आभाळ उले

Submitted by mrsbarve on 21 October, 2015 - 21:46

आभाळ उले
घन निळे जांभळे
दरयात उतरले
तिन्ही सांजेचे

फांद्यांची किनार नक्षी
आकाशाच्या भाळावरती
हळुवार डुले झोक्यावरती
माळून वेण्या गोरी छोरी

समेवर थांबायाला
आसुसलेले गाणे
सांगत येई झुळूक
रे जाईचे रान रिकामे…!

खळाळले ओढे भरले
भोवरे पाण्यातले खुळावले!
थांबल्या धारा तेंव्हा
रान रिकामे हळहळले!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users