दोन दशकं उशीराचा 'जज़बा' (Movie Review - Jazbaa)

Submitted by रसप on 11 October, 2015 - 01:47

हताशा आणि संताप ह्यांचा संमिश्र परिणाम म्हणून एका प्रसंगात मातीत जोरजोराने हात आपटून धूळ उडवून झाल्यावर तिथेच जवळजवळ साष्टांग लोटांगण घेऊन ऐश्वर्या बाई बच्चन हमसाहमशी रडतात. गर्द काळे कपडे. बारीक लालसर माती. (संजय गुप्ताचे आवडते रंग!)

लगेच पुढच्याच प्रसंगात रडण्याचा सिक्वल ऐ.बा.ब. स्वत:च्या गाडीत ड्रायव्हिंग सीटवर बसून सुरु करतात. तेव्हा कपड्यांवर धूळ, मातीचा लवलेशही दिसत नाही. इतक्यात अचानक अवतरलेला इरफान खान बाजूच्या सीटवर येऊन बसतो आणि त्यांचा सिक्वल अपूर्णावस्थेत थांबवतो. मग दोघे गाडीबाहेर येऊन 'सत्य' समजून घेतात. ते ऐकून इरफानसुद्धा हताशा आणि संताप ह्यांचा संमिश्र परिणाम अनुभवतो. आजूबाजूला असलेल्या जुन्या लोखंडी मोठमोठ्या पिंपांना लाथा मारतो, उचलून फेकतो, पुन्हा लाथा मारतो, पुन्हा फेकतो ! ऐ.बा.ब. चं एक वेळ ठीक आहे, पण नेहमी संयत असणाऱ्या इरफान खानला अचानक काय झालं काही कळत नाही !
विशेष काही नाही. त्याला संजय गुप्ता भेटलेला असतो.

अजून एका प्रसंगात शाळेत एक धावण्याची शर्यत असते. ही एक अशी अभिनव शर्यत आहे, की तमाम 'ब्रॅण्डेड' आंतरराष्ट्रीय शाळांना, सॉरी 'स्कूल्स'ना, न्यूनगंड यावा. ह्यात प्रत्येक मुलीबरोबर तिच्या आईनेही भाग घ्यायचा असतो. सुरुवातीला मुलगी धावणार आणि नंतर 'बॅटन' आईकडे सोपवणार. मग आईने धावून शर्यत पूर्ण करायची ! ह्या शर्यतीसाठी समस्त माउलींनी त्यांचा नेहमीचाच पेहराव करणे, बंधनकारक होते की नाही, हे माहित नाही. पण आपल्या 'ऐ.बा.ब.' त्यांच्या रोजच्या 'काळा सूट आणि काळी पॅण्ट' ह्या गणवेशातच उतरतात. कुणाचीही आई साडी नेसत नसावी कारण इतर सर्व स्पर्धक माउल्या पंजाबी ड्रेसमध्ये असतात.

ही विचित्र शर्यत संपूर्ण चित्रपटाचं प्रतीकात्मक सार आहे. अशीच एक विचित्र शर्यत नंतर वकीलीण अनुराधा वर्मा (ऐ.बा.ब.) धावते. आपल्या मुलीचं - 'सनाया'चं - पालनपोषण एकटीनेच करणारी अनुराधा शहरातल्या सर्वोत्तम वकीलांपैकी एक असते. आजपर्यंत आपल्या कारकिर्दीतील एकूण एक केसेस जिंकलेल्या अनुराधाच्या एकुलत्या एक मुलीचं अपहरण केलं जातं आणि तिच्या सुटकेच्या बदल्यात अट ठेवली जाते ती बलात्कार व खूनाचा आरोप सिद्ध होऊन फाशीची शिक्षा सुनावली गेलेल्या 'नियाझ' नामक एका गुन्हेगाराचा खटला हाय कोर्टात लढवून त्याला सोडवण्याची. मुलीच्या विरहाने कानठळ्या फोडणारा आरडाओरडा करणारी अनुराधा ह्या विचित्र द्विधेत अडकल्यावर जरासुद्धा मेलोड्रामा न करता ताबडतोब कामाला लागते. ह्या कामात तिला मदत करतो, शाळेपासून तिचा मित्र असलेला निलंबित पोलीस निरीक्षक 'योहान' (इरफान खान). तो अनुराधावरील आपल्या एकतर्फी प्रेमाला कोंदणातल्या हिऱ्याप्रमाणे मनात जपून असतो. दोघे मिळून ह्या प्रकरणाला कसं फिरवता येईल आणि 'सनाया'ला कसं वाचवता येईल, ह्यासाठी झटतात.

