अशी ही अदलाबदली --पा. क्रु. क्र. ५ --''ओट्स चे मोदक ''-- बदलून --''ओट कोकोनट स्वीट बॉल ''

Submitted by प्रभा on 25 September, 2015 - 13:24
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

मुळ क्रुती प्रमाणेच.बदललेले घटक -- १ वाटी दुधीचा कीस -- १ वाटी मलई
अर्धी वाटी गुळ -- अर्धी वाटी साखर

क्रमवार पाककृती: 

ओट चांगले भाजून मिक्सर मधे बारीक करुन घेतले. व थोड्या तुपावर खमंग भाजुन घेतले . गॅसवर पॅन मधे खोबर व साखर घेऊन पाकावर येइ पर्यंत गरम केल नंतर त्यात ओटच पीठ घातल. तर ते एकदमच कोरड झाल मग त्यात मलइ घालुन थोडा वेळ गॅसवर परतवुन घेतल नंतर वेलची पावडर घातली. थोड थंड झाल्यावर ड्राय फ्रूट च्या भरड मधे घोळवुन छोटे छोटे बॉल बनवलेत..

वाढणी/प्रमाण: 
आवडीनुसार ,
अधिक टिपा: 

आधी मी मिल्क पावडरच घेणार होते . पण बॉल बनले नसते म्हणुन मलइ घेतली. व फारच अप्रतिम पदार्थ तयार झाला. खुप विचार होता यावेळी . काय बनवाव कळत नव्हत. पण धन्यवाद मानते संयोजकांचे . खुप चॅलेंज होत. पण त्यामुळेच नविन पदार्थाची निर्मिती झाली. इतकी मस्त चव आहे याची कि ओटचेहि एव्हडे चांगले पदार्थ होऊ शकतात हे कळल. सर्वांनी नक्कीच करुन पहा हा प्रकार.

माहितीचा स्रोत: 
स्वप्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users