ओर्चाटा

Submitted by मॅगी on 16 August, 2015 - 13:52
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ तास
लागणारे जिन्नस: 

बासमती तांदुळ - पाव कप
बदाम - 3-4 (अलर्जी असेल तर स्किप करा)
पाणी - 3 कप
दूध - एक कप
दालचिनी पावडर - 1 टीस्पून
वनिला एक्सट्रॅक्ट - 1 टीस्पून
जायफळ - उगाळून 1 टीस्पून (नाही घातले तरी चालेल)
साखर - पाव कप (आवडीनुसार कमी जास्त करा)

क्रमवार पाककृती: 

1. तांदूळ आणि बदाम एक कप पाण्यात चार ते पाच तास भिजवून ठेवा.
2. ब्लेंडर मध्ये भिजलेले तांदूळ आणि बदाम घालून वाटून घ्या. मग त्यातच 3 कप पाणी घालून परत ब्लेंड करा.
3. तयार मिश्रण एका जगमध्ये गाळून घ्या. आता त्यात दूध, साखर, वनिला, दालचीनी आणि जायफळ घालून साखर विरघळेपर्यंत ढवळून फ्रीजमध्ये ठेवा.
4. गार झाल्यावर, एका ऊंच ग्लासमध्ये बर्फाचे तीन चार खडे टाकून त्यावर ओतून सर्व करा.. गार्निशिंगसाठी एक पुदिन्याची काडी ठेवा..

वाढणी/प्रमाण: 
2 जणांसाठी
अधिक टिपा: 

घरगुती!! रोमॅंटिक ईव्हनिंगसाठी परफेक्ट Wink

माहितीचा स्रोत: 
इंटरनेट
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओर्चाटा अतिशय आवडते. भिजवण्याऐवजी तांदूळ भाजून करते. ही कृती करून बघेन.

बी, ते तांदूळ नाही खायचे.. आपण ते गाळून फक्त पाणी घ्यायचे आहे. बघा करून, काही नाही होणार पोटाला.. Happy

अच्छा असे आहे का!!! मला वाटले तो गाळ सुद्धा प्यायचा. त्या तांदळाचा तू दुसरा काही उपयोग करतेस का मग?

वा!! तुझ्याकडे आयडीयाच आयडीया आहेत. बर्ड फीडींगची कल्पना छान आहे. त्या निमित्ताने घरात चिऊ काऊ येतीत. फक्त कबुतरे न येवोत.

छान प्रकार आहे. उत्साही वाटेल पिऊन Happy
साधारण असाच एक प्रकार बालिमधे होता ब्रेकफास्टला. पण त्यात तांदूळ वाटले नव्हते, सुगंधी तांदळाचे नुसते पाणी वापरले होते. खुप रिफ्रेशींग प्रकार होता तो ( ढवळायला गवती चहाही कांडी होती. )

वॉव! स्पेनमध्ये वास्तव्य असताना कायम प्यायचो आम्ही हे पेय (विकतचे). पण आम्ही चुफी म्हणायचो ह्याला. घरी करता येईल असे डोक्यातच आले नव्हते. आता नक्की करुन बघणार. खुप खुप धन्यवाद!

नेटवर वाचले कि नायजेरियात पण हे लोकप्रिय आहे. स्थानिक लोक हे पित असत पण त्याचे ब्रँडेड व्हर्जन नव्हते. मला वाटायचे काही तरी भलतेच पेय ( म्हणजे मादक वगैरे ) असेल म्हणून कधी प्यायलो नाही.

ते तांदुळ जरासेच वाटायचे आहेत अगदी पेस्ट होऊ देऊ नका. (तुकडे गाळता यायला हवे)

दिनेशदा, हो. ते दिसायलाही अगदी ताडी-माडी सारखे दिसते Lol

मादक ! Happy वेगळंच दिसतंय पेय. करून पाहायला हवं. मला पण कच्चे तांदूळ पाहून भीती वाटली होती. एकदा कोणा (बिचा-या) अमहाराष्ट्रीय मैत्रिणीला श्रीखंडाची रेसिपी सांगून झाल्यावर तिनं विचारलं होतं की, ‘मग हे सगळं गॅसवर कधी ठेवायचं?’. त्याची अाठवण झाली.