मुंतजिर

Submitted by बेफ़िकीर on 31 July, 2015 - 07:18

मुंतजिर! (प्रतीक्षा करणारा)
=================

तिरीप पडली अनावृत्त तडजोडींवर
उद्रेकाचा उगम उजळला काहीसा
गुप्त खलबते झडली त्या धरसोडींवर
क्षणभर सगळा मेकप झाला नाहीसा

खच्ची करतो बाह्य जगाचा कोलाहल
चार पावले पुढे पोचलेले सारे
मीच विझवतो माझ्यामधला वडवानल
अनावृत्तता पडदा सारत शेफारे

'असणे' करते रोज प्रतीक्षा 'नसण्याची'
हेच कदाचित नसणे असेल एखादे
भीती दाखवते राजाला फसण्याची
प्रतिपक्षाचे चुकून फसलेले प्यादे

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'असणे' करते रोज प्रतीक्षा 'नसण्याची'
हेच कदाचित नसणे असेल एखादे
भीती दाखवते राजाला फसण्याची
प्रतिपक्षाचे चुकून फसलेले प्यादे>>व्वा
विशेष आवडले !