जग

Submitted by जयदीप. on 21 August, 2015 - 10:35

पाहिजे तुला जसे...तसेच जग
तेवढी तुझ्यात जर असेल रग

ऎकणे शिकायला हवे तसे
कोण काय बोलते कळेल मग

पावसा, पडू नको उन्हापुढे
वाफ होउनी पुन्हा बनेल ढग

प्रेम विरह दुःख आणि वेदना
यापुढे कधी तुला दिसेल जग

मन मनात विरघळून जाउदे
एकदा तरी मला असे बिलग

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy Happy

व्वा