वाय-फाय कनेक्शन

Submitted by शर्मिला फडके on 5 September, 2015 - 12:28

घरच्या वाय-फाय कनेक्शनचा पासवर्ड कसा चेंज करायचा? मी लिहून ठेवल्या होत्या स्टेप्स पण ते कार्ड मिळत नाहीय. तातडीने पासवर्ड बदलणं गरजेचं झालय.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या रूटर- राउटर ला लॉगिन करायला लागेल. १९२.१६८.१.१ हा आयपी अड्रेस ट्राय करुन बघा. नाहीतर तुमच्या रूटर चे मॉडेल गूगल करुन हा आय पी अड्रेस शोधून काढ़ा

रूटरला देखील लॉगिन आणि पासवर्ड टाकायला लागेल. तिथून मग वाय फाय चा पासवर्ड बदलू शकता

जर रूटरचाच पासवर्ड विसरला असाल तर कुठेतरी पिन घुसवून फॅक्टरी रीसेट करता येतं का ते बघा

१९२.१६८.१.१ हा आयपी अड्रेस ट्राय करुन बघा. >> 192.168.0.1 ब-याच ठिकाणी.
सेटअप मधे वायरलेस सेटींगमधे -> मॅनुअल सेटींग मधे असेल