शृंगार २

Submitted by अनाहुत on 22 August, 2015 - 03:03

आपली नक्की काय चूक होते आहे तेच समजत नव्हत . आपण बायकोला पुरेसा वेळ देऊ शकत नाही हेच चुकत असाव बहुतेक . आधी कशी होती आणि आता कशी झाली आहे . किती इंटरेस्ट होता तीला . स्वतः हून पुढाकार घ्यायची , घरी आल कि स्वस्थ बसु द्यायची नाही . आणि आता काय झाल आहे तीच . आपण तिला दोष देण्यात काही अर्थ नाही . आपण आपल्या पासुनच सुरूवात करूया . आजकाल ऑफिसमध्ये इतका वेळ काम कराव लागत . हे तर होणारच आपण कुठे सरकारी नोकरांसारखे नशीबवान आहोत . पुढे ती लोकल त्यातली ती गर्दी , सुरूवाती सुरूवातीला त्याचही थ्रील वाटायच . नंतर त्याची सवय झाली आणि आता तर उबग येतो त्याचा . एवढी माणस वाढली तेवढया लोकल नाही वाढल्या . आता काही दिवसांनी एकमेकांच्या उरावर बसून प्रवास करावा लागतो की काय कुणास ठाऊक . हं डबलडेकर लोकल नाही तर हा उपाय होईल . जाऊदे मी पण काय विचार करत बसलो . जो प्रश्न इतक्या वर्षात नाही सुटला तो आता काय सुटणार आहे . पण चांगला विचार आहे एकमेकांच्या उरावर बसून . पण यात वर बसणा-याची मजा आहे , तेही खाली कोण आहे याच्यावर . बाकी खालच्याच मरणच आहे . आणि हा अनुभव तर रोजचाच आहे , बॉस बसलेलाच असतो रोज उरावर . आता लोकल शिवाय दुसरा इतका फास्ट आणि परवडणारा पर्याय नाही . त्यामुळे ते तर बदलता येणार नाही . दुसर म्हणजे ऑफिस तिथ काही तरी करून वेळ वाचवायला हवा . बाकीच नंतर पाहू पण आधी आठ एक दिवस रजा काढून कुठतरी फिरून येऊ . अगदी बाहेर नाही गेलो तरी घरी तरी राहू सोबत काही वेळ , तेवढाच चेंज . बघू एवढ्यातच थोडातरी फरक पडेल . आता ऑफिसमध्ये जाऊन पहिल हे काम करूया . लोकल स्टेशनवर पोहोचली सोबत विचारही निर्णयाच्या स्टेशनवर पोहोचले होते . आता आनंदातच आपला मोर्चा ऑफिसकडे वळविला . ऑफिसमध्ये सर्व आलबेल आहे हे पाहून काही वेळाने बॉसच्या केबिनमधे गेलो . आणि बॉससमोर रजेचा विषय काढला . इतका वेळ शांत बसलेला कुत्रा अचानक अंगावर धाऊन आल्यासारख झाल . काही बचाव करता आला नाही . छे काही कारण पण पुढ ठेवू दिल नाही . ह्या माणसाला काय बोलाव तेच कळत नाही . घरी बायकोशी भांडून येतो कि काय ऑफिसला कुणास ठाऊक . याच्या तर .... चार दोन शिव्या तरळून गेल्या जीभेवरून . आता पुढे काय ? मोठा प्रश्न आ वासून उभा होता . काहीतरी करून वेळ काढणे गरजेचे होते . काय कराव आता ? पण मला प्रश्न पडतोय काय प्रॉब्लेम असेल बॉसचा ? काय असणार स्वतःच वैवाहिक जीवन सुखी नसेल म्हणून बघवत नसेल दुसऱ्याच . घरी कर्तबगारी दाखवण्यात कमी पडत असेल म्हणून इथे कर्तबगारी दाखवत असेल . घरी कमी पडतोय म्हणून बायको ओरडत असेल आणि त्याच फ्रस्ट्रेशन हा इथ काढत असेल . कमी पडतोय म्हणून बायको ओरडत असेल ; बाकी जास्त पडत असेल तरी बायको ओरडणारच . एकूण काय तर कमी किंवा जास्त पडो बायको ओरडणारच . बाकी पुरूष म्हणून उभ राहण हीच कोणत्याही पुरुषाची सर्वात जास्त अभिमानाची गोष्ट . पण नुसत उभ राहूनही फायदा नाही , काम आणि रिझल्ट महत्त्वाचे . जाऊदे आपल काय चालल होत आणि हे काय . मग काय करु सरळ राजीनामा देऊन दुसरी नोकरी पहावी का ? छे हे फारच होईल .पण आयुष्य अस वाया घालवण्यात काय अर्थ आहे ? हो कितीही अघोरी वाटला तरी या शिवाय दुसरा मार्ग नाही आपल्याकडे . ठिक आहे हेच करू पण आधी कुणालातरी सांगून बघू . सावंत काकांकडे हा विषय काढला .

