पांढरा रंग …

Submitted by कविता क्षीरसागर on 25 October, 2015 - 04:27

पांढरा रंग …

संतापाच्या 'लाल' भडक रंगामध्ये
हळुवारपणे मिसळला प्रेमाचा पांढरा रंग
की मग व्हावेच लागते त्यालाही
गुलाबी गुलाबी …

सृष्टीच्या जून , जर्द पिकल्या 'पिवळ्यामध्ये '
हळुवारपणे मिसळला पाण्याचा निळ्सर पांढरा रंग
की आपोआपच फुटू लागते चैतन्य पालवी
पोपटी पोपटी …

गूढ गहन डोहाच्या गर्द 'निळाईमध्ये"
हळुवारपणे मिसळला समर्पणाचा पांढरा रंग
तर मग तो ही होतो सर्वव्यापी
आकाशी आकाशी …

हे करारी, आडमुठे 'मूळ रंगही "
बदलतात आपला स्वभाव
फक्त व्हावे लागते त्यासाठी
त्यांच्यामध्ये आत्मसमर्पण करणारा
पांढरा रंग ….

कविता क्षीरसागर

Group content visibility: 
Public - accessible to all site users