इंद्राणीची करणी

Submitted by मिल्या on 7 September, 2015 - 14:19

मिडीयामध्ये जिकडे तिकडे इंद्राणी धुमाकूळ घालत आहे. व्हॉट्स अॅपवर विनोदांचा पूर आलाय. मी म्हटले आपण पण वाहत्या इंद्रायणीत हात धुवून घेऊ -

इंद्राणीची करणी ! नमू तिच्या चरणी ! मिडीया भजनी ! लागीयली

कन्येला बहीण ! जगा भासवून ! लग्ने लपवून ! कांडे केली

अंड्यांचे पक्षीण ! शेताचे कुंपण ! करीती रक्षण ! हाचि नेम

घडे विलक्षण ! मातेने वैरीण ! होऊन भक्षण ! केली शीना

सखा शामवर ! खन्नाही तयार ! प्री-प्लॅन्ड मर्डर ! केला म्हणे

पैशाची ही खाज ! पाच पतीराज ! नाही लज्जा लाज ! तीच्या ठायी

बोले मिखाईल ! कशी ही बाईल ! कॅरॅक्टर सैल ! आहे तीचे

मिल्या म्हणे आता ! तुम्ही येता जाता ! हाणा बुक्या लाथा ! शिक्षा म्हणुनी

मिलिंद छत्रे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यांची टर्म तशीही संपतच होती ना ३० तारखेला? आणि ३० पर्यंत ते आहेत आयुक्त म्हणुन. आणि त्या कालावधीत तपास पुर्ण करु असेही ते बोलल्याचे आलेय बातम्यात.>> New CP has already disbanded team formed by Maria. May be after few days Indrani will be out on bail. Maria started probing financial aspect of Indrani / Peter so this was expected.

Interesting mandard...
इन्द्राणी प्रकरण सुनंदा पुष्कर प्रकरणाच्या प्रमाणे होईल का? म्हणजे कोणीच दोषी नाही आणि शेवटी शीनाने सुसाइड केली/तिला हार्ट अटॅक आला/ गुन्हेगार unknown आहे या तीनपैकी एक?

मिल्या म्हणे आता ! तुम्ही येता जाता ! हाणा बुक्या लाथा ! शिक्षा म्हणुनी

हे इंद्राणीला उद्देशून आहे का ही अशी काव्यप्रसुती केल्याबद्दल मिल्यालाच मारा असे कवी म्हणतोय....

शेवटची ओळ फार संदिग्ध आहे

विडंबन ठिकच आहे.

इंद्राणीवर अजून "चालू" (च चमच्यातला) घडामोडी" मधेय बीबी आला नाही का?

तिच्या प्रत्येक लग्नाची इंटरेस्टिंग कहाणी आहे- कॅरेक्टर वगैरे मोराल गोष्टींचा त्याच्याशी संबंनच नाही. . नवीन बाबी आला की तिथे लिहू.

.आशुचॅम्प.:हहगलो: मिल्याचे काही खरे नाही.:फिदी::दिवा:

इंद्राणीवर अजून "चालू" (च चमच्यातला) घडामोडी" मधेय बीबी आला नाही का?>>> तो ऋन्मेष तिकडे मान्साहार करण्यात गुन्तलाय. त्यामुळे त्याला वेळ झाला नसेल नाहीतर हे पिल्लु त्याने आधीच सोडले असते.

नाहीतर हे पिल्लु त्याने आधीच सोडले असते.
>>
ते सद्ध्या २०१५ या साली अचानक नव्यानेच लागु करण्यात आलेल्या मांसाहार बंदी बद्दल लिहित आहेत.
उरलेल्या वेळात ते अभ्यासात मग्न आहेत. नक्की किती नवरे, किती बायका, कोण कोणाची मुलगी, कोणी कोणास मारले ई. सर्व गणित सुटले की त्वरित त्यावरील धागाही येईल(च).

सलाळी बातम्यांमधे दाखवत होते की यावर चित्रपट बनवण्यासाठी कोणी दिग्गज लोकांनी काम सुरु केले आहे. त्यात म्हणे पार्ट १ ज्यात सध्या जे चाललय ते दाखवतील आणि नंतर पार्ट २ ज्यात न्यायलयीन कामकाज दाखवणार आहेत. कायंव करतंत!

नक्की किती नवरे, किती बायका, कोण कोणाची मुलगी, कोणी कोणास मारले ई. सर्व गणित सुटले की त्वरित त्यावरील धागाही येईल(च).
>>>

हो खरेय,
मला ज्यात नेमके काय भानगड आहे किंवा विषयाचे महत्व किती आहे हे हे समजत नाही तोपर्यंत मी त्याचा धागा काढत नाही.

