देई मातीला आकार - अनन्या (नया है यह ;-) )

Submitted by विनार्च on 26 September, 2015 - 02:55

नमस्कार मंडळी, सांगितल्या प्रमाणे आम्ही अजून काही बाप्पा घडवले आहेत.... बघा कसे वाटताहेत Happy

हा सेल्फीवाला बाप्पा....ह्याला फोटोची एवढी घाई की कारखान्यातच कार्यक्रम आटपून घेतोय.....

IMG_20150926_113250.jpg

हा सेल्फीकॉर्नर मधला Happy

IMG_20150926_112951.jpg

हा टॉप गियरमध्ये गाडी चालवणारा बाप्पा...

IMG_20150926_112720.jpg

उंदीरमामांचा स्पीड इतका भन्नाट आहे की बाप्पाची टोपी उडालीय जी मामांनी आपल्या शेपटीत पकडलीय....
उंदराचे डोळे पिवळे आहेत कारण ते हेडलाइट आहेत Wink

IMG_20150926_112833.jpg

हा आमचा फेव्हरेटवाला बाप्पा.... ज्याची पुस्तकं वाचायचा सपाटा आम्ही सध्या लावलाय ...
" जिरो निमो स्टिलटन"

IMG_20150926_112606.jpg

आणि हा माझ्या फेव्हरेटचा फेव्हरेट.... बाबाचा Happy
सध्या घर सीओसीमय झालय. क्लॅश ऑफ क्लॅन हो.....मस्त गेम आहे.. बाबा खेळतो म्हणून मीपण....
बा अदब...... बा मुलायजा....... होशियार..... क्लॅश ऑफ क्लॅन का राजा आ रहा है.....
"बार्बरियन किंग"

IMG_20150926_112514.jpgIMG_20150926_112317.jpg

मग कसे वाटले माझे बाप्पा नक्की सांगा हं Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव अनन्या, मी फॅन झालेय तुझी..
सेल्फीवाला बाप्पा, टोपी सांभाळणारा मामा, " जिरो निमो स्टिलटन" आणि बार्बरियन किंग!
सगळेच खूप भारी दिसतायेत Happy

अग कसले सुरेख __/\__
डिटेलिंग तर कसले भारी. थ्रिपीस सूट, त्या जाकिटाची बटणं, ती उडालेली टोपी , किंगचा बेल्ट त्याचे टेक्श्चर, लईच भारी सगळे. टाळ्या Happy

अमेझिंग प्रकरण आहे हे! अनन्या शाब्बास.

टॉपगिअर वाल्या बाप्पांचे केसही किती मस्त उडताहेत. किती बारीक सारीक निरिक्षण आहे. वा!

सगळेच बाप्पा एकसे एक.

काय काय सुचतं ग तुला अनन्या!!
सगळेच बाप्पा मस्त, पण आमच्या घरी जिरो निमो जास्त आवडेल. Happy

A message for ananya. There will be a super blood moon tonight. Don't forget to watch it. Next time this will happen is in2033!!!.
Great art work. Best wishes.

भारी!!! अनन्या.... खुपच कल्पकता आहे तुझ्यात. सेल्फीवाला उंदीर कित्ती गोड पोझ घेऊन उभा आहे बरं Happy .. त्या किंगची चप्पल तर खासच... खुप छान सगळंच ...

Pages