माझ्या मनातले

Submitted by Nilam Buchade on 23 July, 2015 - 03:36

***कवीता *****
कवीता म्हणजे कवीजीवनाचे पहीले पान
कवीता म्हणजे कल्पनांचे सोनेरी रान
कवीता म्हणजे मनःचक्षूंचे प्रतीबींब
कवीता म्हणजे उगवणारे सूर्यबींब
कवीता म्हणजे हरवत जाणारी वाट
कवीता म्हणजे सुवीचारांची पहाट
कवीता म्हणजे तृणातील इवले फूल
कवीता म्हणजे शब्दांची सोनेरी झूल
कवीता म्हणजे प्रतीभेचा मधुर मेवा
कवीता म्हणजे कवीचा अनमोल ठेवा .

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users