सेहवाग !

Submitted by असामी on 20 October, 2015 - 12:54

सेहवाग आज निव्रुत्त झाला. तसा तो गेले काही वर्षे असूनही नसल्यासारखाच होता. तसा दोन वर्षांपूर्वी IPL बाद फेरीमधे जुना सेहवाग दिसला होता ते चमकणे अल्पजिवीच होते. सेहवाग काय चीज होता ह्याचे वर्णन शब्दांमधे करणे अशक्य आहे. किंबरचा haa लेख सेहवाग काय होता हे बरोबर पकडतोय असे वाटले म्हणून इथे डकवतोय.
http://www.espncricinfo.com/magazine/content/story/930743.html

शोअब अख्तर वरचा 'येह बॉलिंग कर रहा है कि भीक मांग रहा है' हा सेहवागचा संवाद सगळ्यांना माहित असेलच पण सेहवाग खर्‍या अर्थाने व्यक्त झाला असेल तर तो 'सचिन नि त्याच्यात काय फरक आहे' हे विचारल्यावर वैतागून 'हमारा बँक बॅलंस' म्हणाला त्यात. त्याच्या बॅटीम्ग सारखाच uncomplicated, simple approach नि simple उत्तर. see the ball, hit the ball हे म्हणणे सोपे आहे पण तसे सहजपणे करू शकणारे जे काहि मोजके लोक झालेत त्यात सेहवाग फार वर असेल. अगदी त्याच्यावर तो भारतीय पिचेसवर दादा होता ह्या आक्षेपासकट त्याच्याएव्हढे सहजपणे sub continental पिचेसवर कोणीच खेळले नसेल.

ऐन भरातले सचिन, राहुल असतानाही स्वतःची एक वेगळी identity निर्माण करणे हा सेहवागच्या कारकिर्दीतला सर्वोच्च बिंदू ठरावा. Big 4 पेक्षा काहीतरी नि कधीतरी त्यांच्यापेक्षाही अधिक मौल्यवान असे काहीतरी तो भारतीय क्रिकेटला देऊन गेलाय असे वाटते. आज जो निर्भीड बॅटींग approach भारतीय बॅटींग मधे दिसतो त्याची मूळे कुठेतरी सेहवागच्या खेळातून आली आहेत. प्रतिपक्षातला मुख्य बॉलर टारगेट करायची सुरूवात सचिन ने केली होती त्याचा कळस सेहवाग ने मुरली बरोबर केला. मुरली सारखा बॉलर एव्हढा हताश झालेला कधीच दिसला नव्हता जेव्हढा तो सेहवाग विरुद्ध दिसत असे - अगदी लंकेमधेही. मुरलीची बॉलिंग तो एव्हढ्या सहजपणे कशी हँडल करत असेल ह्यावर त्याचे उत्तर भलतेच गमतीशीर होते.
"I was not able to pick doosra, so I treated every ball as a doosra and tried to hit it," he said. "But I found them to be off-spinners. It did not matter much as I was getting boundaries." "

सेहवागची बॅटींग किंवा त्याच्या बॅटींगमधला attitude मला नेहमी ऑस्ट्रेलियन खेळाडूंची आठवण करून देत असे. स्वतःच्या बॅटींग ability वर अपरिमीत विश्वास ठेवून जे काही target असेल त्याला सामोरे जायचे. Simply back your ability up and do not try to get cute with anything. फारसे classical batting technique नसताना, Hand eye co-ordination वर आधारित असलेल्या (नि फास्ट बॉलर्स विरुद्ध प्रचंड लिमिटेड फूटवर्क ठेवूनही) असलेल्या त्याच्या बॅटींगला मिळालेले घवघवीत यश हा त्याचाच परीपाक. वाढत्या वयानुसार नि बदलत्या eyesight नुसार त्याने स्वतःच्या approach मधे बदल केला असता तर तो अजून अधिक काळ राहिला असता. पण मग 'तो सेहवाग राहता का ?' हा प्रश्न अनुत्तरीतच राहील.

