प्राजक्त सडा

Submitted by खडी साखर on 6 August, 2015 - 10:49

सुखांना जातांना हासत निरोप दिला
दु:खाचा बदल्यात त्यांनी पत्ता दिला

वसंताचा बहर दुनिया ही लुटून गेली
आकांक्षांना माझ्या दीर्घ शीशीर दिला

अंगणातील तारे आपण मोजले होते
रातीने अंबराला सर्पाचा दंश दिला

त्या तिथे शिंपितो प्राजक्ताचा मी सडा
ऐलतीराने मग पलिकडे मार्ग दिला

खसा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

मीटर साठी करावं लागतं. गाण्यांमधे अनेकदा अशा तडजोडी केलेल्या असतात. नीट ऐकली तर कळून येईल. असोच.

ऐकलेली गाणी कधी तरी कागदावर लिहीलेलीच असतील ना ? इथेही तडजोड जाणीवपूर्वक केलेली आहे. त्यावर मतमतांतरं असू शकतात. धन्यवाद.

.

निसर्गचक्र
तुम्ही भाषाप्रभू, गझलकार, गझनवाझ वगैरे दिलेल्या टोमण्यांमुळे प्रतिसादांमुळे बहुधा हा आयडी माझा आहे असा समज झाल्याने प्रतिसादक यांनी जाणुनबुजून खोडसाळ प्रतिसाद दिला आहे. आता वेळ गेल्यानंतर प्रतिसाद एडीट करण्याने काय फायदा हे जाणून घ्यावेसे वाटले. दिवसा कामात असल्याने तुम्हाला प्रतिसाद संपादीत करा असा मेसेज करता आला नाही. पण केलेली विनंती लक्षात घ्याल अशी आशा होती.

.मुळात ते टोमणे नव्हते.कोणाला तसे का वाटले माहित नाही.
माझ्या प्रतिसादा मुळे कुणी दुखावले असल्यास मी माफी मागते.
मला वाद घालायचा नाही.

परवानगीबद्दल मन:पूर्वक आभार. आपल्या अपेक्षांना उतरण्यासाठी शब्द देतो, निराश करणार नाही. तूर्तास (सर्वांना) एव्हढेच सांगणे आहे की, कवितेवर प्रतिसाद देताना तेव्हढाच द्यावा. अवांतर बाबींसाठी त्या बाफचा वापर होऊ नये याची दक्षता सूज्ञांनी घ्यावी ही अपेक्षा. कुणाबद्दलचे विखार, मत्सर इत्यादीसाठी (कोणत्याही आयडीने) योग्य त्या आखाड्याचा वापर करावा.

कविता एक तर वाइट असू शकते किंवा चांगली असू शकते. आवडली तर कळवा न आवडली तरीही कळवा. वर कॊपरमाईन यांनी दिलेलं मत हे फक्त कवितेपुरतं मर्यादीत आहे, त्यावर मतभेद असू शकतात. त्यावर चर्चा पण होऊ शकते, पण अशा चर्चांनी रसभंग होऊ शकतं असं मत असल्याने ती त्यांच्या विपूत हलवलेली आहे.

अवांतर : कवीची कविता कितीही वाईट असली तरी ते त्यांचं स्वत:चं क्रिएशन असतं, त्यावर काही दीड शहाणे लोक मूर्खासारखे प्रतिसाद देऊ लागले तर त्यांच्याकडे विचारणा होणारच. अशा वेळी चूक मान्य करणे हा लोकमान्य मार्ग असतो. पण अशा गोष्टींची गंधवार्ता नसलेल्यांकडून फारशा अपेक्षा ठेवता येत नाहीत हे ही तेव्हढंच कटू सत्य आहे. बहि-याच्या कानात बाजा वाजवला काय अन हलवला काय !

नका इतकं मनावर घेउ.इथे असे बरेच लोक भेटतील तुम्हाला. तुम्ही लिहीत रहा. तरी अजुन स्वतःला गझलसम्राट वगैरे समजनारे अडीचशहाणे आलेले नाहीत ज्यांच्या स्वतःच्या गझला त्यांनातरी कळतात कि नाही कोण जाने.या इथे गझल खर्‍या अर्थाने जगणारे लोक फक्त सुप्रियाजी आणी कैलासजी आहेत.तेही गायब झालेत आता.
म्हस्के साहेबांच उदाहरण ठेवा समोर्,तुमचा कवितांचा दर्जा तर उत्तमच आहे शंकेला वाव नाही

Thanks Bhushan katakkar (alias Befikeer / tilakdharee / g samikshak and so on..) sir, ( though u r not a good judge) Lol

नमस्कार अ‍ॅडमीन महोदय,

ही तक्रार खचितच नाही. पण माझ्या मूळ नावाचा उल्लेख करून काहीतरी असंबद्ध प्रतिसाद दिसत आहेत ह्या धाग्यावर. मला काही समजलेले नाही काय चाललेले आहे ते! पण माझा ह्या धाग्याशी काही संबंधच नसताना पर्सनल रोख ठेवून असे का व्हावे कळत नाही.

http://www.maayboli.com/node/55044#new

ही एक कमेंट फक्त पेस्ट करत आहे.

