बर का रे याकूब, तुला हे कळवलेच नाही मी!

Submitted by बेफ़िकीर on 3 August, 2015 - 20:09

बर का रे याकूब, तुला हे कळवलेच नाही मी!

तुला सोडण्यासाठी आम्ही होतो तयार सारे
दिले हजारोंनी फाशीच्या विरोधामधे नारे
तुझ्या दयेचा पाझर फोडत मेले अमुचे प्यारे

अस्मितेस पण अंतिम समयी झुकवलेच नाही मी
बर का रे याकूब, तुला हे कळवलेच नाही मी

सर्व यंत्रणा सुटकेसाठी सुसज्ज झाल्या होत्या
जगभर अमुच्या महतीच्या पालख्या निघाल्या होत्या
निष्पापांच्या किंकाळ्या केव्हाच निमाल्या होत्या

मात्र शेवटी भूमातेला फसवलेच नाही मी
बर का रे याकूब, तुला हे कळवलेच नाही मी

आम्ही कसले देशभक्त, आम्ही जातींवर लढतो
आम्ही कसले देशभक्त, आम्ही धर्मांवर भिडतो
पैसे खातो, गावे लुटतो, शहरे बकाल करतो
संसदीय माकडचाळ्यांनी दुनियेला हासवतो
शेतकर्‍याला लटकवतो अन् तिरंग्यास लाजवतो
हवे तिथे थुंकतो, कुठेही रस्त्याकडेस बसतो
नावे घेतो मोठी मोठी, कृत्ये खोटी करतो
विशालतेचा आव आणूनी किड्यासारखे जगतो

पण बर का याकूब, इथे याकूब कुणी झाला तर
गुन्हा सिद्ध झाला की त्याला फासावर लटकवतो

बर का रे याकूब तुला हे आता कळवत आहे
आता पंगा घेणार्‍याला भारत चिरडत आहे

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बर का रे याकूब तुला हे आता कळवत आहे
आता पंगा घेणार्‍याला भारत चिरडत आहे>>>>
जर पंगा घेण्यापुर्वी चिरडले तर किती बरे होईल.

बेफिकिभौ

किती मनस्ताप करुन घ्याल ? असतं एकेकाचे नशीब . तुम्ही वर्शभर पन्नास कार्यशाळा केल्या तरी टोटलमध्ये १५००० माणसे गोळा होत नाहीत .
आणि या याकूबच्या ......

असु द्या .

Proud

पंगा घेणार्‍याला चिरडत आहे म्हणे !

पाकिस्तानला साडी देणं आणि चीनबरोबर झोपाळ्यात झुलणं ...... विसरलात ?

Proud

जुनाच इतिहास नव्याने सुरु आहे... शत्रूच्या दारात रांग लावायला जायचे आणि कुठलातरी किरकोळ प्यादा मारून आभास निर्माण्करायचा.

असे बरेच याकूब सापडायचेत अजुन...
पण असो सुरूवात तर झाली असे समजू...
छान आहे कविता, मला आवडली.

छान जमलीय..मलापन आवडली.
पण असो सुरूवात तर झाली असे समजू... >> +१
उम्मीद पे दुनीया कायम है . उगा प्रत्येकवेळी उण्या बाजु शोधण्यात काही अर्थ नाही Happy

बर का रे याकूब तुला हे आता कळवत आहे
आता पंगा घेणार्‍याला भारत चिरडत आहे>

बर का रे याकूब तुला हे आता कळवत आहे
पाकिस्तानला साडी अन चीनला झोपाळ्यावर झुलवत आहे.

तुझ्या फाशीमुळे व्यापम ललितगेट विसरत आहे
आता आसाचे साक्षीदार देखील मरत आहे.

उगीचच ट्यारपी का वाढवा म्हणून दुर्लक्ष केलं होतं. पण हल्लीच तिलकधारी रोगाची लागण पुन्हा लागली असल्याचे दिसून आल्याने औषध फवारणीचा हा तुच्छ प्रयत्न, शक्य झाल्यास गोड मानून घ्यावा.

बेफिकीर हे स्वतःच कवी, स्वतःच समीक्षक, स्वतःच जज्ज असे सगळे स्वतःच कवी रजनीकांत असल्याने त्यांना जरी गरज नसली तरी सामान्यजणांना कवीच्या कविता जितक्या वाचाव्यात तसतसं त्याच्या कवितेचं समीक्षण करणं शक्य होतं.

