शिवथर घल (सुंदर मठ) ला जायचंय. माहिती हवी आहे

Submitted by अमोल सूर्यवंशी on 30 July, 2015 - 00:36

मला शनिवारी शिवथर घल (सुंदर मठ) ला जायचं आहे. अगोदर कोणी मायबोली मध्ये तिथे जाऊन आले आहे का ?

मला थोडी माहिती हवी आहे खालील प्रमाणे :

१> मुंबई वरून कसे जायचे ?
२> खाण्याची सोय कशी होऊ शकते तिथे ?
३> आम्ही तिथे १ दिवस राहणार आहोत तर जवळपास राहण्याची सोय आहे का ? असेल तर कुठे ?
४> जवळपास फिरण्यासारखे काही अजून कोणती कोणती ठिकाणे आहेत ?
५> अजून काही माहिती असेल तर कृपया सांगा

तुमच्या प्रतिक्रियेची वाट बघतोय.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमोल खालील माहितीचा तुम्हाला उपयोग होईल

१> मुंबई वरून कसे जायचे ?

मुंबईहून मुंबई गोवा महामार्गाने महाड ओलांडल्यावर वरंधा घाटाकडे जाणारा फाटा आहे. तिथून डावीकडे आत वळलं की सुमारे २५ किलोमीटर्स वर बारसगाव फाटा लागतो. तिथे शिवथरघळीची कमान आहे. कमानीतून डावीकडे आत गेलो की शिवथरघळीच्या पायथ्याला असलेल्या कुंभे शिवथर पर्यंत गाडीरस्ता आहे. मुंबई ते शिवथरघळ हे अंतर अंदाजे १५० किमी आहे.

२> खाण्याची सोय कशी होऊ शकते तिथे ?

शिवथरघळीत दुपारी व रात्री प्रसादाचे भोजन मोफत मिळते. याशिवाय जिथे घळीच्या पाय-या चालू होतात तिथे अनेक हॉटेल्स आहेत (शुद्ध शाकाहारी).

३> आम्ही तिथे १ दिवस राहणार आहोत तर जवळपास राहण्याची सोय आहे का ? असेल तर कुठे ?

शिवथरघळीत भक्त निवास (बहुदा मोफत) उपलब्ध आहे. पण हॉटेल हवे असल्यास महाड शिवाय पर्याय नाही.

४> जवळपास फिरण्यासारखे काही अजून कोणती कोणती ठिकाणे आहेत ?

शिवथरघळीतून पुण्याकडे आल्यास वरंधा घाट निसर्गरम्य आहे.

मुंबईच्या दिशेला रायगड,गांधारपाले लेणी इत्यादी ठिकाणे आहेत.

५> अजून काही माहिती असेल तर कृपया सांगा

शिवथरघळीच्या वरती चेराववाडी म्हणून गाव आहे. तिथे चंद्रराव मोरेंचा पडका वाडा पहायला मिळतो. स्थानिक माहितगार माणूस घेऊन ह्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता.

शिवथर घळीला जायला महाड पासुन एस. टी. आहेत का?

तिथे मिळणारा दुपारचा प्रसाद हा ठराविक वेळेतच मिळतो का? आपण प्रसादासाठी थांबणार असु तर तिथे नोंदणी करावी लागते असे ऐकले होते. हे खरंय का?

शिवथर घळीला जायला महाड पासुन एस. टी. आहेत का?
हो. महाड पासून शिवथरघळी ला जायला एस. टी आहेत पण खूप कमी फेऱ्या आहेत. त्या पेक्षा महाड पासून तम तम असतात चालू सारख्या भिर्वाडी पर्यंत आणि मग तिथून शिवथर घळी ला जायला दुसरी तम तम. हे खूप स्वस्त पडत. ८०-१०० रुपया मध्ये तुम्ही घळी ला पोहचू शकता.

तिथे मिळणारा दुपारचा प्रसाद हा ठराविक वेळेतच मिळतो का? आपण प्रसादासाठी थांबणार असु तर तिथे नोंदणी करावी लागते असे ऐकले होते. हे खरंय का?
हो. दुपारचा प्रसाद फक्त १-२ या वेळेतच मिळतो. प्रसादामध्ये मस्त भाताची खिचडी असते. पण माकडांपासून जरा सावधान राहावे लागते.

मुंबई हुन किति वेळ लागेल.
तिथला काही संपर्क क्रमांक मिळेल का?

कल्याण येथुन शिवथरघळीत जाण्यासाठी बस नक्की आहे. मी तेथुन परतीच्या बसने , सकाळी सात वाजता निघुन जवळच्या रेल्वे स्टेशनवर आलो होतो. तेथुन रेल्वेने दादर मार्गे बोरिवली येथे परतलो होतो. २०१२ साली " दासबोध शिका , शिवथर घळीत " या उपक्रमानुसार सात दिवस तेथेच मुककाम होता.त्या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त तीन दिवस् राहाता येते. आगावू सुचना देवुन खोलीचे आरक्षण करता येते. यथा शक्ती देणगीची अपेक्षा असते. सम्पर्क क्रमांक एक दोन दिवसात कळवितो.पण पावसाळ्यातच जाण्यात खरी मजा असते. कारण जवळच अवघ्या वीस फुटावरुन पाण्याचा सुंदर धबधबा पहावयास मिळतो.