कोंडल्याचे गाणे....

Submitted by लाजो on 12 July, 2015 - 21:58

कोंडल्याचे गाणे...

----

विशेष सुचना १:

एक लिंब झेलू बाई दोन लिंब झेलू---- या परंपरागत गायल्या जाणार्या भोंडल्याच्या गाण्यावरून प्रेरणा मिळाली...

चाल अर्थात त्याच गाण्याची Happy

माहित नसेल तर ऐकण्यासाठी मला वि पु करा... माझ्या मंजुळ आवाजात रेकॉर्ड करून पाठवेल Happy

----

एक तडका मारू बाई दोन तडके मारू
दोन तडके मारू बाई तीन तडके मारू
तीन तडके मारू बाई चार तडके मारू
चार तडके मारू बाई पाच तडके मारू

पाचा तडक्यांचा पुरवठाsss

माळ घाली कवीराजाला

कवीराजाची सुस्साट गाडी
येता जाता कविता पाडी...

कवितांच्या भाराने पिचली जनता

अरे अरे राजा बस तुझी सजा....

सजा नव्हे ही आहे मजा

तडक्यांच्या माझ्या रतिबामुळे sss
काव्यप्रेमी ते झाले खुळे sss

नव्या कव्यांना उचकी लागली
डकार घेऊनी कविता पाडली...

मी तर भजते कवीराजा

कवीराजा ...कवीराजा

तडक्यांची माला संपली का नाही?

तडक्यांच्या मार्‍याने माबो ग्रासली
गुलमोहरात आता आ/पा* घुसली....

तडके आले पहिल्या पानावरी
ग़झला हरवल्या गेल्या बाजारी....

----
विशेष सुचना २: * आ/पा म्हणजे आहारशास्त्र आणि पाककृती (उगाच भ्लते सल्ते अर्थ काढु नयेत)

विशेष सुचना ३: हे गाणे माझ्या मंजुळ आवाजात लवकरच यु ट्युब आणि आय ट्युन्स वर उपलब्ध होत आहे.

इथे कळवेनच.....मग लाभ घ्यावा.

विशेष सुचना ४: मी सर्व '..डका' कवितांना चाली लावुन अल्बम बनवणार आहे... तरी इच्छुकांनी आपापल्या डकारांच्या कॉप्या मला पोष्ट कराव्यात.

विशेष सुचना ५: आपला फोन नंबर मला वि पु मधे कळवा मग मी पत्ता सांगेल...

विशेष सुचना ६: इथे कुणाच्या भावणा दुखवन्यासाठी हे गाणे लिलेले नाही.. गैरसम्ज नसावा Happy

धन्यवाद.

अति विशेष सुचना ७:

अजुन वाचले नसेल तर माझी 'मडका - तफावत' ही कविता जरूर वाचा आनि आपला बहुमुल्य अभिप्राय कळवा...

धन्यवाद

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाजो Lol