श्रीलंका सहल - भाग ४ - व्हीक्टोरिया गार्डन, नुवारा एलिया

Submitted by दिनेश. on 28 September, 2015 - 05:28

श्रीलंका सहल - भाग १ - प्राथमिक माहिती http://www.maayboli.com/node/55306
श्रीलंका सहल - भाग १ - एअरपोर्ट ते नुवारा एलिया http://www.maayboli.com/node/55355
श्रीलंका सहल - भाग २ अ - हॉर्टॉन प्लेन्स नॅशनल पार्क
http://www.maayboli.com/node/55444
श्रीलंका सहल - भाग २ ब - हॉर्टोन प्लेन्स नॅशनल पार्क http://www.maayboli.com/node/55445
श्रीलंका सहल -भाग ३ - न्यू झीलंड फार्म, अशोक वाटीका, अरालिया ग्रीन हिल्स
http://www.maayboli.com/node/55526

इथून पुढे...

सकाळी उजाडताच तिथे जायचे हे ठरवूनच झोपलो. सहा वाजता मी अगदी तयार. बाग सात वाजता उघडणार होती.
मी साडेसहालाच हॉटेलमधून बाहेर पडलो. मला तिथल्या सेवकाने ब्रेकफास्ट करून जा, आणखी अर्ध्या तासात
तयार होतोय असे आवर्जून सांगितले, मी म्हणालो आल्यावर करतो.

बागेच्या गेटवर जाऊन वाट बघत राहिलो. तो कालचा कुत्रा कुठून तरी धावत आला आणि भोवती नाचत राहिला.
त्याच्याशी खेळत वेळ मजेत गेला. सात वाजताच बागेचा स्टाफ आला.

आत शिरताच समोरचे विस्तीर्ण हिरवेगार कुरण बघून धावत सुटावेसे वाटले. ही बाग पुर्वी तिथल्या बोटॅनिकल
गार्डनचाच भाग होती, पण सध्या स्वतंत्र आहे.

आतमधे काही मोठी झाडे आहेतही पण भर आहे तो फुलझाडांवर. आणि त्याबाबतीत रंगांची लयलूट आहे.
भरपूर व्हरायटी आहे तिथे.

मी पोहोचलो त्यावेळी बागेत मी एकटाच होतो. किंचीत पावसाळी वातावरण होते. सूर्यही क्षितिजाच्या फार
वर आलेला नव्हता. त्यामूळे एखाद्या स्वप्ननगरीतच मी शिरलोय असे वाटत होते.

तिथे छोटेसे सरोवर आहे, आखीव रेखीव पायवाटा आहेत. आणि सर्व परीसर कमालीचा स्वच्छ आहे. आत एकही
विक्रेता नाही ( तो कुत्रा सुद्धा अगदी शहाणा होता. तो अजिबात गेटच्या आत आला नाही. )

अश्या वेळी माझ्याकडून माझ्या आणि तूमच्याही ज्या अपेक्षा असतात तेच मी केले. दिसेल त्या फुलाचा फोटो
काढत राहिलो ( कधी कधी एकाच फुलाचा दोनदाही.. पण वेगवेगळ्या कोनातून )

तिथली झाडे अगदी भरभरून फुलली होती. तुतारी आणि पावडर पफ च्या झाडाकडे बघून असे वाटत होते, कि
बाबांनो आजच सगळ्या कळ्या फुलवून ठेवल्यात, उद्यासाठी काही शिल्लक आहे कि नाही ?

आपल्या नेहमीच्या पाहण्यातली फुले पण तिथे जरा वेगळे रंगरुप घेऊन फुलली होती.. आणि एक चांगला लांबरुंद
गुलाबांचा ताटवा होता. त्यात फिरायला कुठलिही आडकाठी नव्हती ( हे पण नवलच, विपुल केश संभार असणार्या
श्रीलंकन तरुणी, अशी उघड्यावरची फुले तोडून केसात माळत नव्हत्या. ) मी झुरीक, मस्कत, ऑकलंड, नैरोबी, हॅमिल्टन अशा अनेक शहरातील गुलाबांच्या बागा बघितल्या आहेत. मस्कत सोडले तर बाकिच्या शहरातले गुलाब देखणे असले तरी सुगंधी नव्हते, या बागेतले गुलाब मात्र सुगंधी होते. तिथे माझे रेंगाळणे झालेच.

फड्या निवडुंगासारखा एक निवडुंग केनयातही भरभरून फुलतो. पिवळा, केशरी, पांढरा, गुलाबी असे अनेक रंग त्यात दिसतात. त्यापैकी पिवळ्या फुलांचा निवडुंग तिथे फुलला होता. खुपच मोठ्या प्रमाणात कळ्या होत्या त्यावर.

येस आणि चेरी ब्लॉसम.. या चेरी ब्लॉसमचे मी आजवर केवळ फोटोच बघितले होते. इथे तीनच झाडे होती. त्यापैकी दोन गेटजवळ आणि एक सरोवराकाठी. नाजूक गुलाबी फुलांचे गुच्छ लगडलेली झाडे लहान असली तरी
अप्रतिम सौंदर्याने नटलेली होती. मी आजवर फोटोत बघितल्यासारखी झाडांची गर्दी नव्हती तिथे पण ती
सुटी सुटी झाडे.. अहाहा.. कितीतरी वेळ भार हरपून मी तिथे ऊभा होतो.