तुर्तास एक समजलेय की इंद्राणी प्रकरन म्हणजे फक्त तिची लग्ने आणि खून एवढेच नाही, त्या पलीकडेही बरेच काही आहे, ज्याची कदाचित इकडे आपणा कोणाला कल्पनाही नसावी..

कदाचित व्यापम पेक्षाही भयानक असे काही..

कोणाला असेल अंदाज तर काढा धागा... लग्नपोरांच्या भानगडीपलीकडले वाचण्यास उत्सुक

व्यापम पेक्षाही भयानक असे काही >> बापरे , हे तर खुपच झालं..>>> सीरीयसली तसंच आहे. फार् गहिरा विषय आहे. अर्थात केवळ शीना मर्डर नाही, तर पीटर इंद्राणीचे अनेक इतर भान्गडी त्यात गुंतलेल्या आहेत.

नंदिनी, सहमत

टीना, हो.
तुम्ही तो दौड चित्रपट पाहिला आहे का? सोन्याच्या चोरीसाठी सीबीआयला केस सोपवली जाते. कारण ती चोरी साध्या सोन्याची नसून त्यात बॉम्ब असून ते एक आतंकवादी प्रकरण असते.
हे सुद्धा तसेच आहे समजा. कधी पाळंमुळे खणली गेली, किंवा खणली गेलेली लोकांसमोर आली तर ठिक अन्यथा आपल्यापर्यंत काही पोहोचणार नाही असेही होईल Happy

हे सुद्धा तसेच आहे समजा. >> ते आरुषी प्रकरणही असेच काही असेल अशी एक थेअरी ईथे माबोवरच पुर्वी वाचली होती.
त्या केसचे काय झाले पुढे?

धागा भलतीकडेच वळाला की...

Bad publicity is also a publicity हे आजच्या मिडियाला लागू होणारे वाक्य ह्य धाग्यालाही लागू झालेले दिसतेय...

असो... विडंबनावर प्रतिसाद देणार्‍यांचे आभार...

काहीना नाही आवडले विडंबन... ठीक आहे... त्यांच्या मताचा आदर आहे

पण काही काही विरोधी प्रतिक्रिया फारच हास्यास्पद आहेत... एकच चष्मा असेल तर सगळे जगच तसे दिसते तश्यातली गत वाटली..

एका बाईने पाच लग्ने केली तर काही प्रॉब्लेम नाही. १०० का करेना पण तिने जे प्रकार केले, मुलगी- मुलगा असल्याचे जाणीवपूर्वक लपवले, आधीची ल्ग्ने लपविली, आपली पॉवर व पैसा जाऊ नये म्हणून आणि गोष्टी ह्या थराला गेल्या की मातेने स्वतःच्या मुलगी व मुलाच्याही खूनाचा घाट घातला हे सगळेच उद्विग्न करणारे आहे त्यावर हे लिहिले...

तिच्या जागी एखाद्या बाप्याने असेच केले असते तर त्यालाही characterless च म्हणले असते ... इथे बाई - पुरुष असा काहीच फरक नाही

रिया :
खरे आहे हे विनोदी नाही पण विडंबनासाठी वेगळा ग्रूप सापडला नाही म्हणून विनोदी लेखनात लिहिले..
पण विडंबन विनोदी असलेच पाहिजे असे काही नाही... ग्रूप चुकला हे खरे..

असो.. इथल्या कही प्रतिक्रियांनी पुढच्या विडंबनाला कच्चा माल पुरवला हे नक्की Happy

नंदिनी आणि इतर : हे प्रकरण खूनापेक्षा हि कसे गंभीर आहे त्यावरचा एक लेख फेबुवर आलेला माझ्या वॉल वर मी शेअर पण केला होता...

बाकी धागा भरकटला आहेच तर चालू द्या बाकीच्यांचे

हे प्रकरण खूनापेक्षा हि कसे गंभीर आहे त्यावरचा एक लेख फेबुवर आलेला माझ्या वॉल वर मी शेअर पण केला होता... >> लिंक देता येईल इथं ?

बाकी हद म्हणजे तीचे टॉपलेस फोटोज क्स्काय वर व्हायरल होताय..
काय त्रास.. लोकांना नेमक कशावर चर्चा करावी आणि काय फॉरवर्ड कराव हे पन कळत नाही म्हणजे काय.. मुर्ख लेकाचे...

Pages