सामन्याच्या परिस्थितीकडे संपूर्णपणे दुर्लक्ष फक्त टाकला गेलेला बॉल कसा आहे ह्या criteria वर खेळत सामना खेचून आणण्यासाठी सेहवागला पर्याय नव्हता. Richards नि Gilchrist वगळता संपूर्ण सामन्याची दिशा तासाभरात बदलून टाकण्याची क्षमता असलेला नि तसे वारंवार करू शकलेला सेहवाग हा एकमेव खेळाडू. (ट्रेंट ब्रिज २००२, मेलबर्न २००३-०४, चेन्नई २००४, मुलतान २००४-२००५ , गॅले २००८, चेन्नई २००८ , मुंबई २००९, कलकत्त २०१० जंत्री अजूनही लिहिता येईल) He has that uncanny ability to take game by it's neck. निव्वळ ह्या एकमेव कारणासाठी All time Indian XI मधे सलामीची जोडी म्हणून गावस्कर बरोबर नेहमी सेहवाग असेल.

मला वाटते, सेहवागच्या Retirement statement मधली हि वाक्ये सेहवाग अचूकपणे होता दाखवतात. Happy
"I also want to thank everyone for all the cricketing advice given to me over the years and apologise for not accepting most of it! I had a reason for not following it: I did it my way! "

अमोल तुला झब्बू देतोय, पुढे लिहीच.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोखठोक क्रिकेट सेहवाग... जो फक्त आनंद मिळवण्यासाठी आणि देण्यासाठी खेळला. बाकी तंत्र, निकाल, डावपेच सगळं खड्ड्यात.

२००३ च्या वर्ल्डकप मधला शोएबला मारलेला सिक्स म्हणजे सेहवाग सिग्नेचर!!!

लेख मस्तच झालाय. आवडला

असामी उत्तम लेख..

सेहवाग ची खेळी म्हणजे अगदी डोळ्याचे पारणे फिटल्यासारखे वाटायचे.
आज सकाळ मध्ये पण छान लेख आला आहे.

"त्रिशतकी नवाबाला सलाम"

लेख छान, प्रतिक्रिया पण मस्त.
काल सोशल मिडिया वर भारताच्या 'fantastic five' चा फोटो आणि त्यावर प्रतिक्रिया 'my childhood is over' फिरत होता. किती अ‍ॅप्ट. एकापाठोपाठ एक सगळे रिटायर झाले की ! सौरव, लक्ष्मण, द्रविड, सचिन आणि आता विस्फोटक सेहवाग! एक पर्व संपलं ! फार भावनीय व्हायला झालं. या पूर्वी भारता कडे चांगले खेळाडू नव्हते का ?निश्चितच होते. आताही आहेत, आणि नंतरही होतील. पण खरंच या पाच जणांनी जो काही आनंद दिलाय लहानपणापासून तो काही औरच . या पाचही जणांची शैली पूर्ण पणे वेगळी.
सेहवाग रिटायर होणार. हे ऐकताच, त्याच्या खेळी पटापट डोळ्यासमोरुन गेल्या. स्थळ, काळ, प्रतिस्पर्धी टीम आठवल्या नाहीत. आठवलं ते फक्त बेधडक, बिनधास्त अ‍ॅटीट्यूड. पहिल्या बॉल पासून आउट होईस्तोवर तोच अ‍ॅटीट्यूड. याला माज नाही म्हणता येणार, याला आत्मविश्वास म्हणता येईल फक्त. ते फक्त सेहवागलाच जमायच . कधी कधी या नादात लवकर आउट व्हायचा, पण तरी तो बदलला नाही .
Nawab of Najafgarh and Sultan of Multan... we are gonna miss u !!!

सी इट, वॅक इट, फर्गेट इट ! दाय नेम इज सेहवाग.

टेस्ट मध्ये ८२ + स्ट्राईक रेट असणारा हा माणूस. वन डे पेक्षाही मला तो टेस्ट मध्ये जास्त आवडायचा.

गावस्कर, तेंडुलकर आणि द्रविड ह्यानंतर सेहवाग मग दादा, लक्ष्मण इत्यादी. (दादा माझाही आवडता आहे तरी पण !)

दादा ची टेस्ट मधे डेब्यू ची लॉर्ड्स वरची आणी नंतर ब्रिस्बेन मधे २००३ मधली १४०+ ईनिंग सोडली तर टेस्ट मधलं असं विशेष (फलंदाज म्हणून) काही लक्षात नाही. टेस्ट मधे सेहवाग, द्रविड, तेंडुलकर, लक्ष्मण आणी कुंबळे हे मला नेहमी फॅब फाईव्ह वाटत आले आहेत.

