टिळक, तेल्या-तांबोळ्यांचे पुढारी की सनातनी ब्राम्हण?

Submitted by संदीप ताम्हनकर on 7 August, 2015 - 04:48

लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांवर ब्रिटिशांचे एजंट होते वगैरे टीका पूर्णतः तर्कटी आहे. परिस्थितीजन्य सोडल्यास असा कोणताही पुरावा नाही.
पण त्याचबरोबर टिळकांच्या व्यक्तित्वाची सनातनी ब्राम्हणी बाजू समजून घेणेही गरजेचे आहे. छत्रपती शाहू महाराज आणि तत्कालीन ब्राम्हण यांच्यामधील 'वेदोक्त - पुराणोक्त' या वादात टिळकांनी पूर्णतः सनातनी, ब्राम्हणी, संकुचित आणि जातीयवादी भूमिका घेतली होती. युगप्रवर्तक नेतृत्वाला साजेशी दूरदृष्टी दाखवत आणि तत्कालीन भटा ब्राम्हणांच्या विरुध्द भूमिका घेऊन छत्रपतींना वेदोक्त मंत्रोच्चारणात धार्मिक विधी करण्याच्या बाजूने टिळकांनी आपले मत आणि वजन टाकले असते तर आज महाराष्ट्राचा आणि देशाचा इतिहास वेगळा झाला असता. पण टिळक स्वजातीच्या लोकप्रिय विचारसरणीला चिकटून राहिले. क्षत्रियांना केवळ पुराणोक्त मंत्र म्हणून केलेल्या धार्मिक कृत्यांचाच अधिकार आहे. कारण कलीयुगात त्रीवर्णाचा लोप झाला असून ब्राम्हण सोडून उर्वरित सगळे शुद्र आहेत अशी, शिवाजी महाराजांनाही डोकेदुखी ठरलेली, अगम्य भूमिका टिळकांनी उचलून धरली हा इतिहास आहे. वस्तुतः वेदोक्ताचा अधिकार सर्वांनाच आहे अशी रास्त भूमिका टिळकांनी घेतली असती तर आकाश कोसळणार नव्हते. मुठभर ब्राम्हणांच्या विरोधाला भिण्याएवढे टिळक लेचेपेचे नव्हते. तरीसुद्धा त्यांनी घेतलेली प्रतिगामी भूमिका ही त्यांची प्रामाणिक आणि अंतस्थ धारणा होती.
त्यातून मग शाहू आणि टिळकांच्यात जन्मभराची तेढ निर्माण झाली. शाहुंनीही त्यावर प्रतिक्रियावादी कृती आणि विचारसरणी अवलंबिली. टिळकांना जरी तेल्या-तांबोळ्यांचे पुढारी म्हणत असले तरी टिळक जातीयवादी होते. राष्ट्रीय पातळीवरच्या या नेत्याने आधी स्वातंत्र्य अशी भूमिका घेऊन आगरकरांच्या समाजसुधारणेला विरोधाच केला होता.
अॅड. संदीप ताम्हनकर, पुणे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थोडक्यात टिळकांनी अस अस अस असायला हव पण तस तस तस ते नव्हते. शेवटी पिंडे पिंडे मतिर्भिन्नः

>>छत्रपती शाहू महाराज आणि तत्कालीन ब्राम्हण यांच्यामधील 'वेदोक्त - पुराणोक्त' या वादात टिळकांनी पूर्णतः ............................................................................. भूमिका टिळकांनी उचलून धरली हा इतिहास आहे<<
अ‍ॅड. साहेब, ह्या विषयी वाचायला अधिक आवडेल, जरा विस्तृत करुन सांगु शकाल का..आम्ही लय अडाणचोट माणसं आहोत, अन आम्हाला काय बी माहिती नाही ह्या बाबतीत, जरा सांगा की...जाणकारांनी परकाश टाका थोडा थोडा

वेदातल्या किंवा पुराणातल्या अशा कोणत्याही प्रार्थना, 'धर्मकृत्ये' इत्यादी केल्याने स्वर्गात मागच्या दाराने, छोट्या शिडीवरून प्रवेश मिळेल असल्या मंद कल्पना आधी सत्य मानून मग त्यापैकी कोणती प्रार्थना करायचा अधिकार असावा, याबद्दलचे वाद, मला नेहेमीच अनाकलनीय हास्यास्पद वाटत आले आहेत.

बाकी पॉपकॉर्न धागा आहे.

चालू द्या.

प्र. ह. , मिसळपाव ह्या संस्थाळाचे संस्थापक, विसोबांचा (लेखणी नाव) एक ब्लॉग आहे. त्यावरती त्यांनी तीन भागात यावर लिहीले आहे.
भाग १: http://khattamitha.blogspot.de/2008/04/1.html
भाग २: http://khattamitha.blogspot.de/2008/04/2.html
भाग ३: http://khattamitha.blogspot.de/2008/04/3.html

बाकी, भुतकाळात जे घडले ते घडले, ते आत्ता चीवडुन नेमके काय साध्य करायचे आहे, असा प्रश्न पडला आहे.

पण ते ब्रिटिशांचे एजंट्/परिस्थितीजन्य पुरावा वगैरे काय भानगड आहे.

तेव्हाचेच काय पण अगदी ५०-६० सालापर्यंतचे जवळजवळ सर्वच पुढारी- अगदी गांधींसकट- कधी सनातनी, कधी सर्वांना बरोबर नेणारे, तर कधी चक्क ब्रिटिशांना अनुकूल भूमिका घेणारे होते. नेहरू फक्त सनातनी नव्हते पण बाकी सेम. अनेक उदाहरणे आहेत.

