डिशवॉशर चर्चा

Submitted by योकु on 25 August, 2015 - 03:09

मला नवीन भुंगा डोक्याला लागलाय. सध्या कामवाल्या बाईचे काही प्रॉब्लेम्स आहेत. बायडीलाही खूप असा वेळ नाही मिळत मग तिच्या क्लिनीकच्या कामाकरता. तर भांडी करण्याकरता डिशवॉशर घ्यावा का अश्या विचारात आहे.
थोडा अभ्यास केला. पण तरीही बरेच प्रश्न आहेत.

- मार्केट मध्ये एलजी, सॅमसंग या कंपन्यांचे अगदीच एखाद दुसरं मॉडेल आहे. त्यामानानी बॉश, आयएफबी, सिमेन्स यांची प्रॉडक्ट रेन्ज चांगली आहे.
- सध्या रेंटेड अकोमोडेशन असल्यानी फ्री-स्टॅन्डिंग मशीनचा विचार करतोय.
- सगळ्याच कंपन्या म्हणताहेत की या मशीन्स भारतीय जेवणाची भांडी स्वच्छ करतात उदा. कढई, तपेली, मोठी भांडी वगैरे.

- इकडे कुणी वापरतंय का डिशवॉशर? काय अनुभव आहे? कुठल्या कंपनीचा घ्यावा?
- इलेक्ट्रॉनिक असल्यानी आफ्टर सेल्स सर्वीसचा ही विचार करायला लागेलच.
- यात आपलं नेहेमीचं साबण नाही चालत तर त्या मशीन ला लागणारं सॉल्ट, शायनिंग सोल्यूशन अन डिटर्जंट याचाही वेगळा खर्च आहेच, तो कितपत येतो? या गोष्टीं दुकानांमध्ये मिळतात का? की ऑनलाईनच मागवाव्या लागतात?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी वापरला आहे डिशवॉशर. मला त्याचा मुख्य उपयोग हिवाळ्यात वाटला. कारण पाणी जितक गार तितक भांडी घासायला नकोस वाटत हिवाळ्यात. पण आपली तेलकट तुपकट भांडी निघत नाही डिवॉमधे. भांडी नीट रचायला वेळ द्यावा लागतो. पण तू घे. गो अहेड.

मामी, लिंक्स करता धन्यवाद. मितान ची लिंक वाचेन जरा वेळ मिळाला की.

बी अरे डीवॉ असेल तरी त्याला थोडा तर वेळ द्यावा लगेलच ना. तेव्हढी आहे तयारी. बाईच्या कटकटीपेक्षा अन तिच्या वेळेत नाचण्यापेक्षा कितीतरी बरं ते...

माझ्या कडे २०१२ पासून आहे. व्यवस्थित चालू आहे.
आय एफ बी च आहे. अत्यंत उपयुक्त. भांडी विसळावी लागतात, पण ती एनीवे कामवाल्या बाईकरता ठेउ इतपतच. कढया करपवल्या असतील तर भिजवून ठेउन जरा घासाव्या लागतात. एरवी नाही. नॉन स्टीक भांडी डिश वॉशर सेफ असलेलीच पाहून घ्यावी. तसच प्लास्टीक / मावेची भांडीही डीवॉसेफ घ्यावी. सिंक च्या शेजारी असेल तर उत्तम. विसळून भांडी रचायला ( घरी ३ माणसे दोन्ही वेळाची एकत्र) दहा मिनीटे पुरतात. रात्री झोपताना लावल ( ५५ मिन ते १२० मि. फन्क्शन प्रमाणे वेळ लागतो)की सकाळी कुरकुरीत कोरडी भांडी , चहा होइपर्यंत जाग्यावरही लावता येतात.
कामवालीवर अवलंबून नसणे इज अ बिल्स!!