स्टँडिंग डेस्क - अनुभव, फायदे , तोटे....

Submitted by चौकट राजा on 5 October, 2015 - 13:46

आमच्या ऑफिसात गेल्या काही महिन्यांपसून उभे राहुन काम करणारे लोक दिसू लागले आहेत. आपापल्या पद्धतीने सेट अप तयार करून ही मंडळी दिवसातील बराचसा वेळ उभे राहुन काम करतात. ह्यापैकी एक दोघांशी बोलणे झाले. तेव्हा एकाने सांगितले कि दिवसा अखेरीस त्याची पाठ खुप दुखायची म्हणून त्याला फिजिओ थेरेपिस्ट नी हा उपाय सुचवला व आता त्याची पाठदुखी खुपच कमी झाली आहे. दुसर्‍यानेही असाच काहीसा अनुभव सांगितला.

परवा जिम मधल्या माझ्या इनस्ट्रकटरने मलाही स्टँडिंग डेस्क ट्राय कर म्हणून सांगितले. माझ्या पाठीचे स्नायु घट्ट (Stiff) असल्यामुळे मी जस जसा जास्त वजन उचलायचा व्यायाम करत जाईन तसा तसा मला पाठदुखीचा त्रास वाढेल असे त्याचे म्हणणे पडले. उभे राहुन काम केल्यामुळे सतत हालचाल होत राहिल व ऊभ्या ऊभ्या स्ट्रेच करता येईल. तसेच बसून काम करताना होणारे चुकिचे पोश्चर होणार नाही. खूप वेळ बसून काम करताना एक हार्मोन तयार होतो जो पोटावर मेद (फॅट) वाढण्यास कारणीभूत असतो असेही म्हणाला. (ज्या लोकांना दिवसाचे दोन तीन तास ट्रॅफिकमधे बसण्यात घालवायला लागतात त्यांनाही हे लागू होते कारण तो हार्मोन तयार होण्याचा संबंध स्ट्रेस / मानसिक ताणाशी सुद्धा असतो असेही तो म्हणाला.)

माबो करां पैकी कोणाला ह्या बद्दल काही अनुभव असेल किंवा माहिती असेल तर जाणून घ्यायला आवडेल.

एक चांगला सेट अप नेट वर सापडला. तो विकत घ्यायचा विचार करतो आहे. खाली दुवा दिला आहे. त्याबद्दल सुद्धा अनुभव असल्यास कृपया सांगा.

http://www.varidesk.com/standing-desk-pro-plus-36

************************************************************************************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ईंटरेस्टींग ! पण मग पाय दुखणार नाही का? की आलटून पालटून उठाबश्या काढायच्या?

मला आठवतेय मी ईंजिनीअरींगचे तीन-तीन तासांचे सारे पेपर उभ्याने सोडवले आहेत. अर्थात, बहुतांशवेळा आमची परीक्षा ड्रॉईंगहॉलमध्ये व्हायची त्यामुळे उभे राहून ती हाईट बरोबर अ‍ॅडजस्ट व्हायची. बसूनही जमायचेच कारण बसायला ऊंच स्टूल असायचे, पण मी ते कधीच वापरले नाहीत. याचे कारण म्हणजे उभे राहून लिहिल्याने माझा लिखाणाचा स्पीड वाढायचा.

अर्थात आजही कधी कधी क्रिटीकल सिचुएशनमध्ये मला वेगात काम करायचे असल्यास मी उभे राहून करतो. बसला की माणूस रिलॅक्स होतो हा त्यामागील सायकॉलॉजिकल अँगल Happy

मी मागच्या दीडेक वर्षापासून स्टँडिग डेस्क वापरते आहे. मलादेखील फिजियोथेरपीस्टने सांगितल्यामुळे सुरु केला आहे. हो फरक जाणवतो. आमच्याकडे मला डेस्क उंच करून दिलं आहे म्हणून उंच खुर्ची पण दिली आहे. काही महिन्यांपासून तुम्ही लिंकमध्ये दाखवली आहे त्या पद्धतीची डेस्क देताना खुर्ची बदलली गेली नाही.
मला कोअर स्ट्रेंथ करण्यासाठी उभं राहताना मध्ये मध्ये पोट आत घ्यायला फिजियोने सांगितलं होतं ते स्टँडिंग डेस्कमुळे सहज शक्य होतं किंवा लक्षात राहातं. बॅकपेन संपलं वगैरे काही म्हणणार नाही पण सारखं सारखं सायाटिक नर्व्ह पेन यायची फ्रिक्वेन्सी कमी झाली आहे इतकं जरुर सांगेन.
उभ्या इभ्या स्ट्रेच करणं आणि स्लाउचिंग पोश्चरसाठीदेखील उभं राहाणं फायद्याचं होतं. फक्त तुम्ही एकटेच उभे असल्यामुळे येणा-जाणार्^याला तुमची स्क्रीन नजरेत भरते एवढाच काय तो तोटा Wink

आमच्याकडे डॉ.ची नोट लागते स्टँडिग डेस्कसाठी. तुमच्याकडे करून मिळतंय तर घ्या. तुम्हाला फायदा झाला नाही तर ते व्हॅरीडेस्कचं असेल तर न उभं राहायचा पर्याय आहेच. Happy

कु.ऋ. ; सतत उभं राहायचं नसतंच ८०-२० किंवा तुम्हाला झेपेल तसं १००% उभं नाही. Proud

ह्यासाठी योगाच उत्तम आहे. जीम तर आणखी हानी पोहचवेल.
चौकट राजा, फिजियोथेरपीस्ट हे एक खुळ आहे हल्ली. काहीही शिकवत नाहीत ही लोक. वरवर फक्त. योगा क्रमाने करा. जास्त आयुष्यभराचा फायदा होईल.

