हीच कारा

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 5 September, 2015 - 13:32

मी अन ती नकळे कसे सोबत जगतो
एकमेका शाप देत उ:शाप जणू भोगतो

ओंजळी भरून सुख धावुनी मी आणतो
कोरडेच हात तिचे ओठ कोरडे पाहतो

साचली पाप मागील जन्मात या फेडतो
का नवीन बंध बेगडी गळ्यात या बांधतो

होणार ना सुटका जरी वाट सदैव पाहतो
घालून कोट लक्तरी मखमली मिरवतो

मोडलेला डाव माझा बळे मनी दडवतो
खेळणे दैवे प्राप्त जे गपगुमान खेळतो

हीच कारा हीच कबर जन्मठेप मानतो
काय केला गुन्हा परी ते नच जाणतो

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे. शेवटच्या कडव्याने 'जग ही बंदीशाळा'
या रचनेची/गाण्याची आठवण आली.

होणार ना सुटका जरी वाट सदैव पाहतो
घालून कोट लत्करी मखमली मिरवतो

इथे बहुदा लक्तरी असे म्हणायचे आहे का?