स्वैर भावानुवाद -परवीन शाकीर

Submitted by सुप्रिया जाधव. on 20 August, 2015 - 04:32

गाठीशी असलेल्या आजवरच्या थोड्या फ़ार पुण्याईने परवीन शाकिरच 'ख़ुशबू' नुकतच हातात पडल नि त्यातील एकेका गझलेच्या सुगंधाने मन वेड-पिस झाल !
स्वैर भावानुवाद करण्याचा पहिलाच प्रयत्न आहे.

तुझसे तो कोई गिला नहीं है
क़िस्मत में मेरी सिला नहीं है

मी सर्वार्थाने तुझी होवूनही तू मात्र माझा झाला नाहीस यात तसे पाहता तुझा काही एक दोष नाहीय कारण सत्कर्माच फळ मिळणे हे माझ्याच नशिबात नाहीय !

बिछड़े तो न जाने हाल क्या हो
जो शख़्स अभी मिला नहीं है

मनावर चितारला गेलेला परिकथेतला राजकुमार मला अजूनी भेटलेलाच नाहीय तर माझी ही अवस्था झालेली आहे, समजा यदाकदाचित अवतरलाच नि भेटून दुरावल्या गेला तर माझ काय होईल ह्याची कल्पनाच न केलेली उत्तम !!

जीने की तो आरज़ू ही कब थी
मरने का भी हौसला नहीं है

जगताना पदोपदी येणार्या अडचणींमुळे भरभरून जगण्याची ईच्छा-उमेद कधीचीच खचलेली आहे पण म्हणून मरणाला निधड्या छातीने कवटाळण्याची हिंमतही होत नाहीय.

जो जीस्त को मोतबर बना दे
ऐसा कोई सिलसिला नहीं है

पावलोपावली होणार्या फसवणूकीमुळे
जीवनावर सम्पूर्ण विश्वास टाकून ते जगाव असा काही घटनाक्रमही आयुष्यात घडत नाहीय.

ख़ुशबू का हिसाब हो चुका है
और फूल अभी खिला नहीं है

अजाणत्या वयातच न उमललेल्या कळीचा सौदा पक्का झालेला आहे,
व्यवहारी जगाने फूल सर्वोतोपरी उमलण्या आधीच त्याच्या सुंगधाची किंमतही ठरवून टाकलेली आहे !

सरशारी-ए-रहबर में देखा
पीछे मेरा क़ाफ़िला नहीं है

तत्वावर मार्गक्रमण करणार्या मार्गदर्शक समुहाकडे मी मागे वळून पाहिल तर त्यामधे माझ्या गोतावळयातल कुणीच नजरेस पडल नाही

इक ठेस पे दिल का फूट बहना
छूने में तो आबला नहीं है !

हा शेर आरपार भेदून गेला....
आयुष्याच्या वाटेवर लागलेली एक ठेच इतकी जीवघेणी होती की अक्षरशः ह्रदय रक्तबंबाळ झाल मात्र आश्चर्य हे की त्या ठसठसणार्या जागी स्पर्शून पाहिलं तर जखमेचा साधा लवलेषही तिथे नव्हता.

परवीन शाकिर

(भावानुवाद -सुप्रिया)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुप्रिया,

स्वैर भावानुवाद आवडला. गझल स्वरुपात करा ना. Happy

इम्प्लिसिट अर्थ जे तुम्ही एक्स्प्लिसिटली लिहिलेत ते कंसात टाकले तर ?

उदा:

तुझसे तो कोई गिला नहीं है
क़िस्मत में मेरी सिला नहीं है

(मी सर्वार्थाने तुझी होवूनही तू मात्र माझा झाला नाहीस यात) तसे पाहता तुझा काही एक दोष नाहीय कारण सत्कर्माच फळ मिळणे हे माझ्याच नशिबात नाहीय !

खूप सुंदर गझल
धन्यवाद सुप्रिया. भावानुवादही जबरदस्तच ___/\___
माझ्या मनात कविता अशी उमटली....(गझल हा माझा प्रांत नाही)

नाही तक्रार तुझ्याबद्दल काही
नशिबात माझ्या नाही यश काही

दुरावण्याचे असेल दु:ख तरीही
भेटलाही न सखया अजून जरीही

जगण्याची कधीही इच्छाही नव्हती
अन मरणाचे तरीही धाडस नाही

जगणेच सारे कठिण झालेले
असे तर नाहीच काही घडलेले

सुवास तर केव्हाच येऊन पोहोचलेला
मागमूसही नाही पण उमलण्याचा

चालूच आहे मार्गक्रमण अजूनि
अन् सोबतीस नाही कोणीच कोणी

ठेच एक सारी वेदना पिळवटणारी
निरखून बघितले व्रण साधा एक नाही