रेघेवरची (ऑनलाईन) प्रेमकहाणी

Submitted by खडी साखर on 5 August, 2015 - 11:59

( ऑनलाईन प्रेमाची त-हा या ड्युएटमधून )

ती - जेव्हां मी पासवर्ड होईन
तो - तेव्हां मी लॉगिन होईन
ती - कॅची अकाउंट माझे
तो - खुषीने धरून ठेवीन
ती - मी तुला, तू मला
तो - चाटणखिडकीत भेटू
ती - रेघेवरी* हिरवा दिवा (*ऑनलाईन)
तो - पाहुन दिव्यांनी खेटू
ती - तासनतास मी बोलीन
तो - तेव्हां मी म्युटच राहीन
ती - जेव्हां मी पासवर्ड होईन
तो - तेव्हां मी लॉगिन होईन

ती - जेव्हां मी अबोल होईन
तो - तेव्हां मी सावध होईन
ती - जेव्हां मी सावध होईन
तो - तेव्हां मी अबोल होईन
ती - मी तुला, मी तुला
तो - नको ना काही सांगू
ती - बिझी का रे तुझा दिवा
तो - दुसरीशी झालोय लागू
ती - अकाउंट डिलीट करीन
तो - तेव्हांही लॉगिन होईन
ती - बरे झाले ओळखले
तो - असाच कायम राहीन
ती - ती सुद्धा, मीच रे
तो - ओह, तुझाच मी गं होईन

ती - जेव्हां मी अनफ्रेण्ड करीन
तो - तेव्हां हे पाय मी धरीन
ती - जेव्हां मी पासवर्ड बदलीन
तो- लॉग आउट तेव्हां मी होईन..

खसा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कविता टाईमपास म्हणून लिहीली होती. खूप ग्रेट ब्रिट नाहीच.
त्यामुळं लोकांना आवडली तर ठीकच, नाही आवडली तरी उत्तमच. वेळ पण असायला हवा.

(मला स्वतःला कुठे चांगलं लिखाण ओलांडून गेलं की मत्सर चिकटला कि काय भीती सतवायला लागते).