कार्डिओ एक्सरसाईजेस' बाबत

Submitted by bvijaykumar on 30 September, 2015 - 10:20

कार्डिओ एक्सरसाईजेस' बाबत माहिती मिळेल का ? .... कधी करावे ? .... सकाळी की सायंकाळी ?? अन्जॉप्लास्टी केली असल्यामुळे त्यास अनुसरुन कार्डिओ एक्सरसाईजेस' सांगावे प्लीज ! ...

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देवा रे!

साहेबा,

अँजिओप्लास्टी कुणी केली? कधी? किती स्टेंट? नक्की कोणत्या व्हेसलला किती ब्लॉक होता? त्याआधी कार्डिअ‍ॅक मसल डॅमेज किती झालंय? अ‍ॅटॅक आला होता का? स्टेंट कोणता आहे? तुम्हाला डायबेटीसही आहे. तुमचं वय किती? वजन किती? उंची किती? इतर काही आजार आहेत का? सांधेदुखी आहे का? हजार बाबींचा विचार करून तुमच्या प्रश्नाचं उत्तर लिहावं लागेल.

(माझ्या माहितीतल्या तरी) सर्व अँजिओ करणार्‍या कार्डिऑलॉजिस्टकडे एक फिजिओथेरपिस्ट/योगा-लाईफस्टाईल कन्सल्टन्ट्स रिहॅबचे वर्ग घेतात. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन तुमच्या व्यक्तिगत केसला साजेशी करून शिकवतात. डाएटबद्दलही शिक्षण देतात. यासाठी वेगळी फी देखिल बहुदा घेत नाहीत.

तुमच्या वैद्यकिय इतिहासाच्या माहितीशिवाय व प्रत्यक्ष तपासल्याशिवाय हे असले सल्ले देणे शुद्ध वेडेपणाचे आहे, व असे कुणी दिलेतच, तर ते अमलात आणणेही साजुक वेडेपणाचे आहे. तेव्हा कृपया, आपल्या कार्डिऑलॉजिस्टला कन्सल्ट करा, ही विनंती.

क्राऊड कन्सल्टेशन्स किमान आपल्या तब्येतीसाठी तरी नका करू हो... 114.gif

अन्जॉप्लास्टी झाल्यानंतर तब्येतीची फार काळजी घ्यावी लागते.
पहिल्या वर्षी तर जास्तच !
त्यामुळे जे डॉक्टर सांगतील तेच आणि फक्त तेवढेच करा !
सांगिवांगीचे सल्ले जीवावर बेतू शकतात

>>> क्राऊड कन्सल्टेशन्स किमान आपल्या तब्येतीसाठी तरी नका करू हो... 114.gif <<<< अनुमोदन.

(हा विषय काय त्या "ज्योतिषासारखा" नाही, की कोणता ग्रह कुठल्या स्थानात कुठल्या राशीत काय फळ देतो.. अहो तिथेही आम्ही असे क्राऊड कन्सल्टॅशन करु नका असेच सांगतो..... कारण शरिर जितके महत्वाचे तितकेच मनही महत्वाचे! असो. )

मी फारसा लिहित नाही पण मायबोलीवर क्राऊड - बल्क कन्सल्टेशन्सचे खूळ आहे. एवढ्यातलेच बी यांचे उदाहरण घ्या.
Sad

रेव्यु, इथे माहिती विचारुन एखादा विषय, एखादा आजार, एखाद्या शारिरिक त्रासाबद्दल जाणून घेण हे वेगळ आहे आणि इथे वाचलेली माहिती सल्ल्याप्रमाणे घेऊन ती अमलात आणणे हे वेगळ आहे. मी ह्यातले फक्त पहिलेच करतो. मी इथले सल्ले कधी माझ्यावर वापरुण बघत नाही.

मला एक सांगा चांगल्या डॉक्टरांकडे रुग्नाशी बोलायला किती वेळ असतो? वेळ आणि इन्टरेस्ट दोन्ही नसतो त्यांना. फक्त त्यांना त्यांचे काम करायचे असते. धड गोळ्याची नावे लिहून देत नाही. कशा घ्यायच्या हे सांगत नाही. रक्ताच्या रीपोर्टमधले वेगवेगळे घटक कमी अधिक असणे ह्याबद्दल बोलत नाहीत.

त्यामुळे हल्ली असे झाले आहे ना की तुम्हाला उदा. जर रक्त तपासायचे असेल तर त्यातील घटकांविषयी ज्ञान असायला हवे. तुम्ही रक्त तपासून घ्यायचे आणि रीपोर्ट हाती आला की आपणच आपला अभ्यासायचा. माझ्या बहिणीने रक्ताचे रिपोर्ट मी पाहिले तेंव्हा तिला डॉक्टरांनी काहीच सुचना केल्या नव्हता. उदा. जर तुमच्यात हिमोग्लोबीन अगदी ५/६ असेल तर ईन्जेक्सण देण्यापेक्षा पालेभाज्या बीटरुट भरपुर खा असा किमान सल्लाही त्यंनी दिला नाही.

कोलेस्टेरोनी पातळी गाठली तर तेल तुप वर्ज्य करा असेही डॉक्टर सांगत नाही. काही सांगत असतील पण चांगले बिझी असलेले डोक्टर ह्यांच्याकडे वेळ नसतोच.

म्हणून थोडे ज्ञान आपण आपले बाळगून जवळ ठेवले तर केंव्हाही बरे.

बी साहेब
माझे मत वेगळे आहे. कदाचित मला उत्तम डॉक्टर आणि निष्णातही मिळाल्या मुळे असेल. जे काही विचारायचे ते मी फक्त डॉक्टरना विचारतो कारण नेट्वर व्यक्ती तितक्या प्रकृती.माझे डॉक्टर व्यवस्थित शंका निरसन करतात व वेळ सुध्दा देतात. तो आपला रुग्ण या नात्याने हक्क देखील आहे.
दुसरी गोष्ट अशी की आपण इतरांचे सल्ले घेत गेलो आणि काही बिघडले तर मग शेवटी डॉक्टरांकडेच जावे लागते.
स्वतः ब्लड रीपोर्ट वरून टी एल व्ही पाहून निष्कर्ष काढणे फार चुकीचे आहे. कारण पॅथॉलोजीची शारिरिक लक्षणांशी सांगड फक्त डॉक्टरच घालू शकतात.
अर्थात हे माझे अनुभव सिध्द वैयक्तिक मत आहे.

रेव्यु, रुग्नांशी संवाद साधणारे डॉक्टर माझ्या ओळखीचे नाहीत. मी दिनानाथ मधे अनेकवार गेलो आहे. तिथे जी रांग असते ती बघून जीव धापतो की आपला नंबर कधी येईल. तो येतो आणि फक्त एक दोन मिनिटेच वेळ मिळतो. डॉक्टरांच्या क्लिनिक मधे गेलो तरीही हीच अवस्था असते. इतके पेशन्ट की बास!

माझा अनुभव असा आहे की चांगले डॉक्टर आपल्याला वेळ देत नाही. त्यांची मेडीसीन उपाय करेन पण काय झाले काय नाही, रिपोर्टबद्दल जे आपल्याला प्रश्न असतात त्यांचे निरसन होत नाही.

माझा असा अनुभव आहे की विचारपुशीचा फायदा होतो. माहिती मिळते. सल्ले मिळतात त्याचा सुद्धा उपयोग होतो. फक्त एकच की कुठलीही औषधी वा व्यायाम हे तज्ञांकडूनच जाणून घ्यावेत.