मायबोली गणेशोत्सव २०१५ : उपक्रम "प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. २ - क्रांतिकारक निर्मिती! " १९ सप्टेंबर - समाप्त!

Submitted by संयोजक on 18 September, 2015 - 12:56

गणपती बाप्पा मोरया!

श्रीगणराया ही बुद्धीची देवता आणि याच बुद्धीचा विशेष वरदहस्त लाभलेली आपली मानवप्रजाती... या मानवानं आपल्या बुद्धीचा सदुपयोग करुन अश्या अनेक गोष्टी बनवल्या ज्यायोगे मानवजातीचा पुढचा प्रवास सुखकर झाला. एकेक निर्मिती ही त्या त्या क्षेत्रातील क्रांतीच म्हणा ना! मग ते चालत्याला धावतं बनवणारं चाक असो, स्वप्नांना पंख देणारं विमान असो, दूरच्या लोकांना जवळ आणणारा फोन असो किंवा दोन किनार्‍यांना जोडणारा पूल असो.

याच निर्मितीला आपल्याला सलाम करायचा आहे मायबोली गणेशोत्सव २०१५मध्ये, झब्बू खेळताना!

'क्रांतिकारक निर्मिती'

मानवाच्या आयुष्यात क्रांतिकारक परिवर्तन घडवून आणणार्‍या अश्या निर्मितीचं तुम्ही पाहिलेलं आणि टिपलेलं रूप तुम्हांला मायबोलीकरांना दाखवायचं आहे.

हे लक्षात ठेवा -

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. इथे केवळ क्रांतिकारक परीवर्तन घडवून आणणार्‍या निर्मितीची प्रकाशचित्रे अपेक्षित आहेत.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
४. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
६. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
७. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.

मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635

उदाहरणार्थ :-
Slide1_1.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भीमबेटका येथील गुहाचित्रे आदिमानवाने काढलेली ही भित्तीचित्रे म्हणजे कलेचा आद्य आविष्कारच !
इथल्या काही गुहांमधे तर १,००,००० होय एक लाख वर्षांपुर्वी मानव रहात होता अशी मान्यता आहे. अर्थात ही चित्रे मात्र ३०००० वर्षांपुर्वी काढण्यात आली असावी असा अंदाज आहे.

00008 (2)_1.jpg

शत्रूशी लढण्याचं तंत्र हळूहळू विकसित होत गेलं. त्याचंच हे उदाहरण.
सांगलीला राजवाड्याच्या मुख्य प्रवेश द्वारावर लावलेले हे अजस्त्र लोखंडी खिळे. हे इतक्या उंचीवर आहेत की बंद दरवाज्यावर हत्तीने धडका दिल्या तर या खिळ्यांवर त्याचं कपाळ आपटून तो जखमी होऊन परत फिरावा.
आता मात्र हे दरवाजे भिंतीत फिक्स झाले आहेत. आता याची उघडझाप होत अनाही.

अरे वा सगळेच फोटो मस्त....
ऑफीस मध्ये काम करता करता फोटो बघत होते आणि लिहण्यासाठे हातात पेन
घेतले, आणि लक्षात आले की अरे हे राहिलेच Happy
pen.jpg

क्रांतिकारक परीवर्तन घडवून आणणारी निर्मिती म्हणजे खरेतर बैलगाडी घोडागाडी वगैरे होऊ शकेल पण त्यातला पहिला महत्वाचा टप्पा म्हणजे जनावरांना माणसाळवणं त्यांना घातलेली वेसण त्यांच्यावर चढवलेलं खोगीर
तर हा फोटो याकच्या पाठीवरून होणार्‍या मालवाहतुकीचा

DSC02145.JPG

Pages