बकरी ईद..

Submitted by सचिन कुलकर्णी on 25 September, 2015 - 04:53

बकरी ईद:

हैद्राबादमध्ये गेले ४ वर्ष राहतोय. बकरी ईद जवळ आली की इथल्या मुस्लिमबहुल इलाक्यांमध्ये बकरीचे बाजार लागायला सुरुवात होते. मोठ्या मोठ्या रस्त्यांच्याकडेला मंडप टाकून तिथे बकऱ्यांचे जथेच्या जथे विक्रीसाठी आणले जातात. कुर्बानीसाठी भाविक लोक, मोठ्या कुटुंबातील लोक तसेच छोटे मोठे कसाई देखील इथून 'माल' घेऊन जातात. त्यामुळे कोणी स्कूटरवरून एक बकरी नेतोय तर काही जण टेम्पोच्या टेम्पो भरून बकऱ्या नेतोय हे दृश्य हमखास दिसते. त्या बकऱ्यांचे मात्र हाल बघवत नाहीत अश्या वेळेस. घेऊन जातांना त्यांचे पाय बांधले जातात. काही तरुण बकरे हे तोडायचा प्रयत्न करतात पण तेही थोड्या प्रयत्नानंतर कळून चुकतात की काही उपयोग नाही. अश्या वेळेस बकऱ्यांचे दीनवाणे चेहरे बघवत नाहीत. काल तर मला टेम्पोमध्ये २ तगडे बैल देखील घेऊन जातांना दिसले. (इथे गोवंश हत्या बंदी नाही).

खुद्द बकरी ईदच्या दिवशी तर रस्त्यांवर अत्यंत ओंगळवाणे दृश्य दिसते. रस्त्यावरच बकऱ्या कापल्या जातात त्यामुळे त्यांच्या रक्ताचे पाट रस्त्यांवरून वाहत असतात, तिथेच मांस विक्री होते, तिथेच त्यांची कातडी जाळली जाते त्यामुळे रस्त्यांवर दुर्गंधीचे साम्राज्य असते. कोणीही सेन्सीबल माणूस तिथून ह्ळह्ळ व्यक्त न करता आणि नाकाला रुमाल न लावता जाऊ शकत नाही आणि आरोग्याच्या साऱ्या संकल्पना तर वेशीवर टांगल्या जातात इथे..

तुम्ही प्रथेप्रमाणे कुर्बानी करा आणि समाजातल्या एका मोठ्या वर्गाचे हे अन्न आहे त्यामुळे बकऱ्या मारण्यावरदेखील आक्षेप नाही पण यातला किळसवाणा प्रकार टाळून हे सारे साजरे करता येणार नाही का ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी बरोबर बोललास आणि बघ ना, बसल्या बसल्या मला हे सुद्धा कळाले कि तुला चिकन प्रचंड आवडतं, दुधी,दोडका,कोबी,वांगी ह्या भाज्या आवडत नाहीत, कोबी खाल्लासच कधी तर तंदुरी चिकन बरोबर सॅलड म्हणूनच खातोस आणि पनिर्,सोया पनिर(टोफु) सोया वडी, मश्रुम्,अंडी,राजमा,चवळी,मसुर्,दाल-मखानी,दाल तडका तुला बोअर वाटतात. आता आपण पुढच्या वेळी भेटू तेव्हा कुठल्या हॉटेलात जायचं किंवा तुझ्यासाठी काय करून आणायचं ते ठरवणं मला सोप जाईल.

सचिन कुलकर्णी - अवांतराबद्दल क्षमस्व. मूळ लेखात तुम्ही विचारले आहेत त्याच्याशी सहमत. सगळा किळसवाणा प्रकार टाळता येणे शक्य आहे. पण भारतात सद्ध्या प्रत्येकाला आपल्या सो़ कॉल्ड रिती-भाती, परंपरा इ. चा डंका पिटणे महत्वाचे वाटू लागले आहे. कितीही किळसवाणे, कालबाह्य व निसर्गविरोधी असले तरी परंपरेच्या नावाखाली तेच बरोबर आहे म्हणायचे व इतर तसेच काय काय करतात ह्याची यादी द्यायची म्हणजे समोरच्याला उलटून विरोध करता येतो हा प्रघात तर आहेच. आणि विरोधकाला कायम "धर्मविरोधी", अल्पसंख्यांकावर अन्यायकारी वगैरे ठरवले कि मग झाले! त्यामुळे आपली कळकळ पटूनही त्याबाबत पुढे काय करता येईल ह्याचे उत्तर सापडणे अवघड आहे.

बोकडाचेही पेठे केल्याचे ऐकण्यात नाहीये >>>>
ह्या वरुन आठवलं - लिंबाचं लोणचं, लिंबाचं सरबत, लिंबाचं मटण.... ! Happy

Pages