

Submitted by मुग्धमानसी on 27 October, 2015 - 03:53

असतेच देवळात देव तर...
केवढे उत्पात घडले असते!
नसतेच मनात भेव तर...
केवढे उत्पात घडले असते!

रस्ते ठाऊक असते तर अन्
वळणे आंधळी नसती तर...
पोचायचे कुठे ते कळते तर...
केवढे उत्पात घडले असते!

प्रत्येक नजरेत असती नशा,
धुंदच असत्या सगळ्याच दिशा
सत्यच स्वप्न असती तर...
केवढे उत्पात घडले असते!

नाती आतून धगधगणारी
वरून शांत डोहागत...!
मुखवटे नसतेच आपल्याजवळ तर...
केवढे उत्पात घडले असते!

मी न बोलणं, तुला न कळणं...
हेही ठीक, तेही ठीक...
मनातलं सगळंच कळतं तर...
केवढे उत्पात घडले असते!

झाकून घेतलाय जाळ तरिही
पोळतेय त्यांना माझी धग!
नग्न उसळले असते तर...
केवढे उत्पात घडले असते!

अंताच्या हळव्या हाकांना
भुलूनी धावती आयुष्ये ही!
अंत खरोखर असते तर...
केवढे उत्पात घडले असते!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाती आतून धगधगणारी
वरून शांत डोहागत...!
मुखवटे नसतेच आपल्याजवळ तर...
केवढे उत्पात घडले असते!

मी न बोलणं, तुला न कळणं...
हेही ठीक, तेही ठीक...
मनातलं सगळंच कळतं तर...
केवढे उत्पात घडले असते!

झाकून घेतलाय जाळ तरिही
पोळतेय त्यांना माझी धग!
नग्न उसळले असते तर...
केवढे उत्पात घडले असते!
>>>
वाह!
आवडलीच

खुप दिवसांनी...
हे मस्त आहे... खरंच..
>> मनातलं सगळंच कळतं तर...
केवढे उत्पात घडले असते!