त्यांच्या कविता आणि गझलांची समिक्षा करायची म्हटलं तर त्या वाचण्याचा अत्याचार सहन करणे आलेच. त्यांचे भक्त हा अत्याचार सहन करू शकतात. त्याची अनेक कारणे असू शकतात. तरीही त्यांच्या कविता आणि गझला वाचून एक नक्की होतं की कविता या विषयातलं त्यांना शून्य ज्ञान आहे. गझलेच्या बाबतीत त्यां चा अ‍ॅकेडमीक अभ्यास आहे. पण मुळातून सर्जनशीलता त्यांच्या ठायी नाही. यंत्रातून पार्ट्स बाहेर काढावेत तशा त्यांच्या ंकीबोर्डातून गझला टंकल्या जात असतात. त्यांची गझलेची काय व्याख्या असायची ती असो. खरा काव्यप्रेमी त्यातून रसनिष्पत्ती शोधत असतो. त्यांच्या हजार पाचशे कविता वाचाव्यात तेव्हां एखादीत ती सापडते. अन्यथा सगळाच शुष्क मामला. आडात नाहीतर पोह-यात कुठून येणार असं म्हणतात. भावनाहीन मानूस कवी बनल्यावर आणखी काय होणार ? तर ही त्यांच्या काव्यप्रपंचाची समिक्षा झाल्यानंतर आता कवितेकडे वळू.

शक्यतो अशा छंदमुक्त कविता जर्नेलिझम कवितेच्या अविष्कारासाठी, कविता वाचनासाठी लिहील्या जातात. दोनच दिवसांपूर्वी ट्ञुलिप यांची एक कविता वाचनात आली. किती सुंदर शब्द, किती सुंदर भावनाविष्कार. काव्य म्हणजे काय हे नवोदितांनी शिकावं. अर्थात कुनाकडून काही शिकावे हे बेफिकी यांना कमीपणाचे वाटते हे आढळून आलेलेल असल्याने ते कधीही अशा चांगल्या रचनेवर प्रतिसाद देत नाहीत.

या कवितेत व्यक्त झालेल्या भावनांसाठी त्यांनी एक चर्चेचा धागा उघडला होता. प्रत्येक विषयावरील चर्चा त्यांच्या अध्यक्षतेखाली का व्हावी हा एक कूटप्रश्नच आहे. त्या विषयातल्या जाणकारासोबत, कडून अशी चर्चा होणं वेगळं आणि आली लहर केला कहर म्हनून रोज एक धागा उघडणं वेगळं. या चर्चेत सगळे मुद्दे निरस्त झाले असताना पुन्हा दिशाभूल करणारी कविता का लिहाविशी वाटावी हे कोडंच आहे. जी काही चर्चा झाली त्याचे उद्देश काय, ती कुनी घडवून आणली, त्यामागची कारणे काय हे सर्व क्लिअर झालेलं आहे. सूज्ञ माणसाला सांगणे न लगे. तसंच जे कुणी टेक्नीकल मुद्यांवर चर्चा करत होते त्या सर्वांना देशद्रोही म्हणणे हे अकलेचं दिवाळं निघालेलं असल्याचं लक्षण आहे.

तरीही आपल्या भावनांचं प्रदर्शन करणं हा लोकशाहीत प्रत्येकाला हक्क आहे, जसा काही माहीती दडवून ठेवली गेली असा माध्यमांमधून गौप्यस्फोट झाल्यानंतर काही लोकांना व्यक्त व्हावंसं वाटलं. अमेरिका, इंग्लंड मधे अशी मतं व्यक्त करण्याला बंदी नाही. तसंच लगेच त्याला देशद्रोही ठरवणं हे अप्रगल्भतेचं लक्षण ठरवलं जातं. तसं कुणी असायला हरकत नाही. पण मग उठसूठ उठून विचारवंतांचा आव आणून लेक्चरबाजी करणं हे अनेकांना त्रासदायक वाटू शकतं.

कविता कशी आहे तर जर्नेलिझम पोएम आहे. अशा कविता विद्रोही शायर करत असतात. पण ते रस्त्यावर जमाबापुढे, मोर्च्यात कविता सादर करत असतात. दिवसभर एखाद्या संस्थळावर पडीक राहून लोकांना आपल्या वैच्झारीक दारिद्र्याचे प्रदर्शन करत सळो की पळो करणा-यांनी हाताळावयाचा हा प्रकार आहे का यावर नकारार्थी उत्तर येतं.

सध्या घाईत असल्याने इतकंच उर्वरीत वेळ असल्यास, इच्छा असल्यास पूर्ण करेन. तूर्तास अनामिक आयडींनी आपल्या कारवाया आवरत्या घ्याव्यात हे नम्र आवाहन संबंधितांना करण्यात येत आहे. बाकी आपली मर्जी.