फार वेळ उभे राहून काम केल्याने पावलांवर जास्त जोर पडतो.
यामुळे पावलाच्या टाच व चवडा या हाडातील अंतर वाढते.
त्यामुळे यांना बांधून घालणारे बंधक व स्नायू ओढले जातात. कधीकधी तुटतातही.
आणि एक अतिदीर्घकाळ मागे लागणारा प्लांटर फसिटिस (Plantar Fasciitis) नावाचा विकार उद्भवतो. हा अतिशय वेदनादायी प्रकार असतो. नेहमीचे चालणेही अवघड होत जाते.

या शिवाय सदैव उभे राहणे असल्याने साहजिकच कोपर किंवा कंबर टेकवून उभे राहणे होते. हे वाकडे तिकडे होणे जास्त झाले तर इतर पाठ आणि कंबरेचे विकारही मागे लागतात.

तेव्हा फार काळ एकाच ठिकाणी उभे राहणे योग्य नाही!

छान माहिती निनाद.
काही स्टॅंडिंग डेस्क वापरणारे पाहिलेत जे दर दोन एक तासांनी रिसेप्शन मधील सोफ्यावर जाउन आराम करतात.

साधारणपणे सतत बसून काम केल्यास होणार्‍या पाठदुखी / मानदुखीला (इतर कॉम्पिकेशन्स नसल्यास) योगासने हा चांगला उपाय आहे. दिवसातून १० ते १५ मिनिटे लागतात. दुखणे कमीच नव्हे तर नाहीसे होऊ शकते.

सतत उभे राहून काम केले तर व्हेरिकोज व्हेन्स होतील असे वाटते.
अर्धा अर्धा वेळ दोन्ही बसणे आणि उभे राहणे केले तर फायदा असेल.

मी एक दोन वर्षे जेव्हा जेव्हा घरी कॉम्प्युटर वर काम करायचो (ऑफिस चे काम, माबो ई. सर्वच), ते सगळे उभे राहून करायचो. कधीकधी घरून काम करताना ऑल्मोस्ट दिवसभर उभा राहून करायचो. एक दोन वर्षे तरी केले असेल. पण मग पाय दुखू लागले. नक्की कारण कळत नव्हते. फिटबिट मुळे भरपूर चालत होतो, अधूनमधून जॉगिंग ही करायचो. पण पाय तेव्हा दुखायचे नाहीत. नंतर लक्षात आले की दिवसभर उभा राहिल्याने दुखत असतील. मग ते बंद केले व पाय दुखणेही जवळजवळ थांबले.

मलाही हा प्रकार ट्राय करुन बघायचाय. वर लिहिलय तसं बसून बसून पाठीचे (मुख्यतः लोअर बॅकचे) मसल वीक होतात, त्यात खुर्ची एर्गॉनॉमिकली विचार करुन डिझाईन केली नसेल तर पोस्चरची आणखिनच वाट लागते.
सध्या मी प्रयोग म्हणून पाठ खुर्चीला न टेकवता एकदम सरळ ठेवून काम करायला सुरवात केली. सुरवातीला त्रास झाला थोडा पण आता सवय झाली. अधून मधून जर वाटलं तर जरा वेळ पाठ टेकवतो पण वाटलं तितका त्रास नाही झाला. आपला कणा जर आपण ताठ ठेवला तर सवयीनी तो असा मजबूत खोडासारखा वाटायला लागतो आणि उलट आधार मिळाल्या सारखा वाटतो शरिराला असं सध्या जाणवतय.
बाकी सतत उभं राहुन पाय दुखायला लागणं पण शक्य आहे. खरं सवयीनी ते पण व्हायला नको पण परत आपलं वजन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा गृहित धराव्या लागतील.
मी मध्यंतरी एका अलट्रा मॅरॅथॉनरनी लिहलेला लेख वाचला होता. त्याचं नाव आठवेना नेमकं आता. सापडला तर इथे देतो. त्याला बरीच वर्ष, इतकं ट्रेनिंग करुन सुद्धा, मॅरॅथॉन नंतर हॅमस्ट्रिंग्स दुखायचा त्रास व्हायचा. बरेच उपाय केले तरी काही फरक पडेना मग कोणा एका डॉक्टरच्या सल्ल्याने त्यानी सुद्धा स्टॅंडिंग डेस्कचा सेट अप बनवला. त्याच्या मते ही मात्रा लागू पडली. त्याचं म्हण्णं होतं बसून बसून माणसाचे हॅमस्ट्रिंग मसल्स एकदम वीक होतात (कारण आपण हँमस्ट्रिंग्सवरच बसतो).