सरकारी वकिलाच्या भूमिकेत अतुल कुलकर्णीला अगदीच थोडंसं काम आहे, तर एका राजकीय नेत्याची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या जॅकी श्रॉफला त्याहूनही कमी !
शबाना आझमींनी रंगवलेली व्यक्तिरेखा आहे 'गरिमा चौधरी'. ज्या मुलीवर पाशवी बलात्कार करून तिचा खून केल्याच्या आरोपाखाली 'नियाझ'ला फाशीची शिक्षा झालेली असते, तिची आई. ऐश्वर्या बच्चन आणि शबाना आझमी जेव्हा जेव्हा एकमेकांसमोर येतात, तेव्हा तेव्हा एका आईची घुसमट कशी असते, हे शबाना आझमी ऐ.बा.ब. ना प्रत्यक्ष दाखवतात. पण सुनबाई काही केल्या बोध घेत नाहीत. त्या फक्त थयथयाट, आकांडतांडव, आरडाओरडा वगैरे धसमुसळेपणा करण्यात धन्यता मानतात. त्यामुळे जितकी 'गरिमा चौधरी' आश्वासक वाटते, तितकीच 'अनुराधा वर्मा' भंपक.

कमलेश पांडे ह्यांनी लिहिलेले संवाद खुसखुशीत आहेत. मात्र त्या खुसखुशीत पणातला ९०% भाग इरफान खानसाठी राखीव आहे. Needless to say, त्याने त्याचं सोनंही केलंच आहे !
'इरफान'चा जबरदस्तीने 'इरफानिताभ' करण्याचा प्रयत्न स्वत: इरफाननेच हाणून पाडला आहे. त्याला स्टाईल मारायला लावलेली आहे. खुसखुशीत डायलॉग्ज दिले आहेत. तो हे सगळं करतो, पण तरी स्वत:चं वेगळेपण जपतोच. 'तलवार'नंतर पुन्हा एकदा तो साधारण तश्याच भूमिकेत दिसला आहे. मात्र 'तलवार'मधला त्याचा 'अश्विन कुमार' किती तरी पटींनी इथल्या 'योहान'पेक्षा जास्त परिणामकारक आहे, ह्याबद्दल शंकाच नसावी.

संजय गुप्ता हे दिग्दर्शकांमधले 'प्रीतम चक्रवर्ती' असावेत. चित्रपट जिथे जिथे चांगला वाटतो, तिथे तिथे त्यांचं अभिनंदन करताना उगाच 'नक्की ह्यांचंच अभिनंदन करायला हवं ना ?' असा विचार छळतो. सगळ्या मेलोड्रामा व उचक्या, ठेचांनंतरही 'जज़बा' सुमार नक्कीच नाही. ऐ.बा.ब.च्या अतिअभिनयाला इरफान खान आणि शबाना आझमी सांभाळून घेतात आणि चित्रपट 'बघणेबल' बनतो. तर कधी नव्हेतो संगीतही छळवाद मांडत नाही. 'जाने तेरे शहर का क्या इरादा है..' हे गाणं तर मनात घरही करतं. त्यासाठी 'अर्को' ह्या नाव न वाटणाऱ्या नावाने संगीत देणाऱ्या व्यक्तीचे आभार !

