दहिसर येथील नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या निमित्ताने..

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 July, 2015 - 05:59

एखाद्या सोसायटीमध्ये मांसाहाराला परवानगी नाकारणे हे चूक की बरोबर ही चर्चा काही नवीन नाही.

मात्र दहिसर येथील मराठी नाट्य निर्माते गोविंद चव्हाण यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर मात्र हा प्रश्न एक समस्या बनत चिघळण्याची शक्यता आहे, कारण याचे राजकीय पडसाद देखील उमटू लागले आहेत.

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/marathi-family...

काल सोशलसाईटसवर सहज चक्कर टाकता, या वादाला शाकाहारी-मांसाहारी, गुजराती-मराठी, तसेच भाजपा समर्थक आणि भाजपा विरोधक (वा सेना समर्थक) असे विविध आयाम आलेत. कारण गुजराती समाज हा भाजपाची वोटबॅंक समजला जातो आणि भाजपाच्या राज्यात ईतर कोणाचे अच्छे दिन येवो ना येवो, या समाजाचे नक्की येणार, असा एक मतप्रवाह जनसामान्यांमध्ये आहे.

त्याचबरोबर या प्रकरणात निर्माता संघाचे सचिव दिलीप जाधव यांनी, "..... गुजराती भाषकांनी अशी बळजबरी केली, तर कोणत्याही मराठी नाट्यगृहावर आम्ही गुजराती नाटके होऊ देणार नाही" असा पवित्रा घेतला आहे.

एकंदरीत या प्रकरणाबद्दल आपल्याला काय वाटते ?

माझ्यामते जर आधीपासून त्या सोसायटीत मांसाहार करू नये असा काही नियम नसेल, गोविंद चव्हाण यांना घर घेताना अश्या काही निर्बंधाना सामोरे जावे लागेल याची काहीच कल्पना नसेल, तर त्यांच्यावर अशी जबरदस्ती हा फार मोठा गुन्हा आहे. मी स्वत: मांसाहारप्रिय आहे आणि मांसाहाराशिवाय जगणे सहनही करू शकत नाही, म्हणून या प्रकारच्या बळजबरीतले गांभीर्य ओळखतो.

त्याचबरोबर, त्या हल्ला करणार्‍या रहिवाश्यांची तरुण मुले बाहेर जाऊन मांसाहार तर करत नाहीत, हा देखील एक शोधकामाचा विषय ठरेल. अन्यथा एकंदरीतच हे असले नियम बनवणे फार हास्यास्पद ठरेल.

अवांतर - मला पडलेला एक प्रश्न - माझ्या माहितीसाठी विचारतोय - मांसाहाराच्या जोडीने मद्यपान देखील करू नये असाही नियम असतो का या सोसायट्यांमध्ये? की ते चालते?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मांसाहार करणार्यानी एकदा 'फार्म टू फ्रिज' हा विडिओ जरूर बघा 'तू नळी' वर उपलब्ध आहे....! >>>>

ओके, शोधतो, बघतो, पण तरी तुम्ही एका लाईनीत कश्यावर आहे, काय संदेश आहे सांगू शकाल का?

Pages