भारत 'माझा' देश आहे , खरच ?

Submitted by अँन्ड्रोमेडा on 11 August, 2015 - 07:29

भारत 'माझा' देश आहे , खरच ?
मी आणि माझ घर या पलीकडे आपण कधी विचार करतो का ? घरातला कचरा कचराकुंडीत टाकतानाही आपण जराही काळजी घेत नाही . सरळ भिरकावून देण्याचा प्रयत्न करतो. मग तो कचरा कुंडीत वा बाहेर आपल्याला काळजी नसते . कारण हा रस्ता आपला नसतो . बसमधुन प्रवास करताना बसची आसने फाडली जातात त्यातुन स्पंज काढला जातो .कारण बस आपली नसते .देशातील विविध स्मारक ,पर्यटन स्थळ इथं जाऊन आपण परिसर अस्वच्छ करतो.अयोग्य मजकूर लिहिला जातो.कारण ही स्मारक ,पर्यटन स्थळ आपली नसतात.
इथले रस्ते ,बगिचे,कार्यालय ,सार्वजनिक वाहतुक व्यवस्था ,जंगलं,स्मारक ,पर्यटन स्थळ यातल आपल काहिच नसत. म्हणून याची कोणतीही जवाबदारी आपल्यावर नाही .हे सगळ आपल नाही तर आपल काय आहे या देशात . म्हणूनच प्रश्न पडतो, खरच भारत 'माझा' देश आहे ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरंय. आणखी वाईट म्हणजे अशा बेशिस्त, बेदरकार वागण्याला कायद्याचा धाकही नसतो, कसलीही भीती नसते.

जर कचरा केला की भरपुर दंड, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याबद्दल जेल अशा शिक्षा आणि त्या मुख्य म्हणजे इमानदारीने अमलात आणल्या तर या वागण्याला नक्कीच निर्बंध बसेल.
आपल्या देशात मनमानी करणारे हेच लोक जेव्हा बाहेर दुबई, सिंगापुर किंवा युरोपात फिरायला जातात तेव्हा शिस्तीत वागतातच नं. कारण हेच - तीथला कायद्याचा बडगा.

मी माझ्या घरात देखील आंघोळ केल्यावर टॉवेल बेडवर भिरकाऊन देतो, पण तरीही ते माझेच घर आहे. Happy

पण याउलट गंमत बघा,

मी स्टेशनवर भेळेचा कागद ट्रॅकवर न भिरकावता २००-३०० पावले चालून कचरा कुंडी शोधतो, वा ट्रेनमध्ये असेल तरीही खिडकीतून न फेकता बॅगच्या साईडकप्प्यात ठेवून त्याला घरच्या कचरापेटीपर्यंत पोहोचवतो.

मॉरल ऑफ द स्टोरी - इथे प्रश्न माझे तुझेचा नाही तर सवयीचा आणि शिस्तीचा आहे.

धाग्याचे शिर्षक हे खरच अंतर्मुख करणारे आहे.नवे कोरे चकचकीत झाडू घेउन मिडियाच्या गराड्यात राबवलेले सेलेब्रेटिंचे स्वच्छता अभियान हे खरे स्वच्छता अभियान नव्हे तर एक स्टंट आहे.देशात महात्मा गांधी,गाडगे महाराज यांनी खरेखुरे स्वच्छता अभियान राबवले होते.

तुम्ही स्टेशन वर भेळ खाता? भेळ तर चौपाटीला मिळते ना?

>>> हो हो. स्तेशनवरच्या कचराकुंडीत अथवा घरच्या कचरापेटीत भेळेचा कागद टाकता यावा म्हणून ते चौपाटीला भेळ घेतात आणि स्टेशनवर येऊन ट्रेन मध्ये खातात. काहीतरीच आपलं तुमचं १ + १/२ माबोकर

भेळ म्हणजे काही वर्तमानपत्र नाही जे स्टेशनवर मिळत नाही.

तसेच उदाहरणादाखल भेळ लिहिले असले तरी वडा-समोसा-बर्गर-फ्रॅंकी-सॅंण्डवीच-दाबेली-चायनीजभेल वगैरेंबरोबर जी कागदे-कवरे-पाकिटे-टिश्यूपेपर येतात त्या सर्वांची योग्य विल्हेवाट लागतो.

आता कालचेच घ्या ना. काल पनीररोल पार्सल घेऊन ट्रेनमध्ये खाल्ले आणि त्याचे पॅकिंग कव्हर, वापरलेले टिश्यू पेपर सोबत दिलेल्या प्लास्टीकच्या पिशवीत गुंडाळून घरी नेले अन घरच्या डस्टबिनमध्ये स्वाहाहा..

अवांतर - मुंबई-पुणे-मुंबई चित्रपटावरून आठवले, पुण्याला चौपाटी नाहीये तरी भेल मिळतेच ना सारसबागेत. आणि सारसबागही नसती तर पुणेकर भेल खायचे थांबले असते का? नाही ना..

आणि मुंबईचे म्हणाल तर मुंबई ही अशी जागा आहे जिथे जगातील कुठलीही वस्तू, कुठेही आणि कुठल्याही वेळी मिळते. Happy

नाही. मुम्बईत मला सकाळी आठच्या सुमारास प्रभादेवी परिसरात व चर्चगेट परिसरात ऑम्लेट मिळालेले नाही.

अहो वडापावच्या गाडी वर पावभाजी कशी मिळणार इराणी हॉटेल मधे ट्राय करा तिथे नक्कीच उत्तप्पा मिळेल

प्रभादेवी परिसरात सिद्धीविनायकाच्या कृपेने अंडा ऑमलेट दुर्लभ झाले असेल तर समजू शकतो, तरी किर्ती कॉलेजपर्यंत आला असता तर मिळाले असते ..
पण चर्चगेट परिसरात मिळाले नाही हे शक्यच नाही ..

पण चर्चगेट परिसरात मिळाले नाही हे शक्यच नाही ..
<<
हुडोबा,
तुम्हाला भाजप्यांसारखी लोणकढी खपवायची सवय कधी लागली? Wink

हे पा, चर्च गेट जवळ स्टेडिअम नावाचे एक भिकार इराणी रेस्टॉरन्ट आहे. तेथे टोस्टेड ब्रेड मिळत नाही . त्याचा टोस्टर बिघडला आहे आणि नवा टोस्टर आणायाचा नाही असे त्याने ठरवले आहे. त्यामुळे तिथले ऑम्लेट मी खात नाही . गार पुचुक शिळा ब्रेड तो देतो. ते वगळता तिथे आसपास कोठेही ऑम्लेट मिळत नाही.

काही लोक आहेत जे खरच स्वतःचा देश असल्याचा अभिमान बाळगून स्वच्छता ठेवतात आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करत नाहीत तसेच शक्य झाल्यास या मालमत्तेचे रक्षण करतात या सर्वांचा सार्थ अभिमान आहे . आपणामुळे इतरांनाही थोडी प्रेरणा मिळेल .