साठवूनी ठेव सार्‍या...

Submitted by मुग्धमानसी on 5 August, 2015 - 02:33

साठवूनी ठेव सार्‍या त्या खुणा माझ्या...
राहिले काहीच नाही मी जवळ माझ्या!

तो असा आला जवळ उत्पात हा झाला...
जीव जाउन मोकळ्या झाल्या व्यथा माझ्या!

दोन श्वासांनीच सारी वाचली गाथा...
अन् शहार्‍यांनी मिठीला ऐकले माझ्या!

वाफ झाली वेदनांची काय उष्मा हा...!
घे कवे अन् पावसाला मुक्त कर माझ्या!

समजला आहे मला व्यभिचार सुष्टांचा..
नीतिमत्तेला पुन्हा आव्हान दे माझ्या!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर

>>>वाफ झाली वेदनांची काय उष्मा हा...!
घे कवे अन् पावसाला मुक्त कर माझ्या!

समजला आहे मला व्यभिचार सुष्टांचा..
नीतिमत्तेला पुन्हा आव्हान दे माझ्या!<<<

ईन लव्ह!

उत्तम!

(गझल होऊ शकेल ह्या कवितेची - हे अवांतर)

समजला आहे मला व्यभिचार सुष्टांचा..
नीतिमत्तेला पुन्हा आव्हान दे माझ्या! >>> मस्तच!

मस्त !