शिखर गाठायचा रस्ता

Submitted by जयदीप. on 5 October, 2015 - 22:30

शिखर गाठायचा रस्ता कुणाला माहिती आहे
परत उतरायचा रस्ता कुणाला माहिती आहे

बनवले चार पायांनी इकडच्या पायवाटांना
कसा बनवायचा रस्ता कुणाला माहिती आहे

जिथे पार्किंग गाडीचे करावे लागते भांडत
तिथे खेळायचा रस्ता कुणाला माहिती आहे

जरा मित्राकडे जातो असे सांगायचा तेव्हा
तुला भेटायचा रस्ता कुणाला माहिती आहे

पुन्हा काळोख झाला अन् घराची आठवण आली
घरी परतायचा रस्ता कुणाला माहिती आहे

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिथे पार्किंग गाडीचे करावे लागते भांडत
तिथे खेळायचा रस्ता कुणाला माहिती आहे<<< छान!

जरा मित्राकडे जातो असे सांगायचा तेव्हा
तुला भेटायचा रस्ता कुणाला माहिती आहे<<< मस्त

पुन्हा काळोख झाला अन् घराची आठवण आली
घरी परतायचा रस्ता कुणाला माहिती आहे<<< उत्तम! (समीर चव्हाणच्या गझलांची आठवण झाली)