हापिस

Submitted by जव्हेरगंज on 6 October, 2015 - 01:43

रात्री ऊशिरापर्यंत मी कपाटाशेजारी वाट बघत बसलो. टाईमपास म्हणुन दोन चार वडापाव हाणले. सगळी सामसुम झाल्यावर सावधपणे अंदाज घेत बाहेर आलो. टकल्या अजुन कंप्यूटरवर रिपोर्ट करत बसला होता. एकतर यानं अप्रायजल मध्ये काशी केलेली. आणि आज हा महाडांबिस माणुस मी चार दिवस राबराबुन बनवलेली एक्सेल शीट स्वत:ची म्हणुन वरती पाठवत होता. त्याखाली एक पेशल नोट टाकुन, "Lower order is not working fine, but I am working hard to get report on time. sorry for late. thanks" (मला सीसी मध्येपण ठिवलं न्हाय)

मग मी एक लांबसडक लोखंडी बांबू हातात घेतला. (हो, हेच बनतं आमच्या कंपनीत). हळुच मागनं जाऊन त्याचं टक्कालचं फोडलं. साल्याला कळ्ळं पण न्हाय कुणी फोडलं. डेस्कटॉपला प्रणाम करत तसाच निवर्तला.
आवाज कसला आला बघायला संगिता धावत आली. च्यायला हीपण थांबलीय वाटतं. (नक्कीच दोघांच झेंगाट असणार) परवा मला म्हणाली " अरे या अमक्या ढमक्या कंपनीत अशी अशी एक रिक्वायरमेंट आहे, बघ ट्राय करुन, काय हरकत आहे. शेवटी सेल्फ ग्रोथ इज अल्सो इंपॉरटंट"
मग दुसऱ्या दिवशी मॉर्निंग मीटींगला हा टकल्या मला म्हणाला " जॉब करायचा नसेल तर तसं सरळ सांगा, संगिताला का बघायला सांगताय?" ह्या बिलंदर बाईलापण संपवलचं पाहीजे. बु..ख्ख..! तोंडातच बांबू घातला. कायमचचं बंद केलं. जाग्यावरचं खपली.
हुश्श्यं...! बऱ्याचं दिवसांच आत साठलेलं शेवटी बाहेर काढलं. ईकडं तिकडं बघितलं, कुणीच न्हवतं. बाहेर बरीच धावपळ चाललेली. शिक्युरीटीवाले मामा लोक्स. यांना भुलवायला किती वेळ लागतोय. मग मी पुन्हा कपाटाशेजारी बसुन पुढच्या प्लँनिंगचा विचार सुरु केला. वरच्या मजल्यावरचा प्रोजेक्ट हेड, शॉप फ्लोअरवरचा प्रोडक्शन इंचार्ज, सगळ्यात महत्वाचा एच. आर. आणि....(आता एके-४७ च काढावी लागणार)
तंद्रीत असतानाच एक जाडजुड वॉचमन माझ्याकडे बेधडक चालत आला. चवड्यावर बसुन माझे खांदे हलवत हळुच म्हणाला " अहो, ऊठा की, किती ऊशीर झोपलाय, आज कामावर जायचं न्हाय का?"

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy इतकं सगळं करण्यापेक्षा नोकरी बदलणं कमी मेहनतीचं आहे. माझी स्वप्नं कधीकधी याच्या खालच्या ग्रेडवर असतात म्हणजे एका विशीष्ठ माणसाला नाकावर जोरात ठोसा मारुन नाक चपटे करणे इ.इ.
मी त्या माणसाच्या नाकावर आतापर्यंत (मनात) ५ ठोसे मारले आहेत. १० होईपर्यंत संयम टिकवून धरणार आहे.

Happy नोकरी सोडण्यापेक्षा सोपे काही मार्ग आहेत टिम बदलणे इ.इ. आधी ते करुन पाहावे म्हणतेय
खरं तर एखाद्याला ठोसे मारावेसे वाटावे असा राग मनात साठणे हे चांगले नाही पण काही माणसांबाबत अपना एकदमच नाईलाज है!

शेवटची ओळ नीट कळली नाही
कामावर च्या ऐवजी घरी असा शब्द योजायला हवा आहे का?