'मि जयंत टिळक' नि न्.चि.केळकर लिखित. बाळ टिळक चरित्र् ह्यातील काहि उतारे हे वाचन्याजोगे आहेत.इच्छुकान्नि जरुर् वाचावित.

धाग्याची रास : भकास
(ताम्हणकर की ताह्मणकर ?)

राशीभविष्य : -

आता टिळकांचे समर्थक, हिंदुत्ववादी आयडीज यांचे आगमन होईल. त्यांच्या हातात ब्राह्मणद्वेष, बीग्रेडी अशा आरोळ्या ठोकणा-या तलवारी असतील. तर टिळकांचे केसरीतले लेख, वक्तव्ये, आणि त्यांच्याबद्दल लिहील्या गेलेल्या पानांचे उतारे घेऊन टिळक विरोधक मैदानात .उतरतील.

हा वाद चार पाने चालू राहील. तोपर्यंत सिनेमे पाहून झाल्यावर कसरतपटू मैदानात उतरतील. ते तारेवरून चालून दाखवताना दोन्हीकडच्यांना चुचकारण्याचा किंवा थपडवण्याचा प्रयत्न करतील.

त्यानंतर काही आयडीज प्लस वन, अनुमोदन अशा भिंग-या घेऊन उगवतील.

तारेवरच्या आयडीजना इंटरनॅशनल पुणेरी रॅशनल थिंकर्स असोएशनने सर्टिफाय केलेले आयडीज मम म्हणतील.

त्यानंतरही काही आयडीजचे समाधान न होऊन त्वेषपूर्ण लढत होईल आणि धाग्यास टाळे लागेल.

फा Proud
गांधी नेहरू हे युनिवर्सल कॅटॅलिस्ट आहेत. डायनोसॉर का नष्ट झाले या धाग्यातही त्यांना घुसवता येते. खरं म्हणजे यात या नेत्यांची महानता वगैरे काही नसून सन्माननीय सदस्यांच कौशल्य आहे, ज्याची नोंद जागतिक पातळीवर घेण्यात यावी.

शक्य झाल्यास वरील प्रतिसादाचे चित्र रूप सेवेत हजर करण्याचे प्रयत्न केले जातील. Happy

गांधी नेहरू हे युनिवर्सल कॅटॅलिस्ट आहेत. डायनोसॉर का नष्ट झाले या धाग्यातही त्यांना घुसवता येते. खरं म्हणजे यात या नेत्यांची महानता वगैरे काही नसून सन्माननीय सदस्यांच कौशल्य आहे,
>>>>

Rofl Rofl

विकु Lol

लेखातल्या आशयाविषयी काही म्हणायचे नाही.पण आजकाल केसरी वृत्तपत्राची अवस्था फारच खालवली आहे.अनेक सरकारी लायब्ररीजमध्ये केसरी फक्त नावाला पडलेला असतो.ना त्यात धड बातम्या असतात ना अग्रलेख.छपाईचा दर्जा म्हणाल तर १९३० चं छपाईतंत्र वापरत असावेत अशी शंका येते.

गांधी न्हेरू आणलेच आहेत, तर एक प्रश्न इथे विचारावा वाटतो.

टिळकांवर धागा निघाला तर "आता काय फरक पडतोय" "जुने कशाला उकरून काढत आहात?" अशी उत्तरे येतात.

पण इंदीरा गांधींचे नाव काय होते? आडनाव कसे बदलले? महात्मा गांधींनी तमुक साली काय केले? इ. प्रश्न मात्र नवेकोरे करकरीत असतात, आणि यावर चवीने रवंथ मायबोलीवर केला जातो.

तेव्हा मात्र फरक पडतो. नाही का?

का??

फेबूवर तर नेहरू ह्यांची कोणीतरी बाई कचकचून पप्पी घेतय असाही फोटोय( फोटो आहे). आणि गांधी ह्यांना चालताना सांधेदुखीचा त्रास असल्याने मदत लागायची स्वंयसेवीकांची असे आहे फोटोत.

आता फोटो दिलाय तर माहिती सुद्धा द्यायची ना? तर ते नाही.. Proud

वरती कोणीतरी आयडीने म्हटलय की "नेहरू सनातनी" न्हवते" ते ह्याच फोटोवरून का? का हाच पुरावा म्हणून आहे की काय? नुसती उदाहरणे आहेत सांगून काय उपेग? (उपयोग आहे) Proud

झंपीतै,
Proud ← याला आमच्या भाषेत उत्तप्पे आवडल्याचा स्मायली म्हणतात बर्का.

रच्याकने, राधासुता चं स्त्रीलिंगी काय?

वरती कोणीतरी आयडीने म्हटलय की "नेहरू सनातनी" न्हवते" >>> झंपी, मीच. टिळक व गांधी दोघेही जसे कधी सनातनी, कधी पुरोगामी तर कधी ब्रिटिशांना अनुकूल वागत त्याच्या तुलनेत नेहरूंबद्दल लिहीताना सनातनी वगळून बाकी दोन्ही होते अशा अर्थाने. सनातनी नव्हते कारण जास्त डावे, निधर्मी होते म्हणून.

उदाहरणांबद्दलचा पॉइंट कळाला नाही.

बाकी बहुतांश लोकांना आपल्या फेवरिट नेत्याबद्दल वाईट बोललेले चालत नाही, मात्र तोच नियम न आवडणार्‍या नेत्याबद्दल लागू होत नाही.

Pages