>>> खडी साखर | 7 August, 2015 - 16:57 नवीन

Thanks Bhushan katakkar (alias Befikeer) sir, ( though u r not a good judge) हाहा
<<<

Uhoh

बाकी आधीच्या प्रतिसादांमध्येही काहीतरी अप्रत्यक्षपणे लिहिले असावे असे वाटत आहे.

माझ्या खर्‍या नावाचा उल्लेख दिसला आणि तो असंबद्ध वाटला म्हणून आपणांस कळवले. तसदीबद्दल क्षमस्व!

Happy

-'बेफिकीर'!

बेफिकीर प्रतिसादक हा आयडी तुमचा नाही असं तुम्ही म्हणत नाही आहात. तरी मी मा. अ‍ॅडमिन यांचे कडे अशी विनंती करतो की, प्रतिसादक हा आयडी कुणाचा आहे हे जाहीर व्हावे. कवितेच्या बाफचा वाद उकरून काढण्यासाठी उपयोग होऊ नये असं माझं मा आहे. पण ज्या सदस्यांचं असं मत नाही आणि केलेली विनंती धुडकावून तिलकधारी, गंभीर समीक्षक आणि इतर हजारो आयडींच्याप्रमाणे प्रतिसादक या आयडीने उकसावू प्रतिसाद दिला गेला आहे ते पाहता, वादच घालायचा असल्यास पूर्ण तयारी आहे. या वादाच्या मागे आयडी घालवणे हा हेतू आहे हे स्पष्ट दिसते आहे. त्य़ाला प्रशासनाचा पाठिंबा आहे किंवा कसे याची कल्पना नाही.

जर प्रतिसादक हा आयडी बेफिकीर यांचा असेल तर (शक्यता जास्त वाटते) इतकंच सांगायचं आहे की कविता कशाशी खातात हे बेफिकीर यांना माहीत नाही. त्यांनी गझलांचा अभ्यास केला आहे, तिकडेच पाजळावे. खरं म्हणजे त्यांच्या गझलाही फार चांगल्या वगैरे नसतात. अत्यंत रूक्ष आणि वाचता वाचताच झोप येईल अशा, भावनाहीन अशा त्या रचना असतात. कविता ही कला आहे, पण तिचा कारखाना करण्यात ज्या आधुनिक स्वयंघोषित कवींनी कामगिरी बनावली आहे त्यात बेफिकीर यांचा नंबर खूप वरचा आहे.

सबब त्यांनी किंवा त्यांच्या वतीने अनामिक आयडींनी केलेल्या कमेण्ट्सना शून्य किंमत आहे. आभार .

या बाफवर कवितेचे एक उत्तम जाणकार असलेले कमलेश पाटील यांचे मत शिरसावंद्य आहे. तसेच निव्वळ कवितेवर मत देणा-या कॉपतमाईन यांचेही आभार.

निसर्गचक्र आणि बेफिकीर यांनी आपापल्या विपूत वाद घालावा.

मुळात ते टोमणे नव्हते.कोणाला तसे का वाटले माहित नाही.
माझ्या प्रतिसादा मुळे कुणी दुखावले असल्यास मी माफी मागते.
मला वाद घालायचा नाही.

धन्यवाद माझा उल्लेल्ख केल्याबद्दल.मला कविता कळतात वगैरे असं काही नाही.माझ फक्त एकच मत आहे की कविता वाचता वाचता समजत जावी,उलगडत जावी.उगीच मात्रांचा अट्टाहास नको कारण एकतर ते अवघड काम आहे आणी तो हातखंडा फक्त भारती आणी मुग्धमानसी या दोन तायांचा आहे.त्याबद्दल दुमत नाही.

बेफिकिरजींबाबत बोलायचंंच झालं तर त्यांनी गझलेचं व्याकरण सर्वसामान्य लोकांना समजण्यासाठी बरंच काम केलंय(व्यक्तिशः मला त्याच्या गझला समजत नाहीत आणी त्यामुळी आवडत नाहीत कदाचीत माझ्या बुद्धीची झेप तितकी नसावी).तेव्हा उगीच लहान मुलांसारखे भांडत नका बसू.

छान कविता लिहा आणी आनंद मिळवा.

अवांतरः एकदा मी सुद्धा गझलेसाथी काहि शब्द सुचवण्याबद्दल इथे विनंती केली केली होती पण काही अतिशहाण्या लोकांनी आम्ही तुम्हाला जमिण पण देतो तुम्ही फक्त रोपं लावा असा सल्ल दीला होता.तेव्हा जास्त नादाला नाही लागायच अशा लोकांच्या.