एक मंत्र... सुंदर जीवनाचा.

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 20 October, 2015 - 03:29

20151016_183828.jpg

एक मंत्र... सुंदर जीवनाचा.

( आकाशातली चंद्रकोर पाहीली आणि काहीस सुचलं तेच मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न.. जीवनात आलेल्या वा असलेल्या एका महत्त्वाच्या व्यक्तीला चंद्राची उपमा देऊन लिहिलेलं...)

पूर्णत्व दाखवणाऱ्या पौर्णिमेच्या चंद्राच सौंदर्य वेगळ आणि त्याचच एक अपूर्णत्व सिद्ध करत असणार्या त्याच्याच चंद्रकोरीच सौंदर्य वेगळ... माणसाचही असच असत ना ? त्याची पूर्ण ओळख पटली कि तो वेगळा भासतो आणि अशाच एखाद्या क्षणी त्याचा एखादाच गुण नजरेस आढळला आणि तो आवडला तर त्याच अस्तित्व आवडू लागत. पण चंद्र जसा अमावास्येला साथ सोडून जातो तसाच माणूस देखील आयुष्यातून निघून गेला तर त्याच नसण त्रास देत राहत. छळत राहत. मग पुन्हा वाट पाहण नशिबी येत, पण जीवापाड प्रेम असल तर तेच चंद्राच अस्तित्व स्विकारण सोप्प जात, त्याचेच दुर्गुण आणि त्याचेच सद्गुण स्वीकारले जातात. तो स्वभाव समजून घेतला जातो आणि मग अंधार्या रात्रीही त्याच नसूनही असलेल अस्तित्व जाणवत आणि उदास झालेलं मन मोहरून जात... कारण माहित असत... आज तो नाही पण येइलच न पुन्हा परतून.. शेवटी जादू आपल्याच प्रेमाची... आणि ह्याच जादूने नात टिकून राहत... शेवटी अपुर्णत्त्व, त्याचा शाप असला तरी सौंदर्य असतच कि सोबतीला .. तसंच शोधायच .. वाईट दिसत असल तरी चांगल कुठेतरी असतच लपलेलं.. त्याला पाहायचं आणि जगायचं, मग जगण सुकर होऊन जात. ह्यालाच म्हणतात बहुदा सकारात्मक दृष्टीकोन.

मयुरी चवाथे-शिंदे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users