हा वेगळा लेख आहे पण इथेही उल्लेख आहेच स्टॅंडिङ डेस्कचा.
http://running.competitor.com/2014/04/injury-prevention/dean-karnazes-3-...

इतकी वर्षे, बैठे काम करणार्‍यांसाठी थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने स्ट्रेचिंग (गुढगे,पावले, खांदे, पाठ मान इ.), पाय मोकळे करून येणे हे उपाय सुचवले जायचे. आता हे एकदम दुसरे टोक आलेले दिसते.

उभे राहताना दोन्ही पायांवर सारखा भार द्यायची सवय आधी लावून घ्यायला हवी.

वैद्यबुवा म्हणतात तसं जाणीवपूर्वक सतत ताठ बसणं, आधार न घेता बसणं हे उपाय उपयुक्त आहेत.(अनुभवान्ती)

स्टँडींग डेस्क वापरणार असाल, तर शॉक अ‍ॅबसॉर्बींग मॅट्स पण मिळतात उभं राहायला त्या वापरा. नाहीतर टाचा, शीन आणि गुढघे दुखू शकतात.

मी पण गेल्या २ वर्षांपासुन स्टँडींग डेस्क वापरत आहे. फायदे अनेक आहेत. काही तोटे:
- खुर्चीत बसुन झोपा काढता येत नाहीत.
- सतत स्टँडीग असल्यामुळे मी क्युबिकल मधे आहे का नाही ते सगळ्यांना (विशेषतः साहेब लोकांना) लांबुन पण दिसते.
- स्टँडीग डेस्क असल्याने मॉनिटर पण सगळ्यांना लांबुन दिसतो. त्यामुळे माझे मायबोलीशी किती घनिष्ट नाते आहे हे सगळ्यांना कळाले. वार्षिक कामगार पंचनामा दिनाच्या (aka annual appraisal) दिवशी मला साहेबांनी तसे ऐकवले पण.

वेका, दी मा, निनाद, बी, मानव, मी अनु, फारएण्ड, वैद्यबुवा, रार आणि महागुरु - सर्वांचे आभार.

दिवसातून निम्मा वेळ उभा राहुन काम करायचं ठरवलय. सद्ध्या तरी साधा घरच्या घरी जमवलेला सेट अप वाप रेन. उपयोग झाल्यास चांगला सेट अप घेईन.

आमच्याकडे अलीकडेच अशा प्रकारचे दोन डेस्क बसवले आहेत. दिवसातून काही वेळ उभ्याने काम करा असे सांगितले आहे. तसेच पाठदुखी असणाऱ्या कलिग्जना या डेस्क च्या वापरात प्राधान्य आहे.

मला पण आवडतो असा डेस्क. अमच्या कडे अ‍ॅडजस्ट करायचा आहे. त्यामुळे आलटुन पालटुन वापरता येतो. स्पेशली दुपारच्या जेवनानंतर उभंराहुन बर वाटत.

वेका यांनी सांगितल्या प्रमाणे, स्टॅंडिग डेस्क सोबत उंच खुर्ची, म्हणजे उभे रहाण्याचे आणि बसण्याचे दोन्ही ऑप्शन्स असलेली सोय चांगली वाटतेय.

चौकट राजा: शुभेच्छा. आपला अनुभव सुद्धा कळवा यथावकाश.

आमच्या ओफीस मधले काही लोक उभे राहून काम करतात त्या स्टंडिंग डेस्क वर आणि त्यांचा अनुभव चांगला आहे त्याबद्दल.... नवीन जॉइन झालेल्या लोकांना तो मिळायला 7-8 वर्षे लागतात असे साहेब म्हणतो (तोपर्यंत पाठी चा बॅंड वाजलेला असतो) पण माझा स्वता चा
अनुभव असा आहे की पाठ दुखाण्यावर "योगा" हा एक उत्तम उपाय आहे...

मंडळी, शेवटी मी स्टँडींग डेस्क मागवला.. सद्ध्या एक तास उभा रहातो आणि एक तास बसतो. मिटींग वगैरे असेल तर एक तासाच्या रुटीनला "तुका म्हणे अ‍ॅडजस्ट".
छान वा टतय डेस्क वापरताना.. विशेषतः उंची कमी जास्त करता येत असल्यामुळे सगळा वेळ उभं रहावं लागत नाही आणि लागेल तेव्हा पटकन बसता येतं. दुपारी जेवण झाल्यावर तासभर उभं राहुन काम करतना आळस जातो आणि फ्रेश वाटतय. पाय दुखायचा त्रास होत नाहिये. पुर्वी दिवसच्या शेवटी पाठ शिणलेली असायची.. आता तसं वाटत नाही आहे. माझा बघून एक दोन कलीग्सनी पण मागवला आणि त्यांचा सुद्धा अनुभव माझ्यासारखाच आहे.

माझं रेटींग - ५*

काही शंका, प्रश्न असल्यास जरूर विचारा...

image1.JPGimage2.JPG