जमलच तर, याकुब...!

Submitted by Charudutt Ramti... on 6 August, 2015 - 20:36

" आणि जमलच तर, याकुब...! "

चार दिवस उलटले तरी अजुन
मनातून जात नाहीस तू याकूब,

फासाचे दोर गळ्याभोवती आवळू लागल्यावर
दयेचि याचना करणारा ‘तू’…
इथे रक्ता मासाचा सडा पडला होता,
तेंव्हा स्वत:च्या लेकीबाळी तेव्हड्या घेऊन
सहकुटुंब देशाटन करून निघून गेलास
तेंव्हा नाही का रे आली दया तुला आमची, याकूब ?

की दयेचा मक्ता फक्त इथल्या ' बुद्धीवाद्यांनी’ घ्यायचा ?
तुम्ही सूडबुद्धीवाद्यान्नि मात्र शत्रूशि हात मिळवत
इथल्या लेकीबाळीन्ना विधवा करायच,
आणि आमच्या भारतमातेची लक्तर दरवेळी जगाच्या वेशीवर टांगायची ?
सहनशक्तिचा किती अंत पाहता आमच्या रे, याकूब ?

याकुब, पण मला एक गोष्ट समजत नाही...
तुम्ही बनवता त्या बॉम्बमधे कोंबलेल्या खीळ्यान्ना आणि छर्यान्ना
कसे समजते रे ? की…
अमुक एक ‘मूर्तिपूजक’ माणसाच्या मेंदू मधे घुसायचे ?
की तुम्हाला कुणीही मेले तरी चालतात…?
मग ते पाच वेळेचे नमाजी का असेनात ?

पण याकुब तू असा का कधी विचार नाही करत ?
जसे तुझे छररे कुणाच्या तरी मेंदूत जातात ना
तसा 'तू' ही कुणाच्या तरी 'मेंदू'त गेला असशिल म्हणून ?
का तू आम्हाला ‘मूर्ख’ आणि ‘शंढ’ दोन्ही समजत होतास ?

आम्हाला माहीत आहे, तुझ्या एकट्याच्या जाण्यान
आमचे दोनशे सत्तावन्न नातलग नाही परत येणार
पण म्हणून काही संसार अर्ध्यावर सोडून गेलेल्या
माझ्या दोनशेसत्तावन्न आप्तान्शि
‘सहिष्णू’ होण्याच्या या माझ्या छंदा पाई,
आम्ही तुझ्या सारखे क्रुतघ्नपणे नाही रे वागू शकत...!

याकूब आम्ही तुला दया नाही दाखवू शकलो,
याबदद्ल तू मात्र थोडी 'सहिष्णुता' नक्की दाखव…
आणि जमलच याकूब, तर तू मात्र आम्हाला
यावेळी नक्की ‘माफ’ कर...

(चारूदत्त रामतीर्थकर, पुणे)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

याकुब, पण मला एक गोष्ट समजत नाही...
तुम्ही बनवता त्या बॉम्बमधे कोंबलेल्या खीळ्यान्ना आणि छर्यान्ना
कसे समजते रे ? की…
अमुक एक ‘मूर्तिपूजक’ माणसाच्या मेंदू मधे घुसायचे ?
की तुम्हाला कुणीही मेले तरी चालतात…?
मग ते पाच वेळेचे नमाजी का असेनात ?.>>>>>>हे जेव्हा कळेल तेव्हा जग खरच सुंदर झालेल असेल.
भावना पोचल्या.