'अशी ही अदलाबदली' - स्पायसी सॅलॅड स्टॅक - बदलून 'सालुदा'

Submitted by लाजो on 27 September, 2015 - 11:57

"सालुदा"

IMG_4403.JPGसाहित्यः

१ कप शेवया;
१ कप स्वीट कॉर्न चे दाणे;

१ कप पालकाची कोवळी पाने;
कोथिंबीर + मिरचीची चटणी;
रोस्टेड रेड कॅप्सिकम तुकडे;
काकडी किसुन;
क्रॅनबेरीज चे थोडे तुकडे;
मीठ, साखर चवी नुसार

स्पायसी पाप्रिका ऑइल:

ऑऑ
पाप्रिका

सजावटी करता:
अक्रोड
कोथिंबीर - पाने;

कृती:

१. गरम पाण्यात मिठ घालुन त्यात शेवया शिजवुन घेतल्या. आणि थंड करायला फ्रिजात ठेवल्या;

२. काकडी सोलुन, किसुन त्याचा रस काढुन घेतला. त्यात चवीला मिठ, साखर घातली आणि फ्रिजात ठेवला;

३. गरम पाण्यात पालकाची पाने धुवुन ब्लांच करुन घेतली. त्यात काकडीचा किस (राहिलेला चोथा) आणि कोथिंबीर + मिरचीची चट्णी घातली आणि मिक्सर मधे बारीक करून घेतले. (त्याला सुटलेले पाणी गाळुन पिऊन टाकले Proud या मिश्रणाच्या छोट्या गोट्या वळल्या आणि फ्रिझर मधे ठेवल्या;

४. कॅप्सिकम ला ऑऑ चोपडुन ओवन मधे रोस्ट करून घेतला. सालं काढुन रोस्टेड कॅप्सिकम चे तुकडे करुन घेतले.

५. ऑऑ मधे अक्रोडाचे तुकडे शॅलो फ्राय करून घेतले. बाजुला ठेऊन दिले.

६. गॅस बंद केला आणि या गरम तेलातच चमचाभर पाप्रिका घातली. बाजुला ठेऊन दिले.

७. आता सगळे जिन्नस फ्रिजातुन बाहेर काढुन आधी एक फोटु काढला Happy

IMG_4399.JPG

८. एका ग्लासात तळाला कॅप्सिकमचे तुकडे, कोथिंबीरीची पाने आणि कॉर्न चे दाणे घातले. त्यावर काकडी चा रस ओतला. त्यावर शेवयांचा थर घातला. त्यावर टोस्टेड अक्रोड, क्रॅनबेरीज आणि हिरव्या गोट्या ठेवल्या. वरतुन चिली ऑईल ड्रिझल केले...

IMG_4404.JPG

हेल्दी 'सालुदा' तयार....

IMG_4405.JPG

____

बदलून वापरलेले पदार्थ -

पर्ल कुसकुस - शेवया;
हरिसा - स्वीट कॉर्न
योगर्ट सॉस - चिली ऑईल

मुळ पाककृतीच्या जास्तीतजास्त स्टेप्स फॉलो करायचा प्रयत्न केला आहे.

____

माहितीचा स्त्रोतः फालुदा चे सलाद वर्जन Happy

अधिक टिपा:

वरती घातलेल्या हिरव्या गोट्या जरा मेल्ट झाल्या की त्या मस्त काकडीच्या रसात मिक्स होतात. फ्लेवर्ड काकडीरस आणखिनच छान लागला.

यात पुदिना पण अ‍ॅड करता येईल... एकदम रिफ्रेशिंग चव येईल.

उन्हाळ्यात गारेगार सालुदा मस्त लागेल Happy प्लस कॅलरीज चे टेन्शन नाही Wink

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users