तिथे पक्षी पण येत असावेत ( असा बोर्ड आहे तिथे ) मला मात्र दोन लहान पक्षीच दिसले. त्यापैकी मुनिया वेली गुलाबाच्या मांडवावर होता. नंतर फोटो बघताना लक्षात आले कि तिच्या पिसांवर मोरपिसासारखीच नक्षी आहे.
भारतातही तशी असते का याची कल्पना नाही.
खरं तर पाऊल निघत नव्हते पण ९ वाजायला आले होते. ब्रेकफास्ट केलाच नव्हता. परत परत वळून बघत बाहेर पडलो. हॉटेलवर आलो. ब्रेकफास्ट मस्तच होता.. पण आज लगेच आवरायला हवे होते. कँडीला निघणार होतो आज.

तर या बागेतले हे फोटो... खुप निवडक फोटो देतोय इथे...

1) The first look

2)

3) The show begins..

4)

5)

6)

7) Tutari Tree

8)

9)

10) A wide angle please !!

11)

12) Powder puff tree

13)

14)

15)

16)

17)

18)

19)

20)

21)

22)

23)

24)

25)

26)

27)

28)

29)

30)

31)

32)

33)

34)

35) My photo… just joking, wanted to show how early during the day it was !

36)

37)

38)

39) First I thought there was a huge spider inside, actually there were just casuarinas leaves.

40 ) This bloom was really eye catching.

41)

42)

43)


44)

45)

46)

47)

48)

49)

50)

51)

52) Even my camera didn’t know, where to focus !

53)

54)

55) This is the blooming cactus

56) It’s flower

57) I mean flowers..

58)

59)

60)

61) These flowers are beautiful… and

62) their remains too..

63)

64)

65)

66)

67)

68)

69)

70)

71)

72)

73)

74) This muniya had a beautiful feather coat, I am not sure if Indian muniya has similar one, at least I never noticed.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणी हो. भटक्याचे नशीब असावे तर तुमच्यासारखे आणी जिप्सीसारखे.

फुलान्चा नजारा बघुन डोळे आणी मन तृप्त झाले.

व्वा.. इथे नसतास रेंगाळलास तरच आश्चर्य वाटलं अस्तं.. Happy
केव्हढी फुललीयेत फुलं...... इतका फुलोपिसारा नव्हता बघण्यात आला..
मुनिया चे पंख अगदी डिझायनर आहेत.. ब्यूटी!!!

मस्त. अगदी नयनरम्य जागा आहे. पहिले फूल टीना च्या सिल्क च्या फुलांसारखे आहे. निसर्गातले रंग किती सुरेख आहेत नाही का?

वा! काय सुरेख फुलं आहेत... हे चांगल म्हणु की ते अस झालय.. ईतक सुंदर आहे का श्रीलंका!..
ती नक्षी वाली मुनिया खुप्पच गोड..

वा! मस्त आहेत फुलं. बागही सुरेख आहे.

४०, ४१, ४२, ४३ .... ती फुलं आहेत हॉलिहॉक्स (hollyhocks) किंवा Alcea ची.

फुलांचे फोटो बघुन ही मन तृप्त झालं. प्रत्यक्ष बघताना तुम्हाला किती मजा आली असेल.

अनंतचतुर्दशी झाल्यामुळे या मालिकेतील पुढील भागाची प्रतीक्षा होतीच.
नजर ठरू नये इतके सुरेख फोटो आहेत. मस्तं.

मस्त फोटो. किती सुंदर फुले आहेत ही...... मुनियाही सुरेख आहे. स्केली ब्रिस्टॅड मुनियाचे स्केल्स लांबुन पाहिलेत... जवळून कसे दिसतात देव जाणे.

सुपर्ब..
लक्की यु दिनेशदा..कसले मस्त फुल आहे..
कॅक्टर्स एवढा दाट फुललेला पहिल्यांदा पाहतेय..

आभार सर्वांचे,

मामी, मी पहिल्यांदाच बघितली हि फुले, यात आणखीही रंग असतील ना ?

मला तिथली सर्वात आवडलेली बाब म्हणजे स्वच्छता. मी आदल्या संध्याकाळीही तिथे होतो आणि अगदी सकाळीही पोहोचलो.. झाडूवाले अजिबात दिसले नाहीत. कचरापेट्याही नाहीत. काय जो थोडा कचरा होता तो गळून पडलेल्या पानांचाच. शिवाय सर्व झाडे नीट राखलेली, कुठेही वाळलेल्या फांद्या नाहीत, गुलाबांच्या झाडावर
सुकलेली फुले नाहीत. कागदाचा, प्लॅस्टीकचा कचरा तर अजिबातच नाही.

आणि आपल्याला अजून कँडीच्या बोटॅनिकल गार्डन मधे जायचे आहे बरं का !