दागिने...

Submitted by सुप्रिया जाधव. on 17 October, 2015 - 08:16

तिच्या पैंजणाचा नाद
पाळण्याला खुळावतो
त्याची चाहूल घेण्याला
जो-तो पुढे सरावतो

किणकिण बांगड्यांची
तिची व्यग्रता सांगते
माजघर, न्हाणीघर
तिच्या चुगल्या लावते

तिची नथणी-जोडवी
जर सौभाग्य प्रतिके
स्पष्ट बोलण्या-चालण्या
पायबन्द का घालते

गळ्यातली काळी पोत
सुलक्षणी सांगायला
गाय परक्या घराची
दावणीला बांधायला

किती काचला तरिही
मिरविते जरी-काठ
जनरित निभवाया
चाले संसाराची वाट

कुणी असभ्य मवाली
येता जाता पाहे जिंकू
जर पुसले असेल
तिच्या कपाळीचे कुंकू

नखशिखान्त सख्याने
तुला असे मढविले
त्याचे कारस्थान सारे
दागिन्यात दडविले

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती खरी आहे .मध्यंतरी वर्तमानपत्रात नथीबद्दल लेख आलेला ,नथनीचा मूळ अर्थ वेसण असा आहे जी पूवी उंटाला घालत असत,छान कविता.