मार्केट(यार्ड)... एक संवादी मुक्तक! भाग-१

Submitted by अत्रुप्त आत्मा on 17 July, 2015 - 02:09

ढिश्श्....क्लेमर! :- ज्यांना लेखन वाचताना शिव्यांचा व तथाकथित अश्लिलाचा त्रास होतो,त्यांनी खरच येथून खाली वाचू नये..आणि तरिही वाचलेत व वाचून वाइट वग्रे वाटू लागले..तर ते मनातल्या मनातच-वाटून घ्यावे! Wink तसेच कथा/संवाद हे वास्तववादी आणि पात्र काल्पनिक आहेत. हे क्रिप्या लक्षात ठिव्ने! Wink

टाइमः- हमालांची ..मार्केटयार्ड मधली कामं संपल्यानंतरची एक दुपार..

राम्या:- ए गन्या........गां*&^% बडिशोप कशाला आन्ली बे परत?
गन्या:- मां...ग्??? सारकि सारकि जिरा कशाला? आजारी पडल्यागत वाटतं पिताना
राम्या:- आरं पन आय&^%$ हीनी दुपारचं आंग लै काटा मारत ना बे.......!
गन्या:- मंग त्येला काय जालं? दुपारचा तिकडं जा की काटा काढायला..
राम्या:- हा...........मला बायका प्वारं हायेत..तुज्यासारखा धा ठिकानी सोडल्याला हे ? व्हय का रे भाड%$?
गन्या:- ह्हा ह्हा ह्हा ह्हा ह्हा....... आयच्या गावात तुज्या...तुला ह्ये आवाडतं आनी त्ये का नाय रे आवडत?
राम्या:-मला नाय लागत तस्लं..आपली ती सवय न्है..आपली लावली थोडी कुटं ज्येवलं नंतर की निवांत झोपाव घरला..
गन्या:-ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआआआआ .तू भेतो ..खरं सांग? भेतो का नाय?
राम्या:- हा......कशाचं भ्या? छत्री वापारली,तर पावसाचं भ्या कोन्ला? तुज्यासारखा गायबानछाप असतो तर भ्येलो असतो..आम्हाला आपलं आदी पासून म्हैते.."हात न धुता खाऊ नये अन्न्,आनी *****नी आदी झाकुन घ्याव ****!"
गन्या:- ह्ये ज्यायचं तेज्या...मुतार्‍यात ल्हिलेलं कै बी वाचतो व्हय? येड्या&*^चा का रे तू...?
राम्या:- आता तुजी गां&^% *&^न दाखवू का कसल्या ह्याचा मी हे ते...एयच तेच्या..
गन्या:-
ह्हॅ ह्हॅ हा...ह्हा..ह्हा..
ह्हॅ ह्हॅ हा...ह्हा..ह्हा..
ह्हॅ ह्हॅ हा...ह्हा..ह्हा..

बरं...बरं..जाऊ दे तू श्यान्या बोड्याचा....मग आज चल की ..छत्र्या हेत माज्याकडं...
राम्या:- त्ये ठेव तुलाच..माजी पाठ दुखायली..मी झोपायलो हितच आता..जेवन झाल्यावं. तू जा तुजी आय *&^% जाऊन तिकडं
गन्या:-ह्या ह्या ह्हुक्क! मी बी कटाळलो.. आता मि आंग टाकतो हितच आज.. मला ज्येवान नको.. मायाकड कालच्यातली जिरा..अजुन हे थोडी.. मी त्ये मारुन झोपनार. तू जा ज्यवायला. काय खानार आज? डाळरैस का वज्डीपाव?
राम्या:- चिकण!
गन्या:- कुणी दिल्हे पैशे?
राम्या:- माजा बाप आलता वरनं.. तू पे..आनी झोप आय%$# ...फुकट तेज्यायचं चौकश्या करत आ%$#^लं!
..........................................................................

झाड कामगार स्त्रीया

१:- काय गं बया ह्ये दोगं ?
२:- जाऊ दे...रोजच्च हे की ते! आवार लवकर ..त्ये (फुलाच्या) कचर्‍याचं बारदान आन
१:- हा गं...आडिच वाजायला आले.. कवा घरला जायचं न काय?
२:- जाऊ..जाऊ की. ह्ये तीन गाळे झाले की सपल!
१:- हा गं बाय.. सीजन्चं लय थांबाय लागतं हा पन..नाय त ह्या टैमला घरी असतो आपन..
२:- आनी न्हाई तवा लवकर जाऊन काय असतं?
१:- च्च्क्क!
२:- उलट ह्ये शिजन्ला बरं... नुस्ताच कच्रा लागतो झाडायला.. येश्टेज नसतं
१:- हा गं बाय.. खरं! न्हाय तं ये र्‍हायल्येले फुलभारे फ्येकायला लै ब्येक्कार
२:- मं......??? हितं असच हे.. इकली तं फुलं,नाय तं कच्रा!! हॅ हॅ हॅ हॅ !
१:- ह्ये ह्ये ह्ये ह्ये..त्या अनास्पुरेच्या शिनिमातला डायलॅग मारती व्हय.. चल आवर चल! लै.........आवडतो गं तुला तो!
२:- ................................ (लाजून बुजून ग.......प!)

