बंदीवान …

Submitted by कविता क्षीरसागर on 21 October, 2015 - 10:09

बंदीवान …

आली साळुंकी दारात - पुसे " येऊ का घरात?
उडायचे बळ आता - नाही उरले पंखात

सोसाट्याच्या वार्याने या - माझे घरटे तोडले
माझ्या उपाशी पिलांना - क्रूर काळाने ओढले

होते आधीच भिजत - डोळ्यातल्या पावसाने
आधाराला वृक्ष तोही - कोसळला वादळाने

झाले निराधार पुरी - आले तुझिया दारात
बळ पंखात येईतो - घे ना ठेऊन घरात "

तिची करून कहाणी - माझे हृदय द्रवले
तिला आत घ्यावयाला - दाराकडे मी धावले

पण वाटेतच माझे - पाय झाले जणू शिळा
बंदिवान मीच इथे - कैदी वाढवू कशाला ?

दुख जाईल लयाला - बलवान आहे काळ
तुला तरी सखे - असो मोकळे आभाळ ….

कविता क्षीरसागर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बंदिवान नावाची माझी फसल ( फसलेली गझल जी गझल तंत्रात बसली नाही ) फक्त माहितीसाठी

बंदिवान ह्या नावाच साधर्म्य असल्याने मोह आवरत नाही.

http://www.maayboli.com/node/19439

नितीनचंद्र , आपली गझल सदृश रचना वाचली . खूपच छान आहे .
मी सुद्धा तुमच्यासारखीच गझल न करता येणारी पण आपल्याला कधी गझल जमेल
असे स्वप्न पाहणारीच आहे .
आता या समूहाशी संलग्न झाल्यावर काही तरी जमेल अशी अशा बाळगते
कारण इथे बरेच गझलेतले जाणकार आहेत आणि त्यांचे मार्गदर्शन मिळाले तर ते
आपल्यासारख्यांना हवेच आहे

छान!

'गझलेची बाराखडी' आणि बेफिजींनी लिहिलेला 'गझलतंत्र' लेख नक्कीच उत्तम मार्गदर्शक आहेत!