गट्टे :
१. बेसन - १ वाटी
२. पाणी - ४-५ चमचे
३. ओवा - अर्धा चमचा
४. मीठ - चवीनुसार
५. तेल - ३-४ चमचे
६. लाल मिरची पाऊडर - चिमूटभर
भाजी :
१. दही - एक ते दीड वाटी फेटलेले
२. तेल- २ चमचे
३. जीरे - अर्धा चमचा
४. लसूण आले पेस्ट - १ चमचा
५. साखर - अर्धा चमचा
६. हिरवी मिरची - दोन (चिरा देवून)
७. लाल मिरची पाऊडर- १ चमचा
८. धने पाऊडर - १ चमचा
९. गरम मसाला - अर्धा चमचा
१०. मीठ - चवीनुसार
११. बारीक चिरलेली कोथिंबीर (सजावटीसाठी)
गट्टे :
१. गट्टे ह्या शीर्षकाखाली लिहिलेले सर्व साहित्य एकत्र करून बेसन मळून घ्यावे.
२. मळलेल्या पीठाचा एक लांब किंवा दोन छोटे रोल करावे.
३. उकळत्या पाण्यात हे रोल साधारण १५ मिनिटे शिजवावे.
४. पाण्यातून बाहेर काढून एका चाळणीत पानी निथरू द्यावे.
५. रोल थंड झाल्यावर त्याचे काप करावेत.
भाजी:
१. एका कढईत तेल गरम झाले की जीरे टाकावेत.
२. जीरे तडतडले की त्यात आले लसूण पेस्ट परतावी. लगेच थोडीशी साखर टाकावी. साखरेमुळे दह्याचा आंबटपणा कमी होण्यास मदत होते.
३. फेटलेले दही आणि बाकीचे सर्व मसाले फोडणीत घालावेत.
४. सगळे मिश्रण व्यवस्थित ढवळून त्यात साधारण अर्धी वाटी पाणी घालावे.
५. एक उकळी काढावी.
६. गट्टे ह्या भाजीत टाकून साधारण ५-७ मिनिटांसाठी झाकून ठेवावे.
७. सजावटीसाठी कोथिंबीर भुरभुरावी.
दही फेटलेलेच असावे नाहीतर फोडणीत टाकल्यावर फाटते.
स्नू..खरच ते तिखट तिखट लागतच
स्नू..खरच ते तिखट तिखट लागतच नै गं..
कुणीच काश्मिरी तिखा वापरुन नै पाहिलय का इथं ..
बाकी चिमुटभर तिखट वाचल्यावर मी ते इग्नोअर करायच ठरवल हे पण तितकच खर म्हणा
काल केली होती गट्टे की
काल केली होती गट्टे की सब्जी!!
पटकन झाली आणि चवही मस्तच! बर्याच सिरियलमधे ऐकून होते, काल बनवली एकदाची
मुलाला पण आवडली. धन्यवाद स्नू
गट्टे थोडे घट्ट्च वाटले. किती सैलसर भिजवायचे???
स्नू टीना तू केलेला रस्सा
स्नू टीना तू केलेला रस्सा चान्गलाच रसरशीत दिसतोय. तोन्पासू!
विनीता, मी कणकेपेक्षा थोडसं
विनीता, मी कणकेपेक्षा थोडसं सैलच भिजवते बेसन. मळतांना तेल थोडे सढळ हाताने टाकावे लागते.
या रेसिपीचा रंग नक्की कसा
या रेसिपीचा रंग नक्की कसा यायला हवा? मला वाटलं दही आहे, तर पांढरट-पिवळा रंग येईल आणि लाल तिखट, गरम मसालाही अगदी कमी आहे. आणि चव मुख्य दह्याची यायला हवी ना? म्हणजे जराशी आंबटसर?
रेसिपी छान आहे. तगडा जवान
रेसिपी छान आहे. तगडा जवान क्युट आहे.
सगळ्यांचे फोटो मस्त आहेत. कधीतरी ट्राय करेन.
