मायबोलीवरच्या स्वयंसेवेचा नोकरी व्यवसायासाठी उपयोग

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

गेली १९ वर्षे अनेक स्वयंसेवकांनी मायबोलीच्या विविध उपक्रमांसाठी आपला वेळ दिला आहे. याचा मायबोलीला फायदा झालाच पण स्वयंसेवकांनाही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या, वेगळ्या कामाचा अनुभव मिळाला.

वरचेवर, अशा प्रकारचा स्वयंसेवेचा अनुभव असणे ही काही प्रकारच्या नोकरी व्यवसायासाठी जमेची बाजू ठरते आहे.

सभासदांना, त्यांनी दिलेल्या योगदानाचा योग्य तो उपयोग व्हावा म्हणून लिंक्डईन या व्यावसायिक सोशल नेटवर्कवर आपण नुकतीच मायबोलीसाठी अधिकृत व्यक्तिरेखा तयार केली आहे. तुमचा अनुभव तुमच्या व्यक्तिरेखेवर लिहण्यासाठी तुम्ही याचा जरूर वापर करू शकता.
https://www.linkedin.com/company/maayboli-inc

या सुविधेचा वापर करताना , तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम केले (कंपनीतले कर्मचारी नाही) असे लिहणे अपेक्षित आहे. कारण कर्मचारी नसताना तसे भासेल असे लिहले तर तो दखलपात्र गुन्हा ठरू शकतो.

मायबोलीकर चिन्नू यांनी केलेल्या ईमेलमुळे ही कल्पना प्रत्यक्षात आली त्याबद्दल त्यांचे आभार.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

थँक यू अ‍ॅडमिन!
मायबोलीतर्फे आपण अनेक उपक्रम राबवतो. मायबोली गणेशोत्सव आणि दिवाळी अंक हे त्यातले मुख्य उदाहरण. २००८ मायबोली दिवाळी अंकातल्या कविता या उपविभागासाठी अल्पसे योगदान द्यायची संधी मिळाली. स्वातीताई, चिनूक्स, साजिरा, श्रध्दा अशा मंडळींबरोबर काम करता आले. खूप शिकता आले. तो अंक पाहून झालेला आनंद काय वर्णावा! संपादिका मेधाताई आणि टीमने खूप सांभाळून घेतले.
Maayboli Inc. हे नाव आता चिरपरिचित आहे. अशीच मायबोली आणि मायबोलीकरांची खूप प्रगती होत राहो!
Professional sites वर Voluntary Experience add करायचा सारखा आग्रह होत आहे. त्यासाठी मायबोलीचे पेज refer करण्याची संधी दिल्याबद्दल प्रशासनाचे मनापासून आभार.
स्वयंसेवक म्हणून पुन्हा हजर होइनच! Happy

मस्तच! मी सुद्धा माझ्या लिंन्क्डईन वर ह्याचा संदर्भ देईन. धन्यवाद चिन्नु आणि प्रशासक वर्ग!

व्वा, छान कल्पना.
मात्र मी कधी इथे स्वयंसेवक/संयोजक वगैरे बनलो नाहीये.
आपले आपले नुस्ते, "व्हॉलेन्टरीली प्रतिसादत" रहायचे, इतकेच.

Maayboli Inc. हे नाव आता चिरपरिचित आहे. अशीच मायबोली आणि मायबोलीकरांची खूप प्रगती होत राहो!>> +१००

धन्यवाद अ‍ॅडमीन. चिन्नु मस्त कल्पना. Happy

छान कल्पना! मी गणेशोत्सव , दिवाळी अंक , मभादि उपक्रमात काम केलेय

या अनुभवांचा निश्चित फायदा झालाय. मुख्य म्हणजे टीम वर्क कशाशी खातात हे समजत . वेगवेगळ्या देशातले टाइम झोन मधल्या माबोकरांबरोबर काम करण हा आनंददायी अनुभव असतो

लिंकडीन लिहिण्याकरता याचा निश्चित उपयोग होईल

धन्यवाद admin टीम

सही आहे हे
आता घरी जाऊन आईला सांगता येईल, तुझा मुलगा मायबोलीवर ऊंडारतो म्हणजे फुकट गेलेला नाही Happy

याचा सर्व संबंधितांना फायदा होवो या शुभेच्छा !

धन्यवाद एडमिन! अलीकडेच एका जॉब साठी applyकरताना संयुक्ताचा अनुभव लिहीणार होते पण काही इतर कारणाने त्या जॉब ला अप्लाई केले नाही. यापुढे नक्की लक्षात ठेवन.
धन्यवाद चिन्नु!

कल्पना छान आहे पण मायबोली वेबसाईट म्हणून एक वेगळे पेज असते तर चांगले झाले असते.
त्याच पानावर मग दिवाळी अंकाचीही लिंक देता आली असती.. म्हणजे काय स्वरुपाचे काम केले तेही दिसले असते.

मायबोलीचे लिंक्डइन प्रोफाइल काढले हे चांगले आहे. संयुक्ता व्यवस्थापनात काम केल्याचा अनुभव मी माझ्या लिंक्डइन प्रोफाइलमधे दोनेक वर्षांपुर्वीच टाकला आहे. दिवाळी अंकाचा पण टाकणार आहे. संयुक्ता व्यवस्थापन आणि दिवाळी अंक दोन्हीसाठी काम करताना एरवी उपयोगात किंवा अस्तित्वात नसलेले स्किल्स वापरता आले किंवा उमजून आले. तसेच दोन्ही उपक्रमांना माझ्या टेक्निकल बॅकग्राउंडचा फायदा करून देता आला. एकुणात ही मुच्युअल रिलेशनशिप आहे.

अरे वा!! अ‍ॅड केलं.
मी सुद्धा माझ्या लिंक्डइन वर Voluntary Experience च्या खाली मायबोलीवरच्या सामाजिक उपक्रमामध्ये स्वयंसेवक म्हणून काम करतेय हे लिहिलं आहे. तेंव्हाच लिंक्डिन वर मायबोलीला शोधलं होतं पण सापडली नव्हती. आत लोगो पाहून छान (जास्त ऑथेंटीक) वाटतंय :).
धन्यवाद अ‍ॅडमिन! चिन्नू तुला सुद्धा थँक्स! Happy