चॅपेलशी पंगा घेउन २००७च्या WC मध्ये द्रवीडने सेहवागला संघात ठेवला होता, तेही तो फॉर्मात नसताना, त्या द्रवीडचा साधा उल्लेखही केला नाही सहवागने.... आश्चर्यच वाटल जरा Sad

माझ्या आठवणीत चॅपेल चा सेहवाग ला विरोध नव्हता. लक्षात नाही काही तसे वाचल्याचे.

फेरफटका, दादा बद्दल विपुत लिहीतो.

आणि हा द्रवीडचा सपोर्ट:
But Dravid, on who's insistence Sehwag reportedly made it to the World Cup squad, added that India would not be afraid to use other options. "We have the option of four guys who can open the batting. Sourav Ganguly, Sehwag, Robin Uthappa and Sachin Tendulkar - they have all opened the batting, and some have done it for longer than others.

रेफरंस : http://www.espncricinfo.com/wc2007/content/story/284735.html

ओह आठवले आता :). धन्यवाद बुमरॅंग.

अजून एक किस्सा - सेहवाग आणि जहीर च बहुधा ते दोघे - जॉन राईट ने त्याच्या पुस्तकात लिहीले होते. त्याने कोच करायला सुरूवात केल्यावर "लंच टाईम" मधल्या खाण्यावर कंट्रोल आणायचा प्रयत्न तो करत होता. एका मॅच मधे लंचला सगळ्या ग्रूप मधून हे दोघे गायब झालेले दिसले. त्याने शोधल्यावर सापडले - बफे मधून चिकन व इतर काय काय 'हेवी' पदार्थ प्लेट मधे भरभरून घेउन लपून बसले होते खात Happy

द्वारकानाथ संझगिरींचा एक लेख फिरतोय तो पण मस्त आहे. Happy

रिटायरमेंटनंतर रणजीला सेंच्युरी टाकली. Happy

Sehwag, who announced his international retirement on Tuesday, did not disappoint the spectators as he cracked a strokeful 136 runs in 170 balls with 16 fours and 3 sixes.

तसा तो गेले काही वर्षे असूनही नसल्यासारखाच होता. तसा दोन वर्षांपूर्वी IPL बाद फेरीमधे जुना सेहवाग दिसला होता ते चमकणे अल्पजिवीच होते.>>>>>>>
मी त्याचा शेवटच्या काळातला प्रत्येक सामना पहायचो आणि प्रार्थना करायचो की देवा याला आज तरी सूर मिळु दे. दुर्दैवाने ते झालेच नाही. असो.
क्रिकेटवर राज्य केलेल्या या बादशहाला सलाम!

मी त्याचा शेवटच्या काळातला प्रत्येक सामना पहायचो आणि प्रार्थना करायचो की देवा याला आज तरी सूर मिळु दे.
>>>>
करोडो प्लस वन .. पंजाब बरोबर खेळताना थोडा सूर गवसतोय असे वाटायचे मध्येच, पण खरे तर आयपीएल आणि २०-२० हा त्याचा या वयात फॉर्मेटच नाहीये. त्याला आंतरराष्ट्रीय लेवलला कसोटी खेळवायला उतरवायचे होते बिनधास्त, कदाचित मधल्या काळात परदेशात जे लाजिरवाणे व्हाईटवॉश झाले त्यातील एकाची किस्मत बदलली असती त्याने.

"त्याला आंतरराष्ट्रीय लेवलला कसोटी खेळवायला उतरवायचे होते बिनधास्त" - ऋन्मेष, तुम्ही काढलेल्या दुसर्या एका धाग्यात (एका पर्वाचा अस्त) ह्याचं उत्तर आहे. Happy

फेरफटका,
तुम्ही माझ्या हेडरमधील या पोस्टबद्दल म्हणत आहात का Happy
याआधी खुद्द धोनीवर देखील संघनिवडीचे राजकारण केल्याचे, सिनिअर खेळाडूंचा पत्ता कापल्याचे, गंभीर-सेहवाग-युवराज-हरभजन यासारख्या खेळाडूंची कारकिर्द संपवल्याचे आरोप झाले आहेतच.

हे नसेल तर सांगा उत्तर, ४०० पोस्टमधून शोधू शकत नाही Happy