सिंडरेला

Submitted by रोहिणी निला on 1 September, 2015 - 02:24

माझ्या तुझ्या जिवाचे रात्रीत बोललो जे
इतकेच मागणे की विसरून जा पहाटे

बोलू नकोस कोठे जगलास काय रात्री
म्हणतिल परिकथा का कुणी सांगती पहाटे

डोळ्यात चन्द्र तारे अन श्वास कंपणारे
थाम्बेल का प्रिया ही रजनी जरा पहाटे

येउन टेकडीवर जरी चांद्ण्यात बसलो
वितळेल रात्र पाहता पाहता उद्या पहाटे

चल जाउया आता रे त्यांच्या जगात पुन्हा
उ:शाप रात्रीला मी शापित पुन्हा पहाटे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली आहे. मला मीटर वगैरे कळत नाही, पण वाचायला चांगली वाटली.

(बाकी एकदम "रक्तवाहिन्यांचा" आयडी आहे Happy )

कविता आपला प्रांत नाही पण नाव बघून आले Proud फारेन्डाशी सहमत.

पुलंचं पाळीव प्राणी ऐका ना, त्यात बरोब्बर उच्चार आहे सिंडरेलाचा.

शीर्षक वाचून मला वाटले की आमच्या त्या ह्यांचा पण फ्यान क्लब सुरू झाला की काय, म्हणून नावनोंदणी करायला आलो तर खरच कविता लिहिली आहे असे दिसत आहे.

छान आहे. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

प्रतिसादांबद्दल धन्यवाद.
ऱोहिणी ही माझी आई आणि निला म्हणजे सासूबाई
दोघींमुळे सगळं आलबेल आहे Happy