२००७ साली नामवंत दिग्दर्शक सुधीर मिश्रा ह्यांचा 'खोया खोया चांद' म्हणून एक चित्रपट येऊन, आपटून गेला. तो चित्रपट ज्यांनी पाहिला, त्यांना तो कळलाच नाही, त्यामुळे आवडला की नावडला, हे ठरवताच आलं नाही. मात्र त्यात अप्रतिम अशी एक कव्वाली होती. 'क्यूँ खोए खोए चाँद की फ़िराक में तलाश में उदास हैं दिल..' जर चार दशकांपूर्वी एखाद्या चित्रपटात ती कव्वाली असती, तर केवळ तिच्या जोरावर तो चित्रपट भरपूर चालला असता. 'खोया खोया चांद' चार दशकं उशीरा आला होता. असे अनेक चित्रपट काही दशकं उशीरा आलेले असावेत. 'जज़बा'सुद्धा साधारणपणे दोन दशकं उशीरा आलेला चित्रपट आहे. हा चित्रपट अश्या काळात आला आहे, जेव्हा चित्रपटाची गणितं बदलली आहेत. आताशा, इतर कथानकांमध्ये एक वेळ चालून जाईल, पण 'थ्रिलर'मध्ये 'थिल्लर'पणा चालत नाही. 'जज़बा'तला अनावश्यक मेलोड्रामा आणि काही अक्षम्य पोरकटपणा व चित्रीकरणातील ठसठशीत उणीवा, त्याच्या नाट्यनिर्मिती व उत्कंठावर्धकतेला मारक ठरतात. वीस वर्षांपूर्वी ह्या उणीवांसहही 'जज़बा' कदाचित, 'Edge of the seat' ड्रामा म्हणवला जाऊ शकला असता. पण गुप्ताजी, तुम्ही किमान वीस वर्षं उशीर केलात !

रेटिंग - * *

http://www.ranjeetparadkar.com/2015/10/movie-review-jazbaa.html

हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये ११ ऑक्टोबर २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे :-

11102015-md-hr-6.jpg

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऐ.बा.ब यांची जरा जास्तच मनापासून केलेली अ‍ॅक्टींग (तशी ती नेहमीच जाणवते ! ), प्रोमोज मधे जाणवली होती. उदा: त्या धावण्याच्या सीन मधले चेहर्‍यावरचे भाव वगैरे. वाटलं आपण शीतावरुन भाताची परीक्षा करतोय. कारण रिव्ह्यू सगळीकडे छान छानच वाचायला मिळाले होते. कन्फूजन दूर केल्याबद्दल धन्यवाद. एकंदर पाहिला तरी ठीक, नाही पाहिला तरी फारसं काही मिस करणार नाही, असं वाटतंय हे वाचून.

ऐ बा ब आणि इरफान आवडता असुनही चित्रपट बकवास आहे अस मत माझ्या एका मित्राच ऐकल..
इथ पन तेच दिसतय.. पण इरफान ला बघण्यासाठी बघेलच..ते ही दिवाळीपात्तुर राहिला तरच..नै तर टिव्ही एके टिव्ही .. टिव्ही दुने टिव्ही आहेच..

संजय गुप्ता हे दिग्दर्शकांमधले 'प्रीतम चक्रवर्ती' असावेत. >> +१

जज्बा 'सेव्हन डेज' नावाच्या कोरियन चित्रपटाचा रिमेक आहे. जज्बा तर काही पाहिला नाही आणि आता परिक्षणानंतर तर खात्रीच पटली आहे कि पाहिला तर उगाच चिडचिड व्हायची. मूळ चित्रपट मात्र अतिशय वेगवान आहे आणि सूनबाईंच्या जागी जी कोरियन अभिनेत्री आहे तिने अप्रतिम आणि संयत अभिनय केला आहे. थोडक्यात आणखी एका कोरियन सिनेमाची मेलोड्रामा घुसडून माती केली.

@मुलगी-आई शर्यत : ती कोरियन प्रथा आहे. त्यांच्या स्पोर्ट्स डेला पालकांनी नुसते प्रेक्षक म्हणून न बसता खेळात भाग घ्यावा म्हणून तशी शर्यत ठेवतात. अर्थात मूळ चित्रपटात हिरोईन व इतर आया ट्रॅक सूट मध्ये धावतात. बहुधा सूनबाईंना सध्या ट्रॅक सूट मध्ये दाखवण्याची सोय नसावी.