.......................................................................
बबनराव (गाळा नंबर *** ) :- ओ शामराव ..त्या गन्याच्या बोच्यावर लाथ घाला हो एक ..यायच त्येच्या! पाच वाजत आले तरी हितच पडलय.. घरी जाऊन पड की म्हनाव..
शामराव (गाळा नंबर **) :- जाऊ दे की र्‍हाऊ दे.. जरा अंदार पडला डास चावले की उठल...
ब:- काय?
शा.:- आओ..प्प्ल्ल्ल!!! छ्या! काय राव तुम्मी पन?
ब.:- त्ये कळ्ळ हो.. आओ मी काय विचारतो म्ह्न्जे ..ह्ये बेनं का चाऊन म्येलेलं डास? असं विचारतोय. नाय त तुम्हाला काय वाटलं? काय तुम्मी पन?
शा.:- मला कशाला काय वाटायचय... चला च्या मारू...संद्याकाळ व्हुइल येवढ्यात.
ब.:- मायला ..पाचाचा टैम व्हय्ला आला..तरी ह्ये हित्तच असतं कित्तीकदा. ह्येला घरदार न्है का ओ?
शा.:- नसल...न्हाय तं आदी असल आनी आता नसल!
ब:- यायला....लै हुश्शार तुमी!!!
शा:- मां............ग??? वाटलं काय तुम्माला..? चला आता कॉटर मारु
ब.:- हा.... सोडा वाट.. तुमाला कारनच पायजे..
शा.:- ओ ...ओ.. थांबा.. ओ.. मज्जा क्येली.. च्या तर मारुन जावा...ओ........................!
.......................................................................................................
टाइमः- सकाळचे साडेपाच सहा... चहाच्या आणि नाश्त्याच्या टपर्‍या बोलू लागतात ती वेळ..
आणि अश्याच एका टपरी जवळ...

ब.:- रामू........... आज पैजकराचा माल आपल्या गाळ्याला लाव सगळा
राम्या:- त्ये त्यांन्नी सांगू दे बाबा.. नंतर उगीच आमच्याव् येत त्ये!
ब.:- न्हाय र्‍ये! हिकड ये च्या घ्ये! ...
राम्या:- ...................
ब.:- प्ल्ल्ल! हिकडं ये ना...!!!
राम्या:- ... ........
ब.:- बर बर... ह्ये पैश्येपन घ्ये!
राम्या:- काय नको..नंतर कट-मारताल तुम्मी!
ब.:- हाय का! येक नंबरे संशयी..ब्वार.. ह्ये सगळे घ्ये अत्ताच..
राम्या:- (आनंदून..) द्या!
ब.:- ह्हा! येकच नंबर.. आता पैजकराच्ये झेंडूचे सगळे क्यांटर्/पोती आप्ल्याकड..क्काय?
राम्या:- हा.

चहावाला:- काय बबन सा हे ब?
बः- ए........गपे!
चः- ह्या ह्या ह्या! सकाळीच कोंबडी मारली का?
बः- कश्याची? ह्यी त चिम्नी!
चः- हा........शिकवा आमाला. तुम्मी कोंब्डीला चिम्नी म्हन्नार आनी बोकडाला मांजार!
बः- (मनमुराद हसत..) मग तू भाड्या पेश्शल कशाचा देतो..म्हैत नै का आम्माला?
चः- पन मग फक्त दोनच रुपे जादा घ्येतो!
बः- हा....शान्या... @#$%ला शिकव आता आमाला...
चः- ह्या ह्या ह्या ह्या ह्या ह्या ह्या!!!! द्या इस रुपे आता दोन पेश्शल च्ये!
बः- ह्हाआ! पेश्शल..म्हैते.. घ्ये.. मर!
.................................................................
टाइमः- साडेसात ..ते आठ वाजत आलेत..फुलाचे पंधरा/वीस टेंम्पो/मिनि ट्रक आत लागलेत. गिर्‍हाइकांची वर्दळ सुरु झालीये...

"ये गोंडा सत्तर... सत्तर... ताजा माल! "
..."य्ये चाळ्ळीसला लड,लवकर वढ!"
......."कलकत्ता......येकशेइस...येकशेइस..लवकर जानार.. लवकर या!"
.........."ये साटला किलो...बिजली .........य्य! बिजली..........य्य! "
..................."ए छडी थोडी...लवकर उडनार..लवकर या... थोडा माल..लवकर याल तर चांग्ला घ्याल..."
..........................."ए शिजनल ए शिजनल..ब्लॅकल्येडी.. पण्णास्ला जोडी..."
..............................."ह्ये कळी लागली आडिच्श्शे..लवकर घ्याल्,म्होट्टे व्हाल ....ह्ये कळी लागली आडिच्श्शे..लवकर घ्याल्,म्होट्टे व्हाल
......................................" ह्हे प्येढा..प्येढा..प्येढा....(पिवळा गोंडा....) येकशेचाळीस...येकश्येचाळीस!"
https://scontent-sin1-1.xx.fbcdn.net/hphotos-xpa1/v/t1.0-9/10612812_696463460439943_3836145471231222719_n.jpg?oh=259d0cce0418876cd619873184516fcf&oe=564E98D3
क्रमशः .............

Group content visibility: 
Public - accessible to all site users