" अरे वेडा झाला आहेस का तू ? अरे अशी कशी तडकाफडकी नोकरी सोडण्याचा विचार केलास ? हे बघ एक तर आपण काय IT वाले नाही कि कधीही आणि कितीही वेळा नोकरी सोडायला . तेही फार विचार करुनच करतात अस . आणि बघ तुला या वयात जो पगार मिळतो तो बराच जास्त आहे . इथून सोडून दुसरीकडे कुठ गेलास तर तुला इतका पगार मिळेल याची शाश्वती नाही आणि एक्सपिरियंस असला तरी तिथे तू नवखाच ना ? म्हणजे काम नक्कीच जास्त . अरे म्हणजे पगार कमी आणि काम जास्त . मुर्खपणाच नव्हे का हा ."

अरेच्या ही गोष्ट माझ्या ध्यानातच आली नाही कि काम वाढुही शकत आणि त्यामुळे वेळही . छे यात काहीच शाश्वती नाही वेळ वाचण्याची , उलट वेळ जास्त जाण्याची शक्यताच जास्त .आणि नविन जागी तर मग फारस काही करताही येणार नाही . छे हे म्हणजे आगीतून फुफाट्यात गेल्यासारख होईल . बर झाल आपण आधी विचारल सावंत काकांना . काकांचे आभार मानले . मग कामाला लागलो . म्हणजे झाल आता नोकरी बदलणे हाही पर्याय गेला . फिरून परत पहिल्याच ठिकाणी पोहोचलो होतो . आता काय ? ठिक आहे मग आहे तो वेळ चांगल्या पद्धतीने वापरूया . थोडी फिटनेस वाढवूया , थोडा इंटरेस्ट वाढवूया , स्वतःचा आणि बायकोचाही . जिम जॉइन करूया . पण जिमसाठी वेळ कुठे आहे ? जाऊदे नाहीतरी आपण घरी जाऊन काय उपटतो ? उपटणे , कापणे का क्रीम काय कराव ? हे या क्षेत्रातले दिग्गज कसे अगदी क्लीन क्लीयर असतात तस कराव काहीतरी . पण काय करत असतील ? उपटणे छे आतंकी पर्याय . कापणे ठिक आहे पण भलतच कापल तर अवघड व्हायच , आहे तेही हातच जायच . क्रीम कुणाला माहीत याच्यासाठी वेगळ असत का ते बायका हाता पायावरच्या केसांसाठी वापरतात तेच असत , कुणाला माहीत ? एकदा चौकशी करायला हवी . कुणाकड करावी चौकशी ? जाऊदे उगाच ओळखी पाळखीच्यात नको . मेडिकलमधे करुया चौकशी , तेही जरा लांबच्या , उगाचच आपल अज्ञान नको जगापुढे . आपण इतक्या दिवसात अस काही वेगळ करण्याचा प्रयत्न केला नाही . नेहमी आपली तीच घिसीपिटी टेक्निक . घिसी आणि पिटी या पेक्षा वेगळ काय करणार ? तेच ते पण जरा नये अंदाज मे .......

..... क्रमशः
भाग १ http://www.maayboli.com/node/55229
भाग २ http://www.maayboli.com/node/55239
भाग ३ http://www.maayboli.com/node/55264
भाग ४ http://www.maayboli.com/node/55293
भाग ५ http://www.maayboli.com/node/55354
भाग ६ http://www.maayboli.com/node/55545
भाग ७ http://www.maayboli.com/node/55591
भाग ८ http://www.maayboli.com/node/58057
भाग ९ http://www.maayboli.com/node/58315
भाग १० http://www.maayboli.com/node/58327
भाग ११ http://www.maayboli.com/node/58339
भाग १२ http://www.maayboli.com/node/58350

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदम झक्कास........ मस्त चालेय कथा..

तुमच्या लिखाणाची स्टाईल आवडायला लागलीय.......!!!

..