केसात माळला होता...

Submitted by वैभव देशमुख on 14 October, 2015 - 09:53

केसात माळला होता
तेव्हा तू चाफा हिरवा
अन हलक्याशा झुळकीने
श्वासात पेटला वणवा

बोटात गुंतली बोटे
तळव्यास बिलगला तळवा
आकाशी सोडुन डोळे
तृप्तीनंतरचा थकवा...

- वैभव देशमुख

Group content visibility: 
Public - accessible to all site users