मूळ कोरीयन कथा आहे का ? तरीच कथानकात वेगळेपणा जाणवतोय. चांगले कलाकार आहेत, पण दिग्दर्शकाला हाताळता आलेले नाहीत असे दिसतेय.

चांगलं लिहिलंय परिक्षण. ऐश्वर्याला अभि मिळालाय पण नय कधीच मिळणार नाय. कशी करणार तिच्याकडून अभिनयाची अपेक्षा? Proud

मग दोघे गाडीबाहेर येऊन 'सत्य' समजून घेतात. >>> मला काहीतरी भलतंच वाटलं.

ऐश्वर्या बाई बच्चन
>>
ओके, बा फॉर बाई हे लक्षात येत नव्हते.

वृत्तपत्रातल्या परीक्षणातही असा उल्लेख असेल तर हे शॉर्टफॉर्म प्रकरण नाही आवडले.

बकवास चित्रपट आहे. ......ह्यापैक्षा तलवार आजून ऐकदा पाहिला असता तर बरे झाले असते. ...

जज्बाचे प्रोमो बघून एका मित्रानं फेसबूकवर लिहिलं होतं की ९५च्या दशकामधला सिनेमा २०१५ मध्ये बनवल्याबद्दल संजय गुप्ताचं अभिनंदन! रसप यांनी नेमकं तसंच शीर्षक दिलं आहे. एकंदरीत सिनेमा जाम झोलबाज दिसतोय.

ऐश्वर्या राय कधीह्च आवडली नाही, कधीच आवडनार नाही. तिचा पिक्चर मी बघणार नाही. Proud

मला ऐश्वर्याचं कमबॅक चांगलं वाटलं, सिनेमा प्रेडीक्टेबल असला तरी शेवट पर्यंत पाहु शकतो कॅटॅगरी मधला.
इरफानचे डॉयलॉग्ज चांगले आहेत.
इरफान आणि अ‍ॅश आवडत असेल त्यांनी एकदा बघायला हरकत नाही टाइप.

मी बघणार आहे हा सिनेमा... ऐश्वर्याच्या कमबॅकसाठी. म्हणून डिजेची आश्वासक पोस्ट आवडली.
बाकी, परीक्षणात शब्द वाढवायचे होते म्हणून की काय पण काही ठिकाणी उगीचच विनाकारण टिप्पणी केल्यासारखी वाटली. उदा. शाळेतल्या स्पर्धेचा प्रसंग. ह्या अश्या स्पर्धा/ इव्हेंट बर्‍याच शाळांमध्ये होत असतात की. त्यात नवलाईचं किंवा न्यूनगंडात्मक काहीच नाही. तसं 'धावायचं' असेल तर आजची कुठलीच आई साडी नेसून येणार नाही हो... ड्रेस/ पँट/ स्लॅक्ससारखेच कपडे घालतील. अनुराधा वर्मा थेट कामावरूनच शाळेत आली असेल तर साहजिकच तिच्या नेहमीच्या कपड्यातच येईल.
असो!

ऐश्वर्या रायकडुन अभिनयाची अपेक्षा कधीपासुन?? तिच्याकडुन सुंदर दिसण्याची अपेक्षा ठेवली जाऊ शकते फारतर, आणि प्रोमोज पाहता ती ब-यापैकी छान दिसलीय याच्यात.

परिक्षण छान लिहिलेय. चित्रपट पाहताना आलेला वैताग ब-यापैकी उतरलाय परिक्षणात.

