कोकण ..सावंतवाडी माझो गांव ...

Submitted by शैलेशगांवकर on 16 August, 2015 - 03:38

नमस्कार ....मित्रांनो .......आपल्या मायबोली वरील .."जिप्सी" ह्यांची "कोकणमय" मालिका आणि "यो रॉक्स" ह्यांची "कोकणफ्रेश" आणि मु.पो.बांबर्डे " मालिकेतील आपल्या कोकणाची प्रकाशचित्रे व वर्णन बघुन आणि वाचुन मलाही माझ्या गावचे म्हणजे घराचे प्रकशचित्रे पोस्ट करावीशी वाटले .....वाईट प्रकाशचित्रे आले असतील तर चुक भुल माफ असावी ... Happy

आमचे घर .. [कोकण शोभुन उठते ते ह्या मंगलोरी कौलांच्या छतांमुळे .. Happy हल्ली सिंमेटच्या स्लॅबची पण घरे दिसायला लागली आहेत ...जीव जळतो हे पाहून . . Sad ]
50(2).jpg

घरासमोरील खळे (अंगण)
75(3).jpg

घरासमोरील खळयातील तुळसी वृंदावन ...(घरातील वातावरण सात्विक होते ..संध्याकाळी कुलदैवतेला ..ग्रामदेवतेला,वास्तुदेवतेला नमन करुन दिवाबत्ती केली जाते .... )
75(2).jpg

घराचा एका बाजुने घेतलेला फोटो..
50(3).jpg

आम्ही काही काजुची ,कोकमाची आणि सागाची कलमे लावलेली आसत ..साधारण दोन वर्षापूर्वी .....थय जाणारी वाट ... आणि कोकणात सगळी कडे अशी वाट असता ..लाल मातीची .. Happy
50(6).jpg

हयती कलम ....आता थोडी मोठी झालेली आसत ..वरुणराजाची कृपा आसा ना आपल्या कोकणावर .. Happy
90(2).jpg

आणखी एक प्रचि ...तो डोंगर दिसता मा ...त्या थयसर तिलारी प्रकल्प असा..म्हणतत ....महाराष्ट्र आणि गोवा सरकारचो मिळान .. १५ वर्ष व्होत ईलित अजुन काय पुरा व्होणा नाय ....देवाक काळजी .... Happy
75.jpg

पावसातलो एक ...प्रचि ..भात शेती ..सुंदर वाटता मा ! Happy
50(4).jpg

मुंबई सुन गावाक येताना काढलेलो वशिष्ठ नदीचो प्रचि ..
90.jpg

- वाईट वाटला तर ......नविन समजुन दुर्लक्ष करा ..सुरवात हा मा .. :))

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहेत फोटो सगळे. गावची आठवण झाली अगदी. चि-याचे कौलारु घर खुप छान वाटाते बघायला.

लालबुडी लहान माकडे ती केडली आणि पुरुषभर उंचीचे, काळे तोंड आणि पांढरे केस असलेले ते वाण्डर.. ह्या वांडरांचा काहीच बण्दोबस्त का करत नाहीत देव जाणे. एकदा का ही टोळी आली की झाडांवर असलेली सगळी फुले/कच्चीपक्की फळे यांची वाट लावतात. कोणे एके काळी सावंतवाडी बंदुका घेऊन वांडरमारे यायचे. आता तेही येत नाहीत बहुतेक. वांडरांचे रुपडे पाहुन कोणीही माणुस त्यांच्या वाटेला जायचे धाडस करत नाही. पुर्ण कोकणात यांचा धुडगुस सुरू असतो. तिरोड्याला राहणारी माझ्या एका बहिणीच्या घरी मिरी, जायफळ इ. मसाले, नारळ, आंबे, सिताफळे, चिकु इ. झाडे आहेत. वांडरांमुळे खुप कमी फळे हाती येतात. बरे नीट खाऊन जातील तर तेही नाही, अर्धे कच्चे जमीनीवर पाडुन जातात.

Pages