पूनम, वर दिलेल्या प्रमाणाने
पूनम, वर दिलेल्या प्रमाणाने केली तर रंग पिवळाच येतो. चव मात्र आंबट लागत नाही. थोडीशी साखर मी फोडणीत टाकली आहे त्यामुळे दहयाचा आंबटपणा कमी होतो.
ओके स्नू!! बेसन थोडे घट्ट
ओके स्नू!!
बेसन थोडे घट्ट भिजवले होते मी.
पुढच्या वेळी काळजी घेईन.
ड्बल पोस्ट
ड्बल पोस्ट
अरे व्वा मस्तच.. ही माझी
अरे व्वा मस्तच..
ही माझी रिक्षा..
http://www.maayboli.com/node/50076
सायली, ऑल्मोस्ट सेम आहे आपली
सायली, ऑल्मोस्ट सेम आहे आपली पद्धत. तुझ्या रिक्षात आणखी एक रिक्षा आहे.
हो मस्तच लागते ग ही भाजी..
हो मस्तच लागते ग ही भाजी..
आज मी असे गट्टे करून कढीत
आज मी असे गट्टे करून कढीत घातले. छान लागले.
एरवी मी कढीत नुसते गोळे तळून टाकते किंवा बऱ्याचदा मिक्स कडधान्यांची भजी करून टाकते किंवा कंटाळा आला तर मुगभाजी थोडी बाहेरून आणून कढीत टाकते.
अंजू, उकडलेले गट्टे तळून
अंजू, उकडलेले गट्टे तळून घातले की न तळता ?
मस्त आहे रेसिपी मी
मस्त आहे रेसिपी मी राजस्थानात कुकच्या हातची आणि एका मुंजीत गट्टे की सब्जी खाल्ली होती. दोन्ही वेळा ग्रेव्ही दाट होती. पंजाबी भाज्यांसारखी.
सातीची भाजी सात्त्विक दिसतेय आणि टीनाची मस्त झणझणीत.
कुणीच काश्मिरी तिखा वापरुन नै पाहिलय का इथं .. >>> मी फक्त काश्मिरी तिखटच वापरते. कमी तिखट असते ह्या एका कारणासाठी. रंग खरंच सुंदर येतो त्याचा. तुझ्या फोटोत आलाय तसा रंग यायला बरंच तिखट घालावं लागलं असणार. मात्र पट्टीच्या तिखट खाणार्यांना ते नक्कीच फार तिखट वाटणार नाही.
छोटा दिड पावणेदोन चमच
छोटा दिड पावणेदोन चमच अगो..
रंग छान येतो ते खरय पण अजिब्बात तिखट वाटत नाही..
यावेळी घरच तिखट आणि कश्मिरी तिखट मिक्स करेल मी कदाचित दोनास एक किंवा तिनास एक या प्रमाणात..
आणि ते दिसत अस कि जस कै डब्बाच ओतला मी तिखटाचा फोडणीत
मागे घरच तिखट आणल होत..त्याआधी जे वापरत होती त्या प्रमाणाप्रमाणे दोघींच्या भाजीत एक चमचा प्रमाणे ओतल..माझी रुमी कम मैत्रीण घासागणिक पाणी पित होती बिचारी..
आणि आता हे कशिमिरी..दिसायला लाल .. असो रंग छान येतो म्हणुनच जास्त खुश आहे मीपन
स्नू, न तळता घातले कढीत आणि
स्नू, न तळता घातले कढीत आणि कढी थोडा वेळ उकळत ठेवली. चांगले लागले.
ओके टीना
ओके टीना
फोडणीला बडीशोप पण घालून बघा.
फोडणीला बडीशोप पण घालून बघा. अजोन छान लागेल.
मी दही घालून कराय्च्या कोणत्याही भाजीत फोडणीला बशो टाकतेच टाकते..
आज सकाळी सकाळी माबो उघडून बसलेय ह्या रेसिपी साठी.
आज करून बघणार.
Pages