मी बघणार आहे हा सिनेमा... ऐश्वर्याच्या कमबॅकसाठी. म्हणून डिजेची आश्वासक पोस्ट आवडली.
बाकी, परीक्षणात शब्द वाढवायचे होते म्हणून की काय पण काही ठिकाणी उगीचच विनाकारण टिप्पणी केल्यासारखी वाटली. उदा. शाळेतल्या स्पर्धेचा प्रसंग. ह्या अश्या स्पर्धा/ इव्हेंट बर्‍याच शाळांमध्ये होत असतात की. त्यात नवलाईचं किंवा न्यूनगंडात्मक काहीच नाही. तसं 'धावायचं' असेल तर आजची कुठलीच आई साडी नेसून येणार नाही हो... ड्रेस/ पँट/ स्लॅक्ससारखेच कपडे घालतील. अनुराधा वर्मा थेट कामावरूनच शाळेत आली असेल तर साहजिकच तिच्या नेहमीच्या कपड्यातच येईल.
असो!
<<
अगदी अनुमोदन मंजुडी !
आजकाल खरच साड्या नेसणार्या किती बायका असतात दररोज ? ते ही धावताना ?
सिनेमाचं माहित नाही, पण रसप यांची ही टिप्पणी मेंटॅलिटी मात्रं ३ दशक जुनी नक्कीच आहे !

साधना,
नसेल आवडत इथल्या बहुसंख्य लोकांना , पण अ‍ॅश तिच्या परफॉर्मन्स सकट आवडणारे फॅन फॉलॉइंग नक्कीच आहे .
एका चांगल्या आश्वासक रोल मधे (ते ही एज अ‍ॅप्रोप्रिएट ) कमबॅक मला तरी आवडलं .
बाकीच्यांचं माहित नाही पण ज्यांना अ‍ॅश एरवी अजिबात आवडत नाही त्या माझ्या गृप मधल्या फ्रेंड्स ना या सिएनमात मात्रं आवडली.

शेवट पर्यत नक्कीच बघू शकतो .
मला ऐश्वर्याचं कमबॅक चांगलं वाटलं. चांगला रोल निवडलाय तिने.मला पूर्वीऐश्वर्या फारशी आवडत नसे पण इथे बरी वाटली .
कपडेपट फक्त आणि फक्त काळा.

हो, डिजे, ती मला जरी आवडत नसली तरी माझ्या घरात तिचे फॅन्स आहेत Happy

त्या साडीवाल्या वाक्यावर खुप टीका झालीय. मलाही ते वाचताना उलट सुलट वाटलेले.

ऐश्वर्या तिच्या कामावरच्या कपड्यानीशीच स्पर्धेत उतरते यावरुन कदाचित त्या स्पर्धेत धावण्यासाठी आवश्यक असे कपडे न घालता कामावरचे कपडे घालावेत असा नियम तिथे असावा. मग असा नियम असेल तर एखादी स्त्री साडीतही असु असेल. फक्त ऐश्वर्याच का कामावरच्याच कपड्यात अशी टिका रसपनी केली. असा अर्थ मी काढला. भारतात आजही फक्त साडीतल्याच स्त्रीया आहेत असे त्याना म्हणायचे असे मला तरी वाटले नाही.

मुळात हा चित्रपट रसप यांना अजिबात आवडला नाही. त्यामुळे त्यांनी त्याना खटकलेल्या प्रत्येक गोष्टी वर जरा जास्तच टिका केलीय. या प्रसंगावर टिका करताना त्यांना मुळात ऐश्वर्यावर टिका करायचीय. इतर बायका बिचा-या तिथे होत्या म्हणुन इथे आल्या Happy

ऐश्वर्या रायकडुन अभिनयाची अपेक्षा कधीपासुन?? तिच्याकडुन सुंदर दिसण्याची अपेक्षा ठेवली जाऊ शकते फारतर
>>>

+१

अभिनयाची अपेक्षा करावी असे मोजकेच बोटावर मोजण्यासारखे कलाकार असतात, त्यामुळे अशी अपेक्षा प्रत्येकाकडून खरे तर करूही नये. प्रत्येक कलावंताचे बलस्थान वेगळे असते, सौंदर्य, स्मार्टनेस, एक्स फॅक्टर, स्टाईल, पडद्यावरचा सहजसुंदर आल्हाददायक वावर, स्क्रीन प्रेजेंस, भुमिकेचे बेअरींन सोडत ओवर अ‍ॅक्टींन न करणे .. इत्यादी बरेच गोष्टी असतात.. त्यासाठी आपण त्या कलावंतांचे फॅन बनतो, पैसे मोजून त्यांना बघायला जातो..

बाकी सुंदर दिसण्याची अपेक्षाही ऐश्वर्या (किंवा कतरीना) यांच्याकडून ठेवण्याची आवशयकता नाही. कारण त्या काही प्रयत्न न करताही कमालीच्या सुंदर दिसतातच Happy

i have not seen the movie. But even before reading the review, i knew that the review would be skewed towards irfan and totally negative abt ash. Rasap and many other reviewers' reviews are so predictably biased. As if they hv already decided that x actor is good, y actor is bad and then they just watch the movie to legitimately propogate their views. Most of the times, i have seen the typical sarcastic derogatory remarks for the female lead. Sigh!

ऐश्वर्या एक प्लॅस्टिकची/कचकड्याची बाहुली आहे, तिला अभिनय कधी येत होता? Uhoh
भंपक..

मला अजिबात आवडला नाही, असे नाही. पण संजय गुप्ताचा असल्याने (त्याचं नाव कानफाट्या ठेवा) आवडलेल्या गोष्टींचं कौतुक करणं जीवावर आलं !

साडीवालं वाक्य.........

तो भाग खटकणं मी समजू शकतो. सहसा स्त्री, स्त्रीत्वावर केलेली कमेंट चुकीच्या अर्थाने घेतली जातेच. कुणाला राग आला असल्यास मी क्षमा मागतो. पण तो तद्दन मूर्खपणाच आहे. ऐश्वर्या कामावरून तिथे आलेली नसते, तर तिथून कामावर जाणार असते. जर इतर बायका पंजाबी ड्रेसमध्ये होत्या, तर तिथेही हिने काळा सूट, काळी विजार वगैरे युनिफॉर्म का घातला होता, असा माझा सरळसाधा प्रश्न होता.

पण तो तद्दन मूर्खपणाच आहे. ऐश्वर्या कामावरून तिथे आलेली नसते, तर तिथून कामावर जाणार असते. जर इतर बायका पंजाबी ड्रेसमध्ये होत्या, तर तिथेही हिने काळा सूट, काळी विजार वगैरे युनिफॉर्म का घातला होता, असा माझा सरळसाधा प्रश्न होत >>सिंगल पेरेंट असल्याने वेळ कमी पडतो अहो.
अंतरे असतात. माझ्यामुलीची शाळा हैद्राबादेत गिरिश पार्क एकाटोकाला हाय टेक सिटीच्या ही पुढे.
व ऑफिस अ‍ॅबिड्स मध्ये २५ किलोमीटर अंतर.

हिला जर मुलीच्या शाळेत रेस मधए भाग घेउन मग पुढे कोर्टात जायचे असेल १२ ते एक रेस म ग
लंच कोंबून लगेच कोर्टा कडे धाव. म्हणजे कपडे कुठे बदलणार? गाडीत? का कोर्टात? कामाच्या ठिका णी यू नो माय किड हॅड अ स्कूल रेस सो आय हॅड टू ड्रेस इन अ सलवार कमीज असे म्हणून चालत नाही. तिथे तिथलेच कपडे पाहिजे.

इन फॅक्ट माझी एक बॅरिस्टर मैत्रीण सिंगल पेरेंट सर्व कामे करून कोर्टा त क्रिस्प कॉटन साडी व
कॉलर वगैरे लावून जात असे.

सहज गुगललं. तो तिचा युनिफॉर्म नसतो. ट्रॅक सूट आणि युनिफॉर्मच्या मधलं काही तरी पण काळंच.... (आणि ही बाजूला असलेली तिची प्रतिस्पर्धी मॉम वगळता इतर सगळे पंजाबी वगैरेमध्ये असतात.)

img_55ff4ff6da0fc.jpg

आधी नीट पाहा, मग लिहा Happy
तुमच्या लिखाणावर बरेच रसिक प्रेक्षक अवलंबून असतात, तुमच्या परीक्षणानंतर सिनेमा पाहायचा की नाही